“विसावू आता नव्या वळणावर !” सेवानिवृत्त झालेली प्रत्येक व्यक्ती असेच ठरवत असते. मित्रहो ! मी स्वेच्छानिवृत्ती नंतर, लेखनाधीन झाले. उपजतच, माझ्यात कवी मन व लेखन करण्याची आवड होती. मग काय ! राहून गेलेली ही इच्छा आता पूर्णत्वाकडे न्यायची, असा ठाम विचार करून, मी विसाव्याकडे न वळता, मी माझ्या छंदाकडे वळले.
सन २०२० मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि लगेचच जगावर कोरोना नावाचा महाकाळ कोसळला. सर्व जग थांबले. कामधंदे, उद्योगधंदे तर मुंबईची लाईफ लाईन ठप्प झाली. प्रत्येक व्यक्ती भीतीच्या चक्रव्यूहात सापडली. टेलिव्हिजन वरील बातम्यांमधून कोरोना संक्रमित संख्या व मृतांची संख्या ऐकून, मन अगदी बिथरून गेले होते. भेदरलेली मनस्थिती, स्थिरावण्यासाठी मला लाभले “न्यूज स्टोरी टुडे” वेबपोर्टल !
पोर्टलचे संपादक, श्री. देवेंद्र भुजबळ सर, त्यांची सहचारीणी सहसंपादिका-निर्माती, माझी मैत्रीण सौ. अलका व जिच्या कल्पक बुद्धीतून साकारला “न्यूज स्टोरी टुडे” या वेबपोर्टलचा जन्म, ती त्यांची कन्या देवश्री, अश्या त्रिवेणी संगमाची आकाशी झेप होय.
“न्यूज स्टोरी टुडे” पोर्टल मी रोज वाचत असे. असाच माझा एक लेख “भित्यापोटी ब्रह्मराक्षस” माझ्या ग्रुपवर पाठवला. अलका, आमचीच मैत्रीण ! तिने तो वाचला आणि लगेचच तिचा फोन मला आला, “तुझा छानसा एक फोटो मला पाठव. तुझा लेख मी पोर्टलवर घेत आहे.” त्या दिवशीचा तो आनंद, आजही मला आठवतो. मी कुणी मोठी लेखिका नाही, तरी माझा लेख “न्यूज स्टोरी टुडे” पोर्टलवर गेला. ही बाब माझ्यासाठी कौतुकास्पद होती.
जगातील ८६ देशांमध्ये वाचले जाणारे हे पोर्टल, माझी ओळख घडवून देणार होते. “जीवन प्रवास” या माझ्या आत्मकथनाचे २५ भाग “न्यूज स्टोरी टुडे” पोर्टलवर टप्प्याटप्प्याने प्रसारित झाले. वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळत होता. सोबत कोकण कन्या या नात्याने माझ्या अधून मधून मालवणी कविता “न्यूज स्टोरी टुडे” पोर्टलवर झळकत होत्या. माझ्या आप्तेष्टात, मित्रपरिवारात तसेच न ओळखणाऱ्या व्यक्तींकडून, माझ्या कवितांसाठी व लेखांसाठी उत्तेजक प्रतिसाद मिळत होता. खरंच, मी मोठी कवयित्री किंवा मोठी लेखिका नाही. तरी माझ्या या छंदाला नावलौकिक मिळवून देणारे, आमचे “न्यूज स्टोरी टुडे” पोर्टल आहे.
माझ्यासारख्या नवोदित लेखक व कवींना, भरारी घेण्यासाठी “न्यूज स्टोरी टुडे” ने मोठी संधी प्राप्त करून दिली आहे. “न्यूज स्टोरी टुडे” तू माझ्या वाटचालीवर मला हात देणारा सोबती आहेस !
आज “न्यूज स्टोरी टुडे” पोर्टलला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. पोर्टलचे संपादक मा. श्री. देवेंद्र सर, निर्माती सौ. अलका मॅडम, तुम्ही उभयतांनी नवोदित लेखकांना व कवींना, हक्काचा, आपुलकीचा प्लॅटफॉर्म दिला आहे. मला आज अभिमानाने सांगावेसे वाटते की, माझ्या “जीवन प्रवास” आत्मकथन लेखांचे पुस्तक रूपांतर करून, माझ्या पुस्तकाचे प्रकाशन “न्यूज स्टोरी टुडे” पोर्टलची निर्माती सौ. अलका मॅडमनी केले आहे. “समाजभूषण २” व “मी पोलीस अधिकारी झाले” या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन, सौ. अलका मॅडमनी करून, “न्यूज स्टोरी टुडे” ला प्रकाशनाच्या वळणावर आणले आहे.

माणुसकीतला माणूस म्हणजे भुजबळ दांपत्य ! जणू त्यांनी “न्यूज स्टडी टुडे” पोर्टलला प्रेमळ व आपुलकीचा कस्तुरी गंध लावून, जगभर सातासमुद्रापार, दरवळत ठेवण्याचा उगम घडवून आणला आहे.
“न्यूज स्टोरी टुडे” हे पोर्टल, माझ्या सेवानिवृत्तीच्या वळणावर, माझ्या मनातील गोष्टी बिनधास्त लेखणीत उतरवण्यासाठी, मला गवसलेली कस्तुरी आहे.
“न्यूज स्टोरी टुडे” तुझ्या या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त शतशः प्रणाम !
तुझ्या पुढील उत्तुंग भरारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

- — लेखन : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Warmest congratulations on your achievement! It’s great to know that your art is reaching an audience who cherishes it. Wishing you even more success in the future to Mamma…I’m incredibly proud of you. I saw you work so hard every day to achieve this accomplishment. You set an amazing example for everyone especially for us
Very Proud of you 👏👏👏
Thank you Newsstorytoday portal, Alka Maushi and Devendra Kaka that they believed in her and her work & welcomed her to be part of their team..
Keep going…
Achieve more & praise your dreams…
Tq tq 🤝🤝 sonali ur best wishes give us strength