नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात सदरात आपले स्वागत आहे. थोर गायिका आशा भोसले यांच्या निधनाने जगभरातील त्यांचे चाहते शोक व्यक्त करीत आहेत. त्याचे प्रतिबिंब साहजिकच आपल्याही पोर्टलवर उमटले आहेच. आशाताईंना विनम्र अभिवादन.
मागच्या आठवड्यापासून आपल्या पोर्टलवर सौ वेदवती कुलकर्णी यांची “माझी जीवन नौका” ही लेखमाला सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या पहिल्याच भागाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सर्व प्रतिक्रिया आपण पोर्टल वरील त्यांच्या लेखाखालच्या कॉमेंट बॉक्स मध्ये अवश्य वाचा. तसेच WhatsApp वर प्राप्त झालेल्या काही प्रतिक्रिया पुढे देत आहे.
१)
“शब्दप्रभूती आहेत सौ. वहिनी..रसाळ भाषा.. लिहिण्याचा अंदाज..अगदी सहज पण प्रसंगांना ताजेतवाने करण्याची अलंकारिक शब्दांची नेमकी गुंतवणूक..अप्रतिम..लिहित रहा..मनातील विचार कागदावर व्यक्त करणे.. प्रतिभेचाच आविष्कार..
मुकुंद, तुझ्या पत्नीने खूपच छान सुरवात केली आहे. पुढचे भाग ऐकायला निश्चित आवडेल. “त्यांना माझा दंडवत अन् पुढील लिखाणासाठी शुभेच्छा..
— सोमनाथ सोळंकी. नाशिक
२)
“मुकुंद, सौ वेदवती यांनी लिहिलेल्या लेखाच्या पहिल्या भागाची सुरुवात खूपच उत्कंठा वाढवणारी आहे.”
— श्री फणसे. विलेपार्ले, मुंबई
३)
“खूप छान लेखन पुढील भाग वाचायला आवडतील”
— विजय साठे. पुणे
४)
“खूप छान लेखन पुढील भाग वाचायला आवडतील”
— श्रीमती पाटील. मुंबई
वाचकांच्या अन्य काही प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
1.
‘कुणीच खरे बोलत नाही’ जणू काही हे आपले सामाजिक ब्रीदवाक्य झाले आहे. खरं बोलण्यापेक्षा खोटं बोलून फायदा आहे असं वाटल्याने हा शाॅर्टकट चोखंदळा जातो.
दृष्टीहीनांना अक्षर ओळख व्हावी या उदात्त भावनेतून लिहिलेल्या ब्रेन लिपीतील पुस्तकांचे मोल नेहमीच्या साहित्यापेक्षा मोठे आहे. याला प्रसिद्धी देऊन तुम्ही फार मोठी सामाजिक बांधीलची भूमिका बजावली आहे. 👍🏻
— प्रा डॉ सतीश शिरसाट. लंडन
2
आपला संवाद मानव जातीच्या विकासासाठी करायचा की विनाशासाठी…? अगदी बरोबर प्रश्न विचारलाय सतीशजींनी… आणि त्याचे उत्तर श्री भुजबळजींच्या पुस्तकातून मिळतेच ..त्याच्या विषयांची योग्य निवड हे सार्थ करीत असते.
वाणीजी “पंख मिळाले शब्दांना” मध्ये खूप सुंदर व्यक्त झाल्या आहेत
आवडली कविता.
वेदवतीजींच्या आठवणी वाचायची उत्सुकता असून छान सुरुवात झाली आहे.
स्नेहाताईंनी हनुमान महती छान सांगितली आहे.
वसुंधरा यांचा ..निळा सावळा ..म्हणजे एक तरल काव्यच आहे ..इतका सुरेख जमलाय लेख.
सफाई मित्रांचा गौरव व्हायलाच पाहिजे.. कोरोना काळात केलेले त्यांचे कार्य तर अभूतपूर्व च होते
डॉ पांढरीपांडे यांची कविता छान संदेश देणारी आहे.. आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई
3
नमस्कार भुजबळ साहेब
आपले हार्दिक अभिनंदन आपण संवाद भूषण मधून अनेक महननीय व्यक्ती भेट योग घडविला. त्यामध्ये १९९३ साली माझ्या काव्याकुंज प्रोग्राम रेकॉर्डिग वेळीं भेटलेले खाकाळ साहेब पोतकंठी साहेब आदी आठवले आपणास विशेष धन्यवाद यासाठी माझ्या प्रवरा परिवारातील उदयोन्मुख पत्रकार शिव चरित्र व्याख्याता व माझ्या पत्रकार मित्राचे चिरंजीव साईप्रसाद कुंभकर्ण यांच्याशी झालेल्या संवादाला संवाद भूषण मध्ये स्थान देवून सन्मान केला समाधान वाटले. फार दिवस झाले संगमनेर भेटीला. इकडे येण्याचा योग झाला तर भेटूया. सुरेश म्हाळस सरांची आठवण सजीव झाली.
असो पुनश्च अभिनंदन व धन्यवाद🌹🙏🏻.
— यशवंत पुलाटे.
4
श्री देवेंद्र भुजबळ सर व अलकाताई यांना,
स. न. वि. वि.
आपला ३१.३. २०२६ चा अंक वाचला. फार फार आवडला. भगवान महावीर आदर्श विचार झेप डॉ. विजया जी वाड यांची सर्व प्रकारची झेप आणि कार्य लेखनाला अंतःकरणापासून सलाम !!
‘अरिहंत’ ही हेमंत मुसरीप यांच्या कविता अत्यंकजैन तत्वाची ओळख करून देणारी आहे. एकंदरीत सर्वांग सुंदर अंक आहे.
— अलका रामचंद्र मोहोळकर. पंढरपूर
5
घोडविंदे मॅडम,
आपण चतुरस्र अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या भावविश्वावर आपल्या लेखणीने जो प्रकाश टाकला आहे, त्यातून एक वाचक म्हणून आम्ही अधिक समृद्ध झालो आहोत. आपण त्यांच्या मनातील भाव अचूकतेने शब्दबध्द केलेत आणि या स्वार्थी दुनियेवर कोरडे ओढलेत त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन…!!
— प्रा.मार्तंड औघडे.
6
आजपर्यंत या झाडाबद्दल आणि फुलाबद्दल काहीच माहिती नव्हते. पण आपल्या लेखामुळे ही नवीन माहिती मिळाली. हे झाड आणि फूल पाहण्याचा जरूर प्रयत्न करीन. ह्या नाविन्यपूर्ण लेखनाबद्दल आणि यथोचित संपादनाबद्दल आपण आणि श्री.देवेन्द्रजी अभिनंदनास पात्र आहात.
मन:पूर्वक अभिनंदन..🌹
— देवदत्त साने, पुणे
— टीम एन एस टी. ☎️ +91 9869484800
