Tuesday, June 17, 2025
Homeसाहित्यलेक नांदते नांदते…

लेक नांदते नांदते…

घुंगुराची गाडी माझ्या माहेरची आली दारी
गाडी पाहताच मना आली भलती उभारी
भाऊ उतरला आणि आला थेट उंबऱ्यात
आणि घेतला भरून थेट त्याला नजरेत …

मूळ सोडून सासरी येते नांदते हो लेक
माया ठेऊन पोटात करे संसार ती नेक
नाही ओळख पाळख अनोळखीच पाखरे
तरी करतेच प्रेम आणि वाढवी लेकरे….

नाही उसंत जीवाला हायउपसची सारी
फक्त कष्टण्यासाठीच जन्मा येते का हो नारी?
शिरावर भार किती तरी पेलते लीलया
तीन चिमट्या ती राख सरणावर जावया…

आब दोन्ही कुळांची ती तारेवर कसरत  
नेते निभाऊन सारे नाही कधीच हारत
असो काटे असो फुले धसे सहज तोडते
कोणावाचून तिचे हो फार क्वचित अडते..

ध्वज फडकतो तिचा कर्तृत्वाची असे शान
फक्त सोसतच जाते कोणी करो अपमान
तिचे “लक्ष्य” फक्त एक डोळ्यांसमोर ते घर
अपमानाला ठेवते जन्मभर ती उधार …

करा करा पर्वा जरा करा सन्मान नारीचा
तुमचाही असूद्यात त्यात वाटा हो खारीचा
तिच्या कष्टाला ना तोड जोड मिळणार नाही
नाती सारी निभावते मग बनते ती आई ….

प्रा. सुमती पवार

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments