नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात… सदरात आपले स्वागत आहे. वाचू या गेल्या आठवडय़ात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
1
मा. श्री देवेंद्र भुजबळ सर आणि सौ. अलकाताई यांना स. न. वि. वि. आपले सर्व अंक वाचले.अधिक मास, मा. सुमनताई कल्याणपूर यांचे लेख उत्तम आहेत. अरे विवाह विवाह.. ही कविता वास्तवदर्शी आहे.
श्री तुकारामजी मुंढे यांचे बद्द्ल लिहावे तेव्हढे थोडच !
पंढरपूरमध्ये कार्यरत असताना त्यांनी धडाकेबाज कार्य केले त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांची माहिती दिली याबद्दल आपले खरेच कौतुक !!
बाकी सर्व कविता उत्तम ! पर्यावरणाचे सर्वच लेख खूप आवडले. सर्व पोर्टल अति उत्तम.
— श्रीमती अलका रामचंद्र मोहोळकर. पंढरपूर.
2
“अशी रंगली विद्यार्थ्यांची धोंडापार्टी” – लेखक नारायण जाधव यांचा वृत्तांत वाचून असे वाटले की, या लेखाचे फ्लेक्स बोर्ड तयार करून पुणे ,मुंबई येथे चौकाचौकात लावावेत. मुंबईची concert party आणि त्यात झालेला एका मद्यधुंद तरुणाचा मृत्यू, त्याची प्रेयसी मद्यधुंद अवस्थेत हॉस्पिटल मध्ये ऍडमिट, पुणे येथील निर्जन वस्तीतीतील बंगल्यात २०० तरूण तरुणींनी केलेली रेव्ह पार्टी…. हे परवाच झालेले गैरप्रकार कोठे आणि १९७९ ची १० वी विद्यार्थ्यांची याच अधिक मासात झालेली धोंडा पार्टी कोठे ? आपण आपल्या मूळ संस्कृतीला कसे वाईट वळण लावतोय याचे जिवंत उदाहरण म्हणजे परवाच झालेल्या पुणे मुंबईच्या पार्ट्या आणि नारायण जाधव यांनी सांगितलेली संस्कृतीचे जतन करणारी धोंडा पार्टी कोठे !!!! धोंडा हा एक पदार्थ आहे.तो कसा केला जातो, तो कोणत्या पाहुण्याला आवर्जून खायला घातला जातो, त्याची चव काय….हे वाचल्यानंतर या आजच्या तरुणांना या पूर्वी ही माहिती असेल असे वाटत नाही. धन्य ते लेखक व धन्य ती धोंडा (पुरण, कणिक, तूप, वेलदोडे, जायफळ, गूळ यांचे पाककलेचे सर्व गुण पणाला लावून तयार केलेला उखडी चा गोल गडदू प्रमाणे दिसणारा पदार्थ) चवीने खाण्याची पंगत….म्हणजेच धोंडा पार्टी…!!!!!🙏🙏🙏💐💐💐.
— प्रा मनोहर यादव. सातारा
3
पोटजाती जितक्या जास्त तितकी भाषा अधिक समृद्ध होते हा जगभरातील अनुभव आहे. त्या दृष्टीने डाॅ. चवरे यांच्या नवीन पुस्तकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
विश्रामबागवाड्याचे ऐतिहासिक महत्त्व प्रस्तुत लेखातून दिसून येते. पेशवेकालीन वैभव हे जसे या वास्तूने पाहिले तसेच सामाजिक परिवर्तनाचे या देशातील उद्गाते म.फुले यांचा तत्कालीन सरकारने केलेला गौरवही पाहिला .
— प्रा डॉ सतीश शिरसाट. लंडन.
4
सर न्यूज स्टोरी टुडे चा प्रवास अतिशय वेगवान आणि समर्थपणे चाललेला आहे. खूप अभिमान वाटावा असाच. हा प्रवास असाच चालत राहो. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
— शुभांगी गान. ठाणे
5
भुजबळ साहेब, आम्हां सर्व वर्ग मित्रांना आपला अभिमान वाटतो. विविध विषयांवर आपले संकलन असते. तुम्हां दोघांना खूप खूप शुभेच्छा🙏
— मंगेश काळे. नगर.
6
सन्मा श्री भुजबळ साहेब,
नमस्कार.
आजच्या न्युज स्टोरी पोर्टलच्या माध्यमातून या पोर्टल शी जोडलेल्या अनेक मान्यवर लेखक आणि कवी यांच्या योगदान व बजावलेल्या भूमिका यासंदर्भात घेतलेला आढावा अप्रतिमच आहेत विशेषतः अमेरिकिका – कॅनडा सफर डॉ भास्कर धाटावकर, सौ निलाताई बर्वे, तसेच पोलीस खात्यातील अनुभव लिहीणा-या सौ देशमुख मॅडम, सौ भाबल मॅडम यांचे जीवन चरित्र, या उल्लेखनीय लिखाण याचा उल्लेख आपण अतिशय सुंदरपणे केले आहे. शिवाय माझ्या वडिलांचे चरित्र, अंधार यात्रीचे स्वप्न, माझे आत्मचरित्र अजिंक्यवीर, चंद्रकला कादंबरी तसेच हुंदके सामाजिक वेदनेचे या सामाजिक विचारावरील लिखाणांचा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन आणि धन्यवाद !!
आपल्या न्युज स्टोरी पोर्टलच्या माध्यमातून अनेक अदलखलपात्र लेखक कवी यांच्या लिखाणाला उजेडात आणल्याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन आणि धन्यवाद देणे मला गरजेचे वाटते.
आपण आणि सौ अलका भुजबळ मॅडम यांच्या कार्यकर्तृत्वाला हॅट्स ऑफ करतो. आपल्या न्युज स्टोरी पोर्टलच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आपले हे कार्य असेच पुढे चालू राहावे हीच आमची मनोकामना व शुभेच्छा !!
आपला शुभेच्छूक
— राजाराम जाधव. नवी मुंबई.
7
अभिनव उपक्रम महान 💐
— नीला बर्वे. सिंगापूर
8
असो चैतको मयना….. कविता आवडल्या.
डॉ विजय पांढरीपांडे … यांचा विद्यार्थी भलताच हुशार… खरे आहे शिक्षकाला किती अभिमान वाटत असेल अशा गुणी विद्यार्थांचा…. नंतर नाते जाणून तर खूपच आनंद झाला… दोघांचे हार्दिक अभिनंदन.
पुण्याची ..खाणेसुमारी वाचून मजेशीर वाटले… किती कमी लोक…. खरेच सध्याच्या एका इमारतीत याहून जास्त लोक असतात… अबब ..काय हा लोकसंख्या विस्फोट
शैलेशजींचे वाचन अफाट आहे जाणवते .. येन आणि यिन यांचे तत्वज्ञान उत्तमच आहे …. त्याचा पगडा त्यांच्यावर दिसतो… दोन्ही ही कविता आवडल्यात.. नॉस्टॅल्जिया … भाड्याची सायकल बरी
वसुंधराताईंचा निगेटिव्ह बॉम्ब कुठेना कुठे आपल्यावर आदळतोच.. आभासी जगाच्या किती मागे लागावे हे समजाविणे कठीण होत चाललेय.
— स्वाती वर्तक. मुंबई
9
कवी गोविंद पाटील यांनी आपल्या “शलाका” या कवितेतून शेवटच्या चार ओळी मधून आईचे कर्म (काम) सांगितले आहे. कोणत्याही मुलाला शाळेत पोहचवण्याचे काम बहुदा आईलाच करावे लागते. स्वयंपाक करणे,जेवायला वाढणे, (रांधा वाढा उष्टी काढा) ही कामे तर आई करतेच परंतु मुलाला शाळेत पोहचवून काळजावर दगड ठेवून ती घरी येताना जे कठोर कर्म तिच्या हातून होते ते एखादा न्यायाधीशच काय इंजेक्शन किंवा ऑपरेशन करणारा डॉक्टर सुद्धा करू शकत नाही.सारांश…आई लाड करायचे तेव्हा करते पण शाळेत पहिल्याने मुलाला पाठवताना वात्सल्य विसरून कठोर होऊन मुलाच्या भवितव्याचा विचार करते. हे कर्म फक्त जगातील आईच करते. धन्य ते मातृ कर्म !!!!🙏🙏🙏💐💐💐
— प्रा मनोहर यादव. सातारा
10
“शलाका”
कविता प्रासंगिक आहे शिवाय संदेशही देते.!
— प्रा चित्रकार, जेष्ठ साहित्यिक बी.एन.चौधरी. जळगाव
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
