Homeसाहित्यपरिचारिका

परिचारिका

आज जागतिक परिचारिका दिन आहे. त्या निमित्ताने सर्व परिचारिकांना विनम्र अभिवादन.
– संपादक

सेवावृत्ती, निष्ठा, माणुसकी
रुग्णास शर्थीने वाचवताना
परोपकारी वृत्ती आपुलकी
रुग्णसेवेत काम करताना…

रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा
मानून करते अहोरात्र सेवा
दुःख कष्ट सेवेत विसरते
वेळेतच देते रुग्णांना दवा…

विरांगना असे धडाडीची
सर्वांना समान वागवणारी
रणरागिणी ती सेवेकरीची
रुग्णांस नित्य आधार देणारी…

नतमस्तक तिच्या कार्याला
सेवेचा वसा सांभाळणारी
प्रणाम सेवाभाव तत्परतेला
सेवेतच स्वजीवन जगणारी…

गरीब श्रीमंत मोठा लहान
कर्तव्य जागून करते सेवा
सारे तिच्यासमोर एकसमान
दुखण्यात आधार होई महान

मीना घोडविंदे

— रचना : मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

Previous article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments