Homeबातम्या"या" शिक्षणाला वयाची अट नाही !

“या” शिक्षणाला वयाची अट नाही !

बर्‍याच जणांना तरुण वयात जास्त शिकण्याची इच्छा असते. पण त्यावेळच्या त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना स्वताच्या उच्च शिक्षणाची इच्छा डावलून नोकरी, धंद्यास लागावे लागते. पण असे असले तरी, उच्च शिक्षणाची आस काही स्वस्थ बसू देत नाही.

पण आता मात्र ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला आणि ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी भाषा विभागामार्फत ठाण्यातच मराठी विषयातून एम.ए. करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे.

या अभ्यासक्रमाचा लाभ विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, ग्रंथपाल गृहिणी, निवृत्त व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आदी घेऊ शकतील.

रोजगाराभिमुख स्वरूप असलेल्या या अभ्यासक्रमामध्ये प्रसारमाध्यमे, भाषा व्यवहार, भाषांतर कौशल्ये, साहित्य अभ्यास, मुद्रितशोधन, अनुवादशास्त्र, ग्रंथव्यवहार तसेच पुस्तक प्रकाशन आणि वितरण यांचा समावेश करण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमामुळे कवी, लेखक, ब्लॉग लेखक, पटकथा लेखक, निवेदक, जाहिरात लेखक, मुद्रितशोधक, प्राध्यापक आणि संशोधक अशा विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.

आपली शैक्षणिक अहर्ता वाढविण्यासाठी इच्छुकांनी 22 मे 2026 पर्यंत प्रवेश घ्यावा. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयात अथवा मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा.डॉ.संतोष लक्ष्मण राणे, 9820176934 / 9819023904 किंवा ई-मेल santoshrane99999@gmail.com वर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी केले आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ५