Wednesday, June 18, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचे पडसाद आपल्या पोर्टल वर उमटले आहेत. अजूनही आपण सर्व जण या धक्क्यातून सावरलो गेलो नाहीत. असो.
आता वाचू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)


नमस्कार.
विमान “अपघात ” की “घातपात “?
हा आपला लेख वाचला आणि मन सुन्न झाले.पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे हे आणखी एक नवे रूप असावे अशी शंका नव्हे खात्रीच वाटायला लागते. कारण, नाही म्हटले तरी पाकिस्तान ही दहशतवादाची फॅक्टरी आहे हे या पूर्वी अनेक वेळा सिद्ध झालेले आहे.केंद्र सरकारने या बाबतीत कठोर पावले उचलून खरे काय ते शोधून काढायला हवे.
— उद्धव भयवाळ. छ. संभाजीनगर

सगळेच लेख, कविता नियती पुढे मानव किती हतबल आहे, हेच दर्शवितात.मन सुन्न सुन्न होत जातं …
आपला लेख विचार करायला लावणारा आहे…
तसेही आज व्हिडिओ आलाच आहे की अफगाणिस्तान मध्ये कट शिजला असावा !
— स्वाती वर्तक. मुंबई

सर,
मोहना कारखानिस यांचा लेख अतिशय विचार करायला लावणारा आहे.
— शुभांगी गान. ठाणे

माध्यमभूषण डॉ किरण चित्रे… या यश कथेवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत….


माध्यमभूषण सुश्री किरण चित्रे यांच्या वाढदिवसानिमित्त🍟💐 हार्दिक अभिनंदन व शुभेच्छासह त्यांच्या समस्त परिवारास निरोगी निरामय🍿 आयुष्य लाभो हीच साहित्य शारदादेवी जवळ मनापासून प्रार्थना. 🌹
— नंदकुमार रोपळेकर. मुंबई

भुजबळ साहेब,
फार छान माहिती दिली डॉ किरण चित्रे मॅडम बाबतीत 💐.
— डेक्लोन पेन.
निवृत्त अभियांत्रिकी सहायक, मुंबई दूरदर्शन केंद्र.

किरण चित्रे: फार सुंदर लेख.. जुन्या आठवणी जागृत झाल्या.🌹🌷
— प्रियंवदा गंभीर. पुणे

अन्य प्रतिक्रिया पुढील प्रमाणे…


नमस्कार सर,
उज्ज्वलाताई केळकर यांची खेळण्याचे दिवस ही कथा वाचली. सहज साधी कथा पण मनाला हलवते. ‘खेळणी भंगारात देण्यापेक्षा झोपडपट्टीतील गरीब मुलांना दिल्यास त्याना न परवडणारी महागडी खेळणी मिळाल्याचा खूप आनंद होईल’ असे कुठेतरी मनात पक्के ठेवून खेळणी देण्यास गेलेल्या भाऊसाहेबांचा झालेला भ्रमनिरास यथास्थित दृग्गोचर होतो. सुंदर कथानुवाद.
डाॅ.विद्या मंत्री यांच्या नणंदबाईना काव्यमय शुभेच्छा आवडल्या
— श्रद्धा जोशी. डोंबिवली

नेत्रदान नव्हे “नेत्र भेंट”  उत्तम विचार. लेखिकेला धन्यवाद.
— डॉ गोविंद गुंठे.
निवृत्त दूरदर्शन संचालक, नवी दिल्ली

पद्मश्री डॉ डांगरे यांच्याबद्दल वाचून नतमस्तक व्हावेसे वाटते.खूप छान माहिती दिली आहे नीलाताईंनी. धन्यवाद.
कल्याणीताई, अगदी बरोबर. मला देखील नेत्र भेट हा शब्द आवडला.
उत्तम उहापोह.
वटपौर्णिमा विषयावर पुरुषांनी ही आपली लेखणी वापरली आहे .. वाचून छान वाटले.
नरेंद्र कौर यांची कथा छान अनुवादित केली आहे आवडली उज्ज्वला ताई.. खरी चपराक लगावते.
— स्वाती वर्तक. मुंबई

आदरणीय संपादक श्री देवेंद्र भुजबळ साहेबांचे “गगन भरारी” हे भरारी प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक सुंदरच असेल. कारण स्त्रियांविषयी फार कमी लेखक लिहितात. तो मुद्दा सरांनी खोडलेला आहे.
— गोविंद पाटील. जळगाव

शुभांगी पासेबंद यांनी दिलेला “गगनभरारी” पुस्तक परिचय खूप सुंदर आहे सर यात एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. बहुतेक मधमाशी कशी विविध फुलांवर फिरून “मन” शोषून घेते ऐवजी “मध” शोषून घेते असे असेल.
— खाजा बागवान. पुणे

(उपरोक्त दुरुस्ती करण्यात आली आहे. श्री बागवान यांचे मनःपूर्वक आभार. — संपादक)

माझी जडणघडण भाग ५२ अभिप्राय

लेक सासरी गेली, तरी  तिच्या आठवणीने पित्याच्या मनाची होणारी तगमग, तिच्या संपर्कात राहण्यासाठी होणारी धडपड  तुझ्या पप्पांच्या तारे वरून कळते. आमचे बाबा ही वरचेवर पत्र पाठवीत असत. त्यांची सुवाच्य अक्षरांत लिहिलेली आंतरदेशीय पत्र मी अजून जपून ठेवली आहेत. तुझे सहज सुंदर लिखाण मनाला भावते. “पिता हा पिता असतो, लेकीच्या बाबतीत जरा जास्तच हळवा असतो.”
— सुमन शृंगारपुरे. पुणे

राधिका…
नेहमीच्या शैलीत किती सुंदर लिहिलं आहेस तू .. तुझ्या पप्पांनी पाठवलेल्या तारा म्हणजे एक सुंदर अनुभव आहे की ज्याचा मी विचारही केला नव्हता… वाचताना मनात येतं की अशा वडिलांची मुलगी होता येणं हे तुझं केवढं मोठं भाग्य आहे ! या माणसाला आपण एकदा तरी भेटायला पाहिजे होतं आणि नमस्कार करायला पाहिजे होता असे मला वाटले.. पप्पांचा साहित्यिक आणि सुसंस्कृतपणाचा वारसा तू खूप छान जपला आहेस !!!
तारेतील मजकूर वाचून मलाही खूप मजा वाटली आणि त्यांचं तुझ्याकडे ओढाळलेलं मन मला उमजलं !!!
अशीच लिहिती रहा..
मला सुद्धा हे सर्व वाचताना नुकतीच वीस वर्षे पूर्ण केलेली मी, नगरच्या आमच्या तीन मजली मोठ्या वाड्यात आणि माझ्या सासऱ्यांच्या वकिलीच्या रुबाबात मी सुद्धा सुरुवातीला खूप चाचपडतच होते. पण सासरच्या सर्व लोकांच्या सुसंस्कृत आणि संस्कारित वागण्यामुळे मी तिथे कशी मिसळून गेले हे मला समजलेच नाही.. एखाद्या वेळेस लहान वय असल्याचा हा परिणाम असेल…
— सुचेता खेर. पुणे

मस्त “पप्पा..”
— सुमती पवार. नाशिक

सुरेख वर्णन. लग्न झालेल्या मुली बाबत वडीलांची काळजी व तिच्या नवीन आयुष्य घडणार्‍या घटना.
— श्रीकृष्ण भांडारकर. अमळनेर

नमस्कार सर.
स्त्री म्हणजे काय ? याचे महत्व अधोरेखित करणारी, नवीन व्याख्या सुचवणारी राधिकाजींची जडणघडण आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई

अतिसुंदर!
स्त्री ची तू केलेली *स्त्री म्हणजे सासर आणि माहेर यात विभागले गेलेले एक संतुलित व्यक्तिमत्व*
ही व्याख्या अगदीच पटली.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका

खूपच छान 👍
— पूनम मानुधने. जळगाव

अतिशय हॄद्य तार !
एक पिता आणि त्याची सासरी गेलेली कन्या यांच्यातील मायेचा जो अनोखा लेखाजोखा तुम्ही मांडला आहे तो कल्पनातीत आहे. पण ते वास्तव होते/आहे. सोनटक्क्याला फुले आलीत आणि त्या सुगंधात तूच आहेस ! ओहोहो ! अशी दोन हॄदयांची ‘तार’ जुळलेली असणे केवळ ममतेचा कळसच !
स्वभाव, संस्कृती आणि संस्कार यांच्या प्रात्यक्षिकाची कठीण परीक्षा असते हे वाक्य म्हणजे नवविवाहित स्त्रीच्या स्त्रीत्वाबद्दलचे, तिच्या अभिव्यक्तीचे मापदंड म्हणून सांगता येईल. तुम्ही या भावुक जडणघडणीत जे मुक्त चिंतन केले आहे ते देखील उत्तम आहे. स्त्री ची व्याख्या करताना सासर माहेर या घरांचा तोल ही कल्पना भारी वाटली. विवाह म्हणजे “अंधारातील उडी” ही कल्पना देखील कटु वास्तव दर्शविते.
मला पुन्हा एकदा जाणवले की तुमच्या जडणघडणीत आई पेक्षा वडिलांचाच वाटा अधिक असावा. मे बी आईंचाही असेल पण तो तुमच्या लेखनात उत्कटपणे आलेला नाही. आला असल्यास माझ्या वाचनात आला नाही. असो. लेखनशैली as usual छान आहे. या लेखांचे आत्मचरित्र करताना पुनर्लेखन करावे लागेल हे मी पुन्हा उधॄत करतो. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
— पुरुषोत्तम रामदासी. मुंबई

किती छान लिहीते ग तू. पुन्हापुन्हा वाचलं तरी समाधानच होत नाही.
पप्पाच्या आठवणीने माझेही डोळे ओले झालेच.
तू हौशीने लावलेली बाग, तो सोनटक्का, डाळिंबाची लालचुटुक फुलं …… किती आनंद व्हायचा एक फूल उमललं तरी.
तुझ्यामुळे आमची जडणघडण झाली.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव, मुंबई
१०
बिंबा, इतके कसे गं छान लिहितेस ? त्या तारेतला मजकूर वाचेपर्यंत माझ्याही काळजाचा ठोका चुकला ! आपले पप्पा म्हणजे खरच एक वल्ली होते !
— आरती नचनानी. ठाणे
११
“तार” वाचली. पूर्वीच्या काळी तार आली म्हटली की एक धसका बसायचा. कांही तरी वाईट बातमी आहे अस गृहीत धरले जायचे. चांगली बातमी म्हणजे फार तर वाढदिवसाच्या शुभेच्छाची तार असायची आणि ती वरच्या कव्हर वरून ओळखली जायची. फुलांचा बहर आलाय किंवा तुझ्या सारखे जमले नाहीं अशा साध्या पण कौतुकाच्या गोष्टी तारेने कळवणारे वडिल मी पहिल्यादाच पाहिले आणि मन भरून आले. अभिमान वाटला. राधिका तू खरच लक्की आहेस तुला असे वडिल मिळाले. माझ्या वडिलानाही माझे खूप कौतुक होते. पण व्यक्त करण्याची पध्दत वेगळी होती. तुझ्या जडणघडणमुळे आमच्या जडणघडणाच्या अनेक आठवणी जाग्या होतात आणि मनाला वेगळा आनंद देवून जातात.
— रेखा राव. मुंबई
१२
Bimba, felt very nostalgic reading तार, Now everything is so different. Sometimes I feel lucky that we can get in touch with our children, c them whenever we want to. I haven’t got any letters from my mother but surprisingly our friend from Virar has my mothers each n every letter.
— Sandhya Jangle. Mumbai
१३
“तार” शब्दामागे होणारी घालमेल, परंतु नंतरचा सुखद धक्का. छान सांगितले आहे, राधिकाताई.
‘स्री’ नक्की तिचे स्थान, तिची भूमिका 👌👌
— छाया मठकर. पुणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?