Homeसाहित्य"स्त्रियांचे कैवारी"

“स्त्रियांचे कैवारी”

स्त्रियांच्या प्रगतीमागे बाबासाहेबांचाच हात
प्रत्येक गरीब, सामान्य जनतेचे नेते होते
शिक्षणाचा अधिकार त्यांच्यामुळे मिळाला खास
वारसा हक्क हिंदू कोड बिलाद्वारे संरक्षण होते – १ –

संविधानिक हक्क मिळवून दिला स्त्रियांना
मतदान अधिकार मिळाला त्यांच्यामुळे स्त्रियांना
घटस्फोटाचा अधिकार तो प्राप्त झाला स्त्रियांना
पुनर्विवाहाचा अधिकार दिला त्यांनी स्त्रियांना – २ –

दत्तक घेण्याचा अधिकार मिळाला तो स्त्रियांना
अनिष्ट अशी देवदासी प्रथा बंद केली त्यांनी
मालमत्तेचा अधिकार प्राप्त झाला तो स्त्रियांना
बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद घातला त्यांनी – ३ –

समान कामाचे समान वेतन ही त्यांच्यामुळे
नोकरीचा हक्क मिळाला तो स्वावलंबी व्हायला
प्रसूतीची रजा मंजूर झाली स्त्रियांना त्यांच्यामुळे
स्वतंत्र व्यक्तिमत्त्व मिळवून दिले त्यांनी स्त्रीला – ४ –

— रचना : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रज्ञा आठल्ये on “आशा भोसले”
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 2
निलकंठ घिवारे on माझी जीवन नौका : 1
कांचन दळवी on माझी जीवन नौका : 2
राघवेंद्र कुलकर्णी on माझी जीवन नौका : 2
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय