Thursday, June 19, 2025
Homeसाहित्यमाझी मराठी

माझी मराठी

माझ्या मराठीची माती
केशर कस्तुरीने न्हाते
फळबागा फुलविते
धान्यकणीस जोजविते

माझ्या मराठीची पुण्याई
इथे घुमते संतवाणी
भारूड, अभंग, ओव्या
किर्तन, भजन, वत्सल गाणी

झुळझुळ झरे निर्मळ नद्या
पाप धुण्या असती तत्पर
शेत, बागा फुलविण्या
तळी, पाट, कालवे सत्वर

मराठ देशाच्या रक्षणा
उभ्या गर्वात पर्वतरांगा
करते पंढरी विठ्ठलाचे
प्रक्षालन चंद्रभागा

माझ्या मराठी मातीत
जन्मले हो किती वीर
गाता पोवाडे तयांचे
अभिमानी भरतो उर

माझ्या मराठीचे वीर
शौर्य गाती शिवबाचे
जगी आहे मायबहिण
जिजाईचे

माझ्या मराठी मातीत
छावा सिंहाचा जन्मला
देश, धर्म रक्षणार्थ
छळ मरणाला नाही भ्याला

माझ्या मराठी मातीत
जन्मले फुले आंबेडकर
उद्धरील्या माय बहिणी
झाल्या अभिमानी साक्षर

माझ्या मराठी मातीत
जन्मले टिळक सावरकर
करण्या स्वातंत्र्य जागर
लढले राजगुरू आगरकर

माझ्या मराठी मातीत
उद्योगांचा सुकाळ
देती चालना हातांना
कल्पकतेला बुद्धीचे बळ

माझ्या मराठी मातीत
जन्मल्या हो कला किती
चित्र, शिल्प घडले अनेक
सामवेद गाते गानसरस्वती

माझ्या मराठीची महत्ता
समुद्रापार तिची सत्ता
परके आले गेले किती
तिची झळके गुणवत्ता

सुजाता येवले

– रचना : सुजाता येवले.
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

10 COMMENTS

  1. मराठी
    मायबोलीत
    माहिती युक्त रचना
    मस्त
    मजेत
    मांडलीय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?
शितल अहेर on पुस्तक म्हणाले…
सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…