Saturday, June 14, 2025
Homeसाहित्य"बालपणीचा पाऊस"

“बालपणीचा पाऊस”

पहिल्या पावसात भिजताना
विसरपडे सार्‍यांचा नकोत कोणी सोबती,
वा बोलणे आईचे, बाबांचे
घामोळ्यासाठी भीजू दोघी ||१||

मृद् गंध दरवळे आसमंतात
टपोरे थेंब तोंडात घ्यावे
थंड स्पर्श पाण्याचा हुडहूडी भरे
विजांचा होता कडकडाट धुम पळावे ||२||

गोठ्यातली जागा सुरक्षित
वार्‍याच्या वादळात टपटप पडती आंबे
वेचण्यासाठी होती भांडणतंटे
कधी सुकी डहाळी पडता सर्व थांबे ||३||

हिरव्या कुरणावर टोल पकडूनी
माश्याच्या गळास लावता मिळे मासा
कदाचित बेडकाचे पिलू गवसे
पण सत्य उलगडता सगळे हसा ||४||

गमबुटात बसे साप म्हणोनी
लपवालपवी बुटांची करती
कौलारातून थंड थेंब तोंडावरी
गरम चणे, शेंगदाणे रोज मिळती ||५||

अंजली सामंत.

— रचना : अंजली सामंत. डहाणू
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. लहानपणाचा पाऊस आठवला मॅडम.. खूप छान कविता🌷

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments