Homeबातम्यानागपुर : वैद्यकीय शिक्षण सत्र संपन्न

नागपुर : वैद्यकीय शिक्षण सत्र संपन्न

“मधुमेही न्युरोपॅथिक वेदना आणि त्याचे व्यवस्थापन” या विषयावर नुकतेच नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन, नागपूर आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्स यांच्या संयुक्त विद्यमाने निरंतर वैद्यकीय शिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्स, मुंबई चे उपाध्यक्ष डॉ. शंकर खोबरागडे यांनी प्रमुख वक्ते म्हणुन मधुमेही न्युरोपॅथीचे निदान, उपचार आणि आधुनिक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी रक्तातील साखरेवर योग्य नियंत्रण ठेवणे आणि पुराव्यावर आधारित उपचारपद्धतीचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. त्रिशला धेमरे, भूतपूर्व अध्यक्षा, बायो आणि डॉ. संजय जैन, सचिव, आय एम एस सि जी पी हे होते. शहरातील फिजिशियन व आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रश्नोत्तर सत्रानंतर कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments