Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जे काही वाईट साईट चालू आहे, ते महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास बघता अत्यन्त लाजिरवाणे आहे. साहजिकच त्याचे पडसाद आपल्या पोर्टलवर उमटले आहेत आणि उमटत आहेत. असे असले तरी, आपण नाउमेद होता कामा नये. उलट ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करून, आपापल्या परीने कार्यरत राहिले पाहिजे, ही काळाची गरज आहे. आपण असे काही प्रयत्न करीत असल्यास आम्हाला अवश्य कळवा. त्यांना नक्की प्रसिद्धी दिली जाईल.
आता वाचू या, गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)

“नीट” ची परीक्षा नीट करू या ! या प्रा. डॉक्टर विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू हैदराबाद यांच्या विचार प्रवर्तक लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया ….
1
प्रा. डॉक्टर विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू हैदराबाद यांचे विवेचन खूपच उपचारात्मक वाटले. त्यांनी शेवटी म्हटले आहे की, अजून काही सुचवू शकता. म्हणूनच मी सुचवतोय. कारण कुलगुरू या पदाचा मला किंबहुना सरांचा रास्त अभिमान आहे आणि त्यांनीही सर्वसामान्यांना मत व्यक्त करण्याची मोठ्या मनाने मुभा दिली आहे. म्हणून हा प्रपंच.
१) बहुतेक प्रगत राष्ट्रांमध्ये पुढच्या ५ ते ७ वर्षात आपल्याला किती डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सी. ए. लागतील याचा अंदाज घेऊन त्या त्या शाखेच्या दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केली जाते.
२) हल्ली विद्यार्थी इयत्ता १० वी पूर्वीच आपण कोण होणार ? त्यासाठी कसा अभ्यास करायचा ? कोणत्या विषयात प्राविण्य मिळवायचे याचे पालकांशी चर्चा करून निर्णय घेतात.
३) नीट परीक्षा किंवा तत्सम परीक्षा संबंधी असे सुचवावे वाटते की, या परीक्षा इयत्ता ११ वी प्रथम सत्रात १, द्वितीय सत्रात १, इयत्ता १२ वी मध्ये प्रथम सत्रात १ व १२ वी द्वितीय सत्रात अंतिम ४ थी परीक्षा अशा ४ टप्प्यात on line….A.I. चा वापर करून घ्याव्यात. थोडक्यात या परीक्षेचे ४ भाग करून एकत्रित निकाल तयार करावा.
४) परीक्षेशी संबंधित व्यक्ती केंद्रीय अवलोकनाखाली असावी. व्यक्तिगत व इन camera.
५) ज्याला डॉक्टर व्हायचे आहे तो ११ वी पासूनच त्याच्या अभ्यासक्रमात रस घेऊन आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करेल.
६) इयत्ता ११वी कल चाचणीवर भर द्यावा व इयत्ता १२ वी मध्ये विद्यार्थ्याच्या शाखा नैपुण्यावर भर द्यावा.
७) परीक्षेचे जितके भाग जास्त तेवढा पेपर फूटी व गैर प्रकार होण्याचा धोका कमी.
८) समाजाने सुद्धा असा गैरप्रकार आढळल्यास वेळीच केंद्रीय यंत्रणेच्या लक्षात आणून द्यावा आणि दोषी व्यक्तीस वेगळे कायदे करून सक्त शिक्षा होण्याची तरतूद असावी…
— प्रा मनोहर यादव. सातारा
2
“नीट” बद्दल वाचून मान शरमेने खाली जाते. मी देखील उत्तर शोधतेच आहे आणि विषण्ण होते आहे. सर्व माझ्याच मनातील आहे जे तुमच्यासारख्या योग्य व्यक्तीच्या योग्य शब्दात अवतरले आहे. एक काळ होता जेव्हा मेडिकल आणि शिक्षण या क्षेत्रांना अतिशय पवित्र मानले जाई. त्यांनाr नोबल प्रोफेशन मानत. आता सर्वाधिक भ्रष्टाचाराने बरबटलेले क्षेत्र म्हणजे ही दोन क्षेत्रे झाली आहेत.
तरुण पिढीतील मुलांना बोलताना ऐकले. “चल रे आपल्याला नोकरी नाही मिळाली तर एक शाळा काढू बक्कळ पैसा मिळतो..”…हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन हादरली.. डॉ पांढरीपांडेजी कळकळीने लिहित आहेत हे जाणवते पण .. “लक्षात कोण घेणार ?” अशी परिस्थिती आहे. ते कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेऊन या परीक्षेची नीट कार्यवाही व्हावी हे सुचवतात. पण माझे मन इतके खचले आहे की कधी कधी वैतागून सारांश सिनेमात.. अनुपम खेर एक आदर्श शिक्षक म्हणतो .. I have no hopes for this country… आठवू लागते पण पुनः त्याच सिनेमाचा शेवट आठवून आशा ठेवावी का असे विचार येतात. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी प्रचंड प्रशिक्षण वर्ग घ्यायला पाहिजेत. नाही तर पुनः त्यात असंख्य चुका! आताची गुण देण्याची पद्धती कशी चूक ठरू शकते हे सप्रमाण काही तज्ज्ञ कानीकपाळी ओरडत आहेत पण शेवटी निर्णय घेणे सर्व राजकारण्यांच्याच हातात न ? असो, लिहावे तेवढे थोडेच आहे. डॉ पांढरीपांडे यांच्या लेखामुळे विचारांची आवर्तनं सुरू होतात आणि त्याच त्या वर्तुळात मन भटकत राहते.
— स्वाती वर्तक. मुंबई
3
“नीट” ची परीक्षा नीट करु या ! हा प्रा.डाॅ.विजय पांढरीपांडे यांचा लेख अभ्यासपूर्ण तर आहेच पण विचार करायला लावणारा आहे. खरंच आपल्या शिक्षण क्षेत्रात, पद्धतीत खूपच बाजार झाला आहे. सगळं अवघड आहे.
— आशा दळवी. लेखिका, कवयित्री, फलटण, जिल्हा सातारा.

श्री देवेंद्र भुजबळ यांच्या “अखेर अंजली जिंकलीच” या हृद लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया ….
1
आमची मा व जची मैत्रिण अंजली जोशी/रानडेच्या दुःखद निधनाची बातमी चटका लावून गेली. अंजली जोशी आणि मिना कात्रे या दोघी मायदेवसरांच्या संपादकीय खालील इंग्रजी लोकराज्यच्या हसर्या, गप्पिष्ट, लक्षवेधी मुली होत्या. अंजली आपल्या उंच, सडपातळ,घारीगोरी, सुंदर व्यक्तिमत्वाबरोबरचं अतिशय हुशार, हजरजबाबी होती. आजही डोळ्यांसमोर उभी राहिलीयं. सतत हसतमुख राहून साहित्यिक विषयावरील गप्पा आमच्याशी करतांना तिच्या बुद्धीचातुर्याचा प्रत्यय नेहमी येत असे. अशा या गोड मुलीला लुपससारख्या असाध्य आजाराने आपल्या जाळ्यात ओढणं ही कल्पनाही असह्य करणारी आहे. “ईश्वरेच्छा बलियसी”, तिथे कुणाचे काही चालेना, हेच खरं🙏🙏आमच्या अंजलीच्या आत्म्याला शांती लाभो,हीच ईश्वराकडे प्रार्थना.
— वीणा गावडे. मुंबई
2
प्राध्यापक डॉ. अंजली यांची कहाणी वाचल्यावर एक धडाडीचे व्यक्तिमत्व समोर आले. दुर्धर आजारातही त्यांनी लिहिलेली पुस्तके, दूरदर्शनवर काम आणि त्यानंतर प्राध्यापक म्हणून योगदान हे सर्व पाहिले तर एक अद्वितीय पर्सनॅलिटी असेच म्हणावे लागेल. किती जगलास यापेक्षा कसा जगलास हे महत्त्वाचे आणि त्या दृष्टीने त्यांना मनःपूर्वक प्रणाम आणि सॅल्युटही !🙏
— नीला बर्वे. सिंगापूर
3
“अखेर अंजली जिंकलीच” हा लेख मनाला चटका लावून गेला. त्यांची स्टोरी वाचून वाईट वाटले. असाध्य आजाराशी झुंज देत त्यांनी पुस्तक लिहिले हे खुपचं कौतुकास्पद आहे. अंजली ताईंचा फोटो ही किती छान आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.

