Homeबातम्याललित : टेक 3, असो मायना चैतको

ललित : टेक 3, असो मायना चैतको

ललित मासिकाचा जुलै 2026 चा अंक आताच हातात पडला. काय वाचलेच पाहिजे असे आहे, हे चाळता चाळता “साभार पोच” सदरापर्यंत पोहोचलो आणि न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्सने मे महिन्यात प्रकाशित केलेल्या कवी चित्रपट लेखक- दिग्दर्शक प्रदीप दीक्षित यांच्या टेक 3 या मुक्त छंद आणि कविता संग्रहाची आणि त्याच्याचखाली  कवी प्राचार्य डॉ रामदास चवरे यांच्या असो मायना चैतको या कलाली बोली भाषेतील पहिल्या कविता  संग्रहाची नोंद आढळली आणि मन आनंदून गेले.

हे दोन्ही कविता संग्रह  खरोखरच अशासाठी वैशिष्टय़पूर्ण आहेत की, टेक 3 या मुक्त छंद आणि  कविता संग्रहाच्या नावावरून लक्षात येते, त्या प्रमाणे कवीच्या 50 वर्षांच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील अनुभव, संदर्भ, भेटलेली माणसं, त्यांचे स्वभाव यांचे  दर्शन या  मुक्त छंद आणि कविता संग्रहात घडते.

तर असो मायना चैतको या कविता संग्रहात कवी प्राचार्य डॉ रामदास  चवरे यांनी त्यांची मातृ बोली असलेल्या कलाली बोलीत कविता लिहून,  त्या कवितांचा संग्रह प्रकाशित करून एक प्रकारे मातृ बोली चे पांग फेडले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, या कविता  संग्रहातील कलाली बोलीतील शब्दांचे अर्थ प्रमाण मराठी भाषेत दिले असल्यामुळे कविता एकदा वाचून समजली नाही तरी, शब्दार्थ वाचले की मात्र लगेच अर्थ लागतो आणि कवीच्या जीवन दृष्टी आपल्याला चकित करून जाते.

आपापल्या क्षेत्रात अतिशय जेष्ठ आणि श्रेष्ठ असलेल्या या दोन्ही मान्यवरांनी न्यूज स्टोरी टुडे  सारख्या नवख्या  प्रकाशन संस्थेवर जो विश्वास दाखविला, त्याबद्दल त्यांचे आणि ललित मासिकाने दोन्ही पुस्तकांची नोंद घेतली, या बद्दल ललित चे  मनःपूर्वक आभार.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments