Homeयशकथान्युज स्टोरी टुडे : अभिनव उपक्रम

न्युज स्टोरी टुडे : अभिनव उपक्रम

खरं म्हणजे, समाज माध्यमांकडे अजूनही पुरेसे गांभीर्याने पाहिले जात नाही. मुख्यत्वेकरून करमणुकीचे साधन म्हणूनच त्याचा वापर होत असतो. पण समाज माध्यम कल्पकतेने, गांभीर्याने वापरले तर त्याचा कसा विधायक वापर होऊ शकतो याचे उदाहरण म्हणून “न्यूजस्टोरीटुडे. कॉम” www.newsstorytoday.com या आंतरराष्ट्रीय मराठी वेब पोर्टलकडे बघता येईल.

कोरोनाच्या भयंकर काळात लोकांना दिलासा देण्यासाठी 22 जुलै  2020  रोजी न्युज स्टोरी टुडे हे वेब पोर्टल सुरु करण्यात आले. या पोर्टल मुळेच 3 वर्षापूर्वी न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन तर 31 जुलै 2025 पासून न्युज स्टोरी टुडे, यू ट्यूब वाहिनी सुरू करण्यात आलीआहे. या सर्व  उपक्रमांचा हा मागोवा…..

या वेब पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे दैनंदिन राजकारण, गुन्हेगारी, बदनामीकारक मजकूर पोर्टल वर प्रसिद्ध केला जात नाही. तर मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, कला, सेवा, उद्योजक विकास, यशकथा, लोक शिक्षण, वैचारिक लेखन, कविता, अनुभव कथन, पर्यटन यांना प्रसिद्धी देण्यासाठी हे वेब पोर्टल महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे देश विदेशातील अभिरुची संपन्न लेखक, कवी, वाचक, विविध क्षेत्रातील व्यक्ती या वेब पोर्टलशी जोडले गेले आहेत आणि जोडले जात आहेत.

या पोर्टल वर दररोज एक लेख, बातमी, साहित्य, दिन विशेष, लेख, कविता प्रसिद्ध होत असतात. आता पर्यंत 1500 हून अधिक कविता, तर वाचक लिहितात.. या सदरातून वाचकांची असंख्य पत्रे प्रसिध्द झाली आहेत.

प्रकाशित लेखमाला
न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर आजतागायत पुढील लेखमाला प्रसिद्ध  झाल्या आहेत.
1) “बातमीदारी करताना” :  35 भाग.
लेखक : स्व. प्रा डॉ किरण ठाकूर. पुणे
2) “मनातील कविता” : 24 भाग. थोर कवी व त्यांच्या कवितांवर आधारित.
लेखिका : डॉ गौरी जोशी कंसारा. अमेरिका
3) “जीवन प्रवास” : 37 भाग.
लेखिका:वर्षा भाबल. नवी मुंबई.
4) “मी, पोलीस अधिकारी” : 30 भाग.
लेखिका : सुनीता नाशिककर. निवृत्त डीवायएसपी, मुंबई .
5) “लालबत्ती” : 47 भाग
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या जीवनावर आधारित.
लेखिका : डॉ राणी खेडीकर. पुणे
6) “कुटूंब रंगलंय काव्यात” : 53 भाग.
लेखक : प्रा विसुभाऊ बापट. मुंबई.
7) “गिरनार परिक्रमा” : 7 भाग
लेखक : टिव्ही कलाकार गंधे काका. मुंबई.
8) “माझी कॅनडा अमेरिका सफर” : 11 भाग
लेखक : डॉ भास्कर धाटावकर. निवृत्त पुराभिलेख संचालक, मुंबई
9) स्वप्नरंग स्वप्नीच्या, कथामाला : 21 भाग.
लेखिका : प्रतिभा चांदूरकर. ठाणे
10) “सावरकर समजून घेताना” :  5 भाग
11) “महानुभावांचे मराठी योगदान” :  25 भाग
लेखिका : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर.
12) भावलेली गाणी : 12 भाग.
लेखिका : तनुजा प्रधान.
13) “महामारी आणि विश्वाचा नवोदय” : 15 भाग
लेखिका : तृप्ती काळे. नागपूर
14)“वर्धा साहित्य संमेलन” : 12 भाग
लेखक : श्री प्रवीण देशमुख. कल्याण.
15) “ओठावरली गाणी” : 100 भाग. रेडिओ वर  प्रसारीत झालेल्या लोकप्रिय गीतांचे रसग्रहण.
लेखक : श्री विकास भावे. ठाणे
16) राग सुरभी : 35 भाग
संगीतातील विविध रागांची ओळख.
लेखिका : प्रिया मोडक. मुंबई
17) “अमेरिका : माझ्या दृष्टीकोनातून”
लेखिका: प्रतिभा चांदूरकर. ठाणे
18) “माझी ऑस्ट्रेलिया सफर”
लेखिका : मेघना साने. ठाणे
19) आयुर्वेद उवाच : १६ भाग
लेखक : प्रा.डॉ शार्दुल चव्हाण. मुंबई
20) सहज सुचलं म्हणून : 11 भाग
लेखिका : क्षमा प्रफुल्ल. नवी दिल्ली.
21) अवती भवती : 39 भाग
लेखक : प्रकाश चांदे. डोंबिवली.
22) आमची युरोप सफर : 20 भाग
लेखिका : सुप्रिया सगरे. मुंबई
23) दुर्मिळ पुस्तके : 40 भाग
लेखन : विलास कुडके. मुंबई
24) मेरा जुता है जपानी : १४ भाग.
लेखक : देवेंद्र भुजबळ. नवी मुंबई
25) मी वाचलेले पुस्तक : १०० भाग
लेखन : सुधाकर तोरणे, निवृत्त माहिती संचालक. नाशिक.
26) साहित्य तारका : ३५ भाग.
लेखिक्त : संगीता कुळकर्णी, बंगलोर.
27) टाकाऊतून टिकाऊ : 11 भाग
लेखन : सौ अरुणा गर्जे. नांदेड.
28) पालकत्व एक कला : 29 भाग.
लेखन : डॉ राणी खेडिकर, अध्यक्षा, बाल विकास समिती, पुणे.
29) माझी जडण घडण : 79 भाग.
सौ राधिका भांडारकर. पुणे.
30) स्नेहाची रेसिपी : 52 भाग.
सौ स्नेहा मुसरीफ, पुणे
31) हवाईदलातील माझ्या आठवणी : 52 भाग.
लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे.
32) अमेरिकेतील नवदुर्गा 9 भाग
लेखिका : चित्रा मेहेंदळे, अमेरिका
33) जिचे तिचे आकाश : 24 भाग
लेखन : चित्रा मेहेंदळे, अमेरिका
34) जर्मन विश्व : प्रा आशी नाईक, पुणे

सध्या सुरू असलेल्या लेखमाला
1) सोमवार : माझी  जीवन नौका. लेखिका: वेदवती कुलकर्णी, मुंबई
2) मंगळवार : “झेप” उल्लेखनीय कामगिरी केलेल्या/ करणार्‍या व्यक्ती.
प्रा. प्रतिभा  सराफ, नंदकुमार रोपळेकर, देवेंद्र भुजबळ, सुनील चिटणीस.
3)  बुधवार : आठवणीतील विद्यार्थी
4) गुरुवार : संगतीरंग
लेखिका : वसुंधरा  घाणेकर, ठाणे.

वेब पोर्टलवरील सदरं
1) वैचारिक लेख, 2) पुस्तक परिचय, 3) पर्यटन, 4) हलकं फुलकं, 5) चित्रसफर, 6) आठवणीतील व्यक्ती, 7) दिन विशेष, 8) यश कथा, 9) सामाजिक संस्था परिचय, 10) “माहिती”तील आठवणी, 11) ललित, 12) पाककला, 13) अनुभव कथन

प्रकाशित विशेषांक
1) डॉक्टर म्हणजे देव ; 2) आषाढी एकादशी ; 3) स्वातंत्र्य दिन ; 4) डॉ बाबासाहेब आंबेडकर : 4 विशेषांक ; 5) सिंधुताई सकपाळ ; 6) डॉ अनिल अवचट ; 7) लता मंगेशकर ; 8) मराठी भाषा ; 9) महात्मा फुले ; 10) सुरेश भट ; 11) तंबाखू विरोधी दिन ; 12) बालदिन ; 13) संविधान दिन ; 14) पर्यावरण ; 15) गुरू पौर्णिमा.15) सावरकर विशेषांक

लेखमालांची झाली पुस्तके
न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर प्रकाशित झालेल्या पुढील लेखमाला पुस्तकात रूपांतरित झाल्या आहेत.
1) “समाजभूषण”
लेखक : देवेंद्र भुजबळ. भरारी प्रकाशन, मुंबई
2) मराठी साता समुद्रापार.
लेखिका : मेघना साने. ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
3) जीवन प्रवास.
लेखिका : सौ वर्षा भाबल. न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स, नवी मुंबई.
संत नामदेव उत्कृष्ट आत्मचरित्र पुरस्कार प्राप्त.
4) समाजभूषण २.
लेखिका : सौ रश्मी हेडे. न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स, नवी मुंबई.
सर्वद साहित्य पुरस्कार प्राप्त.
5) मी, पोलीस अधिकारी. लेखिका : सुनीता नाशिककर.
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स, नवी मुंबई.
तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मध्ये प्रकाशन.
6) माझी कॅनडा, अमेरिका सफर. लेखक : डॉ भास्कर धाटावकर. निवृत्त पुराभिलेख संचालक,चैतन्य प्रकाशन, मुंबई.
7) “पौर्णिमानंद” काव्य संग्रह.
कवयित्री: सौ पौर्णिमा शेंडे. मुंबई. न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स, नवी मुंबई
8) मराठी इथे, मराठी तिथे – ई बुक
लेखिका : मेघना साने. उद्वेली प्रकाशन, ठाणे.
9) “आम्ही अधिकारी झालो”
लेखक : देवेंद्र भुजबळ. न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन. नवी मुंबई.
तत्कालीन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे प्रकाशन.

10) “माध्यमभूषण” प्रसार माध्यमांतील व्यक्तिचित्रणे
लेखक : देवेंद्र भुजबळ. न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन. नवी मुंबई
11) “कला साहित्य भूषण”
विविध  कला, साहित्य  क्षेत्रातील व्यक्तिचित्रणे, लेखक : देवेंद्र भुजबळ.
न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन. नवी मुंबई
12) जिचे तिचे आकाश
अमेरिका आणि भारतातील स्त्रियांच्या  यश कथा.
लेखिका : चित्रा मेहेंदळे, अमेरिका.
न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन. नवी मुंबई
13) “संवादभूषण”
प्रसार माध्यमे, कला, साहित्य, वक्तृत्व, शिक्षणक्षेत्रातील व्यक्तिचित्रणे.
लेखक : देवेंद्र भुजबळ.
न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन. नवी मुंबई
14) “ओठावरली गाणी”
रेडिओ वर  प्रसारीत झालेल्या लोकप्रिय गीतांचे रसग्रहण.
लेखक : श्री विकास भावे. ठाणे.

प्रकाशने
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स तर्फे आतापर्यंत पुढील पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यातील काही पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.
1) “जीवन प्रवास”
लेखिका : सौ वर्षा भाबल. नवी मुंबई.
2) “समाजभूषण 2.”
लेखिका : सौ रश्मी हेडे. सातारा.
3) “मी, पोलीस अधिकारी”
लेखिका : सुनीता नाशिककर. निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई.
4) “पौर्णिमानंद” काव्य संग्रह.
कवयित्री : सौ पौर्णिमा शेंडे. निवृत्त उपमहव्यवस्थापक, एमटीएनएल, मुंबई.
श्री राजाराम जाधव, निवृत्त सहसचिव,महाराष्ट्र शासन, नवी मुंबई यांची 4 पुस्तके…
5) “अजिंक्यवीर” – आत्मचरित्र.
6) “अंधारयात्रीचे स्वप्न” – वडिलांचे चरित्र
7) “चंद्रकला” – कादंबरी.
8) हुंदके सामाजिक वेदनेचे – वैचारिक लेख संग्रह
श्री देवेंद्र भुजबळ. निवृत्त माहिती संचालक, नवी मुंबई यांची 5 पुस्तके
9) “आम्ही अधिकारी झालो” – यशकथा संग्रह
10) “करिअरच्या नव्या दिशा.”
11) “माध्यमभूषण” – व्यक्तिचित्रणे
12) “कला साहित्य भूषण” – व्यक्तिचित्रणे
13 ) “संवादभूषण” – व्यक्तिचित्रणे
14) “मी शिल्पा….
चंद्रपूर ते केमन आयलँडस” – आत्मचरित्र.
लेखिका : शिल्पा तगलपल्लेवार गंपावार.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते नागपूर येथे मी लोकार्पण

15) “सत्तरीची सेल्फी” – व्यक्तीचित्रं
लेखक : चंद्रकांत बर्वे. निवृत्त दूरदर्शन संचालक.
16) कोवळं ऊन. कथा संग्रह,
लेखिका : नीला बर्वे. सिंगापूर
17) a Romance for Ruby & two other plays. इंग्रजी नाटके
लेखिका : अरुणा ठोसर दीक्षित, पुणे.
18) जिचे तिचे आकाश : अमेरिका आणि भारतातील महिलांच्या यश कथा, लेखिका : चित्रा मेहेंदळे, अमेरिका.
19) “असो चैतको मायना” – “कलाली” बोली भाषेतील पहिला कविता संग्रह, कवी प्राचार्य डॉ रामदास चवरे, पुणे.
20) “टेक 3” – मुक्त छंद आणि कविता संग्रह.
कवी जेष्ठ चित्रपट लेखक – दिग्दर्शक प्रदीप दीक्षित, पुणे.

आगामी प्रकाशने
1) माझी जडण घडण – आत्मचरित्र
लेखिका :  राधिका भांडारकर, पुणे.
2) “महानुभाव विचार दर्शन”
प्रा डॉ विजया राऊत. नागपूर.
3) “पंख जिद्दीचे” – आत्मचरित्र
लेखिका : प्रतिक्षा तोंडवळकर, पुणे.

यूट्यूब वाहिनी
न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे 31 जुलै 2025 पासून, न्यूज स्टोरी टुडे यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. नाव आहे @newsstorytoday1 या चॅनलवर आतापर्यंत पुढील मुलाखती प्रसारित करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व मुलाखती घेण्याची आणि त्याच बरोबर कार्यक्रम निर्मितीची संपूर्ण जबाबदारी सौ अलका भुजबळ या पार पाडीत असतात.

1) विषय : स्वतःच्या २ गतिमंद मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून देणाऱ्या – “सौ अर्चना पाटील : आईपणाचा असामान्य प्रवास”
2) विषय : उपेक्षित महिलांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या – “प्रा वृषाली मगदूम : समाजातील समानतेला आव्हान देणारी स्त्री”
3) विषय : न्यूरो सायन्स – कु. कांक्षा जकाते : अडचणींवर मात करण्याचं आधुनिक तंत्रज्ञान”
4) विषय : प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट
डॉ प्रशांत थोरात : “वंचितांच्या आयुष्यात प्रकाश आणणारे हात”
5) विषय : ओळख बुद्धिबळाची
बुद्धिबळ प्रशिक्षिका सौ मंगला बिराजदार
6) विषय : समाजाभिमुख पत्रकार
टीव्ही पत्रकार श्री मनोज भोयर
7) श्री रवींद्र गोळे, संपादक, विवेक प्रकाशन आणि अमेरिकास्थित ज्येष्ठ अभियंते तथा स्वयंसेवक श्री विनोद बापट यांची “समिधा” ग्रंथाविषयी मुलाखत.
8) ओळख डेटा ॲनालिटिक्सची – डॉ संजीवनी
9) “स्वप्नातून साम्राज्य : दरेकर ग्रुपची प्रेरक गोष्ट” – अरुण दरेकर*
10) एकत्र कुटुंब पद्धतीचे सौंदर्य – राजाराम जाधव आणि फॅमिली
11) थायरॉईड – डॉ मयुर हेडाव
12) महिलांचे आरोग्य – डॉ रेखा डावर.
13) सबकिन्शियस माईंड ची ताकद – समीर नारद
14) ओळख “monteriya village”ची
15) ज्येष्ठानो आरोग्य सांभाळा
16) “उन्नती” कर्ज नव्हे संधी देणारी – श्री व सौ रांजणे
17) घटस्फोटाची कारणमीमांसा – अँड योगेश मोरे
18) ती निर्भया…
सहायक पोलीस निरीक्षक यांची मुलाखत.
19) आठवणी जहाजाच्या
चीफ इंजिनिअर मुकुंद कुलकर्णी आणि सौ वेदवती कुलकर्णी.
20) “रातोरात उखडलेले आयुष्य” काश्मिरी पंडित श्री रविन्द्र सफाया आणि सौ निशि सफाया

विविध उपक्रम
न्यूज स्टोरी टुडे पोर्टल मार्फत पुढील उपक्रम राबविण्यात येतात.
1) स्नेहमिलन
लेखक, कवी, अन्य सर्व संबधित यांचे अनौपचारिक स्नेहमिलन हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे. या स्नेहमिलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय अनौपचारिक आणि एखाद्या लेखक, कवी यांच्या घरीच असते. इथे कुणी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सूत्र संचालक असे काहीही नसते. निखळ एकमेकांची ओळख, अनुभव, विचारांची देवाणघेवाण, गप्पागोष्टी असे लोभसवाणे स्वरूप असते.
आतापर्यंत संगमनेर ; नाशिक ; पुणे ; विरार ; नवी मुंबई ; सातारा ; न्यू जर्सी ; अमेरिका ; ठाणे ; लातूर ; येथे असे स्नेहमिलन झाले आहे.

2) सामाजिक पर्यटन
पर्यटन म्हणजे केवळ मौज मजा नाही, तर सामाजिक आशयाचे पर्यटन व्हावे, संबंधित संस्थांचे कार्य समक्ष पाहता यावे, त्यांच्या कार्यात सहभाग निर्माण व्हावा, त्यांच्या कार्याला हातभार लावावा अशा हेतूने न्युज स्टोरी टुडे च्या वतीने सामाजिक पर्यटन आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
असे पहिले पर्यटन नवी मुंबईतील आनंदवन मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ, नागपूर या ठिकाणी नोव्हेंबर 2024 मध्ये आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात 28 जण सहभागी झाले होते.
श्री प्रकाश आमटे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना  75 हजार रुपये भेट देण्यात आले.

3) आनंदाची गुरुकिल्ली
आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असेल तरच आपण आनंदाने जगू शकतो हे लक्षात घेऊन पोर्टलने उरळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर 2024  मध्ये विशेष शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात 25 जण सहभागी झाले होते.

पुरस्कार
या वेब पोर्टलला, पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ आणि निर्मात्या सौ अलका भुजबळ यांना आतापर्यंत पुढील पुरस्कार मिळाले आहेत…
1) जनमत चाचणी घेऊन अप्रतिम मीडिया संस्थेतर्फे देण्यात येणारा विकास पत्रकारितेतील अत्यंत मानाचा असा राज्यस्तरीय “चौथास्तंभ पुरस्कार” तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते एका शानदार सोहळ्यात पत्रकार दिनी, 6जानेवारी 2023  रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉइंट, मुंबई येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.

2) पोर्टलचे सांस्कृतिक योगदान लक्षात घेऊन “एकता पुरस्कार” ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे प्रदान करण्यात आला.

3) नवी मुंबईतील मराठी साहित्य, संस्कृती, कला मंडळातर्फे मराठी भाषा दिनी, 27 फेब्रुवारी 2023 रोजी “विशेष सन्मान” करण्यात आला.

4) पोर्टल च्या निर्मात्या म्हणून सौ. अलका भुजबळ यांना “सावित्रीबाई फुले पुरस्कार“, ठाणे येथे गडकरी रंगायतन मध्ये 8 जानेवारी 2023 रोजी प्रदान करण्यात आला.

5) पोर्टल चे सामाजिक योगदान म्हणून “माणुसकी सेवा गौरव पुरस्कार”  25 फेब्रुवारी 2023 रोजी नाशिक येथे प्रदान करण्यात आला.

6) पोर्टलचे साहित्यिक योगदान लक्षात घेऊन मुंबईत “सर्वद पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

7) उत्कृष्ट संपादक म्हणुन ऑल इंडिया जर्नलिस्ट फेडरेशन तर्फे  पुरस्कार

8) विश्व बंधुत्वासाठी पोर्टल करीत असलेले कार्य पाहून रोटरी क्लब इंटरनॅशनल तर्फे विशेष पुरस्कार.

9) लोकनेते, माजी खासदार, श्री रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते देवेंद्र भुजबळ यांना 26.10.2025 रोजी माध्यमभूषण पुरस्कार

10) पोर्टल च्या निर्मात्या म्हणून सौ अलका भुजबळ यांना “रापा पुरस्कार“

11) सांस्कृतिक कार्यमंत्री श्री आशिष शेलार यांच्याहस्ते मुंबईतील विश्व भरारी संमेलनात, उत्कृष्ट पोर्टल म्हणून संपादक देवेंद्र भुजबळ यांचा सत्कार.

असे हे अनोखे पोर्टल आफ्टरनून, फ्री प्रेस जर्नल, डी एन ए (झी मीडिया), एशिएन एज (डेक्कन क्रोनिकल) या मुंबईतील प्रतिष्ठित इंग्रजी वर्तमान पत्रांमध्ये व काही काळ टिव्ही 9, मिड डे मध्ये आणि आता फ्री प्रेस जर्नल या वृत्तपत्रात प्रिन्सिपल करस्पॉडंट असलेल्या देवश्री भुजबळ हिने कोरोनाच्या भयंकर काळात लोकांना धीर मिळावा, दिलासा मिळावा, योग्य माहिती मिळावी या साठी काळाची पावले व डिजिटल पत्रकारितेचे महत्व ओळखून सुरू केले. यासाठी तिने या माध्यमाचे स्वतः प्रशिक्षण घेतले.

निवृत्त माहिती संचालक तथा माजी दूरदर्शन निर्माते, माजी पत्रकार देवेंद्र भुजबळ हे या पोर्टलचे संपादन तर त्यांच्या सहचारिणी सौ अलका भुजबळ या वेबपोर्टलची निर्मिती करीत असतात.

“या वेबपोर्टलला मिळालेले व मिळत असलेले यश हे सर्व लेखक, कवी, वाचक आणि पोर्टलशी जोडल्या गेलेल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे जणू प्रतीकच आहे” असे म्हणणे योग्य ठरेल. सर्वांचे स्नेह, सहकार्य पुढेही मिळत राहील, असा विश्वास  न्यूज स्टोरी टुडे  परिवार व्यक्त करतो.

आपल्या कल्पना, सुचना यांचे स्वागत आहे.
संपर्क : देवेंद्र भुजबळ
संपादक – www.newsstorytoday.com ☎️ +91 9869484800.
Email :- devendrabhujbal4760@gmail.com

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. Sir / madam
    Your contribution towards the news media Both Audio & visual aids
    Is excellent….
    Commitment for a social cause is very good which is appreciable
    Dedication & passion towards the profession is commendable…
    Apart Routine Articles ,your Write up on Medical issues esp Mental Health
    Satisfaction…is need of the hour in this busy & competitive era
    Motivational IAS officers ,Drs
    Eng & Social reformers is very nice
    We get inspired by these persons .
    And last but not the least the poems are very nice….Keep it up
    Thanks….will be happy to share
    That i have gone through your articles
    Will go thru the others articles too…
    Best wishes.. Regards

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments