Tuesday, February 17, 2026
Homeबातम्यालंडनची जॉर्जिया झाली मालेगांवची सून

लंडनची जॉर्जिया झाली मालेगांवची सून

लंडन ची जॉर्जिया आणि मालेगांव चा आय टी इंजिनियर कृष्णा यांच्यातील मैत्री-प्रेमाचे नुकतेच विवाहात रूपांतर झाले .
प्रेमाला सीमा नसते. प्रेम प्रत्येक बंधन तोडून त्याच्या गंतव्य स्थानावर येते. असेच एक उदाहरण समोर आले आहे.

खरे तर लंडन मधील तरुणी आणि मालेगांव येथील एका तरुणाने भारतीय संस्कृतीनुसार रितीरिवाजानुसार लग्न केले. या दोन प्रेमी युगुलांची मैत्री आणि प्रेम ५ जुलै रोजी लग्नाच्या बेडीत अडकले.

लंडन मध्ये राहणारी जॉर्जिया, भारतातील उत्तराखंडमध्ये प्रगत योगा शिबिरात प्रशिक्षण घेण्यासाठी आली असता तिथेच मालेगावातील आय टी इंजिनियर कृष्णा पवार यांची पहिली भेट झाली आणि पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांचे झाले. दोघांनाही एकमेकांचे स्वभाव आवडले, आवडी निवडी, छंद पटले आणि त्यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलला.

कृष्णा पवार हा हॉंगकॉंग मध्ये नोकरीस असून मालेगाव महानगरपालिकचे माजी शिक्षणाधिकारी मोठाभाऊ उदयसिंग पवार (केरसाने, तालुका सटाणा) यांचा कनिष्ट मुलगा आहे. त्याचे वडील बंधू श्रीराम पवार हे पोलिस निरीक्षक आहेत.

मंगळवारी ५ जुलै रोजी भारतीय रितीरिवाजांनुसार नाशिक येथील “आनंद रिसॉर्ट” महिरावणी, येथे सर्व नातेवाईकांच्या व मित्रपरिवाराच्या आशीर्वादाने भारतीय पध्दतीने हा लग्नसोहळा संपन्न झाला. त्यांचे लग्न पार पडल्यानंतर दिवसभर परदेशी वधूला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.

– टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. प्रेमबंथनाने साकारलेले आंतरराष्ट्रीय लग्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

मृदुला राजे on उज्ज्वल जीवन
Kavitha Tenny Nadar on झेप : 11