“हिंदू संघटन : काळाची गरज” हा वृत्तांत छान आहे.
जीवनाची परिभाषा कविता ही छान आहे.
सर्वांसाठी धन्यवाद .🙏🏻
— आशा दळवी. दुधेबावी, जिल्हा सातारा.
4
अंजली जोशी ऊर्फ डॉक्टर अंजली रानडे … यांच्याविषयी आदरणीय देवेंद्र भुजबळ सरानी श्रद्धांजली वाहत असताना केलेल्या शब्द सुमनांच्या ओंजळीस्वरूप लेखातून डॉक्टर अंजली यांच्या जीवन परीचय स्पष्ट होतो. पत्रकारिता…संशोधन….राज्यव्यवस्था स्पष्टीकरण…. महिला सबलीकरण… संरक्षण….आणि प्राध्यापक म्हणून नोकरी करत असताना विद्यार्थ्यांना केलेले राजकीय मार्गदर्शन… शेवटी आपल्याला झालेल्या लूपस या दुर्धर रोगाबद्दल सुद्धा लिहिलेले लुपसचे महाभारत हे पुस्तक, म्हणजे मृत्यूशैयेवर असताना सुधा देहदान केल्याप्रमाणे पत्रकारितेला केलेले अभिवादन !!!!! धन्य ती साहित्यिका…. धन्य तो तिचा मित्र परिवार आणि कौटुंबिक परिवार !!!!! अशा थोर भगिनीस भावपूर्ण श्रद्धांजली….🙏
— प्रा मनोहर यादव. सातारा
5
अखेर अंजली जिंकलीच. किती अर्थपूर्ण शीर्षक आहे.. लुपस सारख्या दुर्धर आजाराशी झुंजत, इतरांना जगण्याची प्रेरणा देत, त्यावर मात करणारी अंजली. जिंकलीच आहे ..खूप हृद्य लिहिले आहे
— स्वाती वर्तक. मुंबई.
6
अंजली रानडे मॅडमची कहाणी हृद्य पिळवटून टाकणारी तशीच एका लढवय्या विरांगणेचीही.
— प्रा डॉ सतीश शिरसाट. लंडन.
7
आपली वर्गमैत्रीण प्रा. डाॅ. अंजली रानडे ह्यांची कथा खूपच प्रेरणादायक आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— मृदुला राजे. जमशेदपुर

कलाली बोली भाषेतील पहिल्याच ” असो चैतको मायना” या प्राचार्य डॉ रामदास चवरे यांच्या कविता संग्रहाच्या बातमीवर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया ….
1
न्युज स्टोरी टुडेची आजची सर्व सदरे छान आहेत.
कलाली, या बोली भाषेचे नाव प्रथमच ऐकले.
भालचंद्र नेमाडे यांनी पुस्तकाची पाठराखण केली आहे म्हणजे हे पुस्तक छानच असणार, यात वादच नाही.
— आशा दळवी. लेखिका, कवयित्री फलटण, जिल्हा सातारा.
2
“असो चैतको मयना” या पुस्तकाची भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली पाठराखण वाचली. छान आहे. एखादी तरी कविता या लेखात दिली असती तर पुस्तकाबद्दल आणखी उत्सुकता वाढली असती असे वाटले.
— स्वाती वर्तक. मुंबई.
3
कलाली भाषा…. नेमाड्यांची पाठराखण . 👍🏼
— नंदकुमार महाजन. निवृत्त कार्यकारी अभियंता (विद्युत)
सार्वजनिक बांधकाम विभाग, नवी मुंबई.

अन्य काही प्रतिक्रिया…..
1
शैलेश देशपांडे यांचे रेषांमधली भाषा सदर नवनवीन विचार देणारे असतात. प्रस्तुतच्या लेखाप्रमाणे अनेकदा अनुभवांतून अनेक बाबी स्पष्ट होतात. इंग्लंडमधील लाॅर्डसचे क्रिकेट मैदान मी पाहिले आहे. फोटोत त्यातील slop समजत नाही. पण प्रत्यक्षात तो मोठा उतार आहे. ज्ञानप्राप्तीत अनुभव प्रामाण्य हाही एक निकष असतो. आपल्याकडील (नास्तिक म्हणत नाही) पण विवेकवादी विचारवंत अनुभव प्रामाण्याचे समर्थन करतात. अगदी विज्ञानातही प्रयोगशाळेत जे सिध्द होते (थोडक्यात अनुभवांतून) तेच सत्य असं मानलं जातं.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. लंडन
2
“हिंदू संघटन : काळाची गरज” हा वृत्तांत छान आहे.
जीवनाची परिभाषा कविता ही छान आहे.
“नव्या परंपरा आल्यापासून” हा नीला बर्वे यांचा लेख सुद्धा छान आहे. अधिक मासाची अधिक माहिती मिळाली.
सौ मीना घोडविंदे यांची अधिकमास ही कविता ही सुंदर आहे.
साऱ्यांनाच धन्यवाद. 🙏🏻
— आशा दळवी. लेखिका, कवयित्री फलटण, जिल्हा सातारा.
3
आपल्या ‘संवादभूषण’ या पुस्तकाची रोपळेकर सरांनी करून दिलेली पुस्तक ओळख आवडली..वाचनीय आहे संवाद भूषण पुस्तक हे कळते
वाणीजींची कविता चांगले भाष्य करते.. आपला अहं सोडून दुःखितांची सेवा करण्यातच जीवनाचे सार आहे .. छान
— स्वाती वर्तक. मुंबई
4
नमस्कार श्री भयवाल जी,
चहा वरील काव्य वर्णन खूपच समर्पक आहे. आवडले.चहा ह्या एका शब्दा बरोबर प्रत्येकाच्या अनेक आठवणी असतातच.
जशी 1978-84 दरम्यान वैजापूर येथे असतानाच्या आपल्या घरी आल्यावर घेतलेल्या चहा आणि नवीन कवितांच्या आठवणी, बँके समोरील टपरी वर चहा घेत असतानाच्या गप्पा.
चहा आणि आठवणी हे प्रत्येकाच्या आयुष्यातील कायम लक्षात असतात.
— प्रभाकर दिवाकर. पुणे
5
पक्ष्यांच्या निमित्ताने पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ ह्यांनी समजावून सांगितलेला “सहिष्णुता” शब्दाचा खरा अर्थ मनापासून पटला. सुंदर उद्बोधक लेख आहे.
— मृदुला राजे. जमशेदपुर.
6
सहिष्णुता शिकण्यासाठी पक्षी निरीक्षण …वाह…श्री गाडगीळजी, लेख
मनापासून आवडला आणि पटला देखील.आभार.
— स्वाती वर्तक. मुंबई.
7
विजय पांढरीपांडे यांचा बंगाल विषयी लेख खूप छान आहे. आवडला. मी ७१-७३ च्या तुकडी ला आय आय टी त होतो. पण पवई येथे. बंगाली मित्र झाले. बंगाली प्राध्यापकांनी शिक्षण दिले. त्या आधी, सुरतच्या क्षेत्रीय तांत्रिक विद्यालयात बंगाली प्राध्यापक होते. ह्या सर्वांनी मला खूप प्रभावित केलं.
साहित्य सिनेमा आणि कले नी, तर मला वेड लावलं. कोलकाता येथे मी उणे पुरे सात दिवस राहिलो. एक गमतीशीर गोष्ट सांगतो.. आम्ही बडोद्याला असू. घर, गणेशवाडीत. खंडेराव भाजी मंडईच्या मागे. मधला आडवा रस्ता म्हणजे निव्वळ कचरापेटी. सडणाऱ्या भाज्या आणि तो किळसवाणा वास.
बरे ते जाऊ दे. पंचेचाळीस वर्षांपूर्वी आमचेकडे एक अतिथी आला, जेवणा निमित्त. माझा मित्र इंद्रेंदु कर्माकर. पुरण पोळी चे यथेच्छ भोजन झाले.
उष्टी बोटे वाळे पर्यंत, ताटावर बसून गप्पा मारल्या. नंतर थोडे बाहेर पडलो.
मधला अती घाण रस्ता आल्यावर इंद्रेंदु एकदम थबकला. म्हणाला, प्रदीप इथे थोडे थांबू. मला आधीच ओशाळल्यागत वाटत होते, वरून हा म्हणतो इथे थांबू.
थोडा वेळ दीर्घ श्वास घेऊन कर्माकर बोलला, “अरे प्रदीप, अख्ख कोलकाता असेच आहे. दुर्गंधी युक्त, घाणेरडे. मला इथे घरी आल्या सारखे वाटत आहे !”
— प्रदीप. पुणे

वेदवती कुलकर्णी यांच्या “माझी जीवन नौका” भाग 7 वरील स्मिता प्रधान यांनी लिहिलेली प्रतिक्रिया :
Dear Vedvati – Pradnya.
You write so well, it’s as if your words come alive in pictures !!
Our destinies were always linked to each other !! I too joined my first ship Lok Vihar in Vishakhapattnam with a long stay in Apsara Hotel.

I’ve always wished we too could have sailed together just like our husbands did. We would have had such a wonderful time. No matter, this wonderful friendship of ours has always been beyond the boundaries of sea life and will carry on.
Thank you for sharing your memories and for including us in them along with pictures !!
We have read all the chapters so far and looking forward to more. Also saw your podcast and enjoyed it very much.
Yours,
Smita

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments