नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात…….. सदरात आपले स्वागत आहे. सध्याचे वातावरण पाहता त्याचे प्रतिबिंब आपल्या पोर्टलवर दिसणे स्वाभाविकच आहे. आणि हीच आपली संवेदनशीलता आहे. एक शांततापूर्ण, सुंदर, स्वच्छ जग बनविण्यासाठी आपण आपल्या परीने कटिबद्ध राहू या.
आता पाहू या गेल्या काही दिवसांत प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
धन्यवाद.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ. (संपादक)
देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या “संवाद भूषण” पुस्तकाचे यथार्थ वर्णन खूप समर्पक, छान केले आहे. 👍🏻
“आठवणीतील विद्यार्थिनी” मधील विद्यार्थिनी सारखे कित्येक शिक्षकच कधी कधी आपल्याला वास्तवात आणून सहज ज्ञान देतात, वास्तवाची जाणीव करून देतात. ओघवत्या, शैलीत अनुभव सांगितल्यामुळे मनाला स्पर्श करून गेला.👏
— स्नेहा मुसरीफ. पुणे
2
फारच सुंदर प्रेरणादायी पुस्तक काढले शिवाय तरुणांना योग्य मार्गदर्शन, कुठल्याही गोष्टीचे भय न ठेवता मार्ग शोधत रहावा, कुठल्याही आजाराचे भय नको फारच सुंदर संदेश देणारे पुस्तक आपले लक्ष्मी नारायणाचे काम खूप वाखण्यासारखे आहे, नवीन पिढीला चालना फारच अनमोल पाठवली.
— शोभा कोठावदे. नवी मुंबई.
3
मा. श्री देवेंद्र भुजबळ सर, सौ. अलकाताई भुजबळ यांना स. न. वि. वि.
सुंदर जगण्यासाठी नाती जपा हा लेख खूप आवडला. आपण “खिडकी ” हे सदर सुरू केल्याबद्दल आनंद वाटला. सर्वच अंक वाचनीय !!
आठवणीतील विद्यार्थीनी नी विचार करायला लावून अक्षरशः डोळ्यात पाणी आले. (ज्येष्ठांची अवहेलना वाचून) सत्य समोर आणल्याबद्दल खरंच लेखक सरांना धन्यवाद !
— अलका रामचंद्र मोहोळकर. पंढरपूर.
4
वाचन हे जीवनात जसा आनंद मिळवून देतं तसेच ते चिंता नाहिसं करते. यासारखे अनेक फायदे स्पष्ट करणारा सुरेख लेख.
— प्रा डॉ सतीश शिरसाट. लंडन
5
वाचन संस्कार आणि रश्मिरथी हे दोन लेख अतिशय आवडले. आजच्या पिढीने ते वाचले तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल.
— निरंजन राऊत. विरार
6
कृष्ण की चेतावनी ….
हे दिनकरजी यांचे महाकाव्य निःसंशय अप्रतिम आहे. छान लिहिले आहे ..त्यांचा हा उपक्रम ही सुरेख आहे .. लोक येऊन बसतात म्हणजे किती स्पृहणीय.
दोन तीन ओळी कवितेच्या दिल्या असत्या तर खूपच आनंद झाला..
याच भागात जेव्हा कृष्ण म्हणतात मला बांधून ठेवणार तू दुर्योधना…
बाँधने मुझे तू आया है ? जंजीर बड़ी क्या लाया है ?
यदि मुझे बाँधना चाहे मन, पहले तो बाँध अनन्त गगन।
सूने को साध न सकता है, वह मुझे बाँध कब सकता है !
दिनकर यांचे शब्द …अतिशय ओजस्वी, तेजस्वी असे मनाला भिडणारे… गंमत म्हणजे माझ्या वडिलांना ते अतिशय सन्मान देत आणि गुरु प्रमाणे मानत.
