गंध तुझ्या गजऱ्याचा दरवळतो अजूनही
नाद तुझ्या पैंजणांचा रुणझूणतो अजूनही
त्या आणा शपथा वचनांचे शब्द घुमती कानी
विसरता न ये ते काही मज स्मरते अजूनही
मौनातून डोळ्यातून जे संवाद जाहले काही
मी अर्थ लावतो आहे त्या मौनाचा अजूनही
वाहून गेले पाणी खालून पुलाच्या किती
त्या वाहत्या गार प्रवाही मी भिजतो अजूनही
ठाऊक आहे मजला सारे हे व्यर्थ तरीही
सापडेल अर्थ अंधुकसा ही आशा अजूनही

— रचना : विजय पांढरीपांडे. हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
