Homeबातम्या‘आरोग्य सेवेचे नवे पर्व’ : माहितीपट प्रदर्शित

‘आरोग्य सेवेचे नवे पर्व’ : माहितीपट प्रदर्शित

आरोग्य हीच खरी संपत्ती असून आणि सक्षम आरोग्यसेवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. याच विचाराला केंद्रस्थानी ठेवून आमदार श्री. बालाजीराव कल्याणकर यांच्या प्रेरणेतून वाडी (बु.) येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन वास्तूचा विकासप्रवास उलगडणारा ‘आरोग्य सेवेचे नवे पर्व’ हा माहितीपट साकारण्यात आला आहे.

या माहितीपटाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री प्रकाश आबीटकर, आ. हेमंत पाटील, आ. आनंद तिडके-बोंढारकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ.अमरनाथ राजुरकर, आ भीमराव केराम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

छायाचित्रकार विजय होकर्णे यांची संकल्पना, संहिता लेखन असलेल्या निर्मितीची जबाबदारी सांभाळत या माहितीपटातून या वाडी ऊपजिल्हा रुग्णालय,आरोग्य प्रकल्पाच्या उभारणीमागील आमदार बालाजी कल्याणकर यांचा पुढाकार, सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग राज्य शासनाचे सहकार्य आणि प्रशासकीय यंत्रणांचे योगदान प्रभावीपणे मांडले आहे. महेश होकर्णे यांनी माहितीपटाचे छायाचित्रण केले आहे.

वाडी (बु.) तसेच परिसरातील नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, वेळेवर उपचार आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने विधीमंडळ अधिवेशनात मागणी करून शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पुढाकाराला राज्य शासनाचे सहकार्य लाभले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या योगदानाचा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भूमिकेचा माहितीपटात विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसह अंतर्गत रस्ते, पाणी साठवण व्यवस्था, पंपहाऊस, बोअरवेल, संरक्षक भिंत, वाहनतळ, बाह्य सुविधा, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि अग्निशमन व्यवस्थेसारख्या पूरक सुविधांची उभारणी करण्यात आली. मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी ४ मार्च २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ५३ कोटी ३४ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या संपूर्ण विकासकामांचा प्रवास माहितीपटात छायाचित्रे, दृश्यफिती आणि निवेदनाच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे.

मात्र हा माहितीपट केवळ एका भव्य वास्तूच्या उभारणीपुरता मर्यादित नाही. रुग्णालयातील १०० खाटांची क्षमता, वैद्यकीय विभागांची उपलब्धता, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती, आवश्यक उपकरणे, औषधसाठा आणि नियमित आरोग्यसेवा यांचे महत्त्वही यात अधोरेखित करण्यात आले आहे. इमारतीची निर्मिती ही सुरुवात असून तिचे खरे यश नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यातच आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश या माहितीपटातून देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा, आरोग्य सुविधांची गरज आणि या नव्या वास्तूकडून असलेल्या आशा यांनाही माहितीपटात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे हा माहितीपट केवळ विकासकामाचा अहवाल न ठरता नांदेडच्या आरोग्यविषयक आकांक्षांचा आणि भविष्यातील आरोग्यसेवेच्या नव्या दिशेचा दस्तऐवज ठरतो.

हा माहितीपट म्हणजे विकास कामामागील ध्यास, प्रयत्न आणि लोकहिताची भावना दृश्यरूपात मांडणारा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.हा माहितीपट म्हणजे केवळ एका रुग्णालयाच्या वास्तूची कहाणी नाही, तर हजारो नागरिकांच्या निरोगी उद्याची आशा आणि सक्षम आरोग्यसेवेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सदाशिव रामचंद्र पोटे on पुस्तक परीक्षण
पूजा टंकसाळे सातारा on कोणी तरी असावे….