डॉ प्रभा वाडकर यांचे आभार .. एका सुंदर पुस्तकाची आठवण करून दिली
राधाताईंचा वाचन संस्काराचा लेख छान आहे. जपानच्या चित्रातून पुस्तकाचे वजन दाखविण्याची किमया फार पटली.
डॉ आनंद महाजन यांची कविता अतिशय हृद्य आहे…
गंड बद्दलची मीमांसा सहज सांगत लेख नीटस उमटला आहे वसुंधरा ताईंचा.
— स्वाती वर्तक. मुंबई
7
रश्मीरथी कवी दिनकरांचं अतिशय सुंदर काव्य आहे आणि डॉक्टर प्रभा यांनी त्यावर सुंदर विवेचन केलं आहे.
— शुभांगी गान. ठाणे
8
आजची “स्तब्ध” कविता वास्तववादी असून मनाचा ठावं घेणारी, सुरेख आहे. समर्पक नावं आहे. 👍🏻
— सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
9
“रश्मिरथी”…..
खूप छान लेख.. तुमचा ही वाचन उपक्रम चांगला आहे.. बागेत येणाऱ्या व ऐकणा- या लोकांची प्रतिक्रिया खूप छान व बोलकी..रश्मिरथी कवी दिनकरजींचे सुंदर महाकाव्य आहे.. हिंदी तील माझे आवडते कवी..बी ए ला हिंदी साहित्याची थोडी फार ओळख झाली आहे.. महाभारतातील कथा व त्यातील प्रसंगावर आधारित ही काव्य रचना आहे.. युध्दाच्या आधी कुंती व कर्ण यांच्या भेटीचा प्रसंग विलोभनीय आहे.. कुंती ची हतबलता अस्वस्थ करुन जाते.. महाकाव्य अतिशय सुंदर आहे.. प्रभा तुम्ही पुस्तक वाचत व चर्चा छान उपक्रम करत आहात.. जुन्या अभ्यासाची आठवण व उजळणी करून दिल्याबद्दल धन्यवाद…
— स्वाती कार्ले. चिपळूण
10
‘खिडकी’ तील आजी खूपच ग्रेट! भावस्पर्शी स्टोरी.👌🏻
11
“हलकं फुलकं”…
पुरुषच काय ? अहो, स्त्रियाही सहमत असतील. खरंय ना हो ? .. बघा, आमचे अहो सुद्धा हो, हो म्हणताहेत. 😆
— सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
12
मी मूळ नागपूरची आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही डॉक्टर मला अतिशय चांगल्या रित्या माहिती आहेत. खरंच ते दोघेही अतिशय चांगले आहेत आणि खूप चांगलं काम त्यांनी केलेले आहे.
— शुभांगी गान. ठाणे
13
शंभूराज देसाई… हे यादवजींचे विद्यार्थी .. खरोखरच आठवणीत राहण्यासारखे .. सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्याची त्यांची संकल्पना विद्यार्थी दशेतच स्पष्ट होती ..असे विद्यार्थी बघून प्राध्यापकांना आनंद मिळतच असेल.
सावे यांच्यासारखे कृषी तज्ज्ञ आपल्या राष्ट्राला आणखी मिळावेत ही इच्छा आणि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
अनुराधाताईंच्या वस्त्रांविषयी आठवणी अतिशय भावपूर्ण, वास्तविक आणि मायाळू स्पर्शाच्या वाटल्या.. छान
हेमंतजींची कविता वाचनीय…
— स्वाती वर्तक. मुंबई
14
जुनी वस्त्रे.. खूप सुंदर लिहिले आहे. वर्णन वाचून सारे डोळ्यांसमोर दिसत होते. 👌🏻
— सौ स्नेहा मुसरिफ. पुणे
15
🌹देवेंद्र भुजबळसर 🌹
दिव्यत्वाची प्रचिती, तेथे कर माझे जुळती पहिल्याचं दिवशी आली प्रचिती
त्यांनी बोलतचं राहावे,
आपण ऐकतचं राहावे
अवघे सभागृह मंत्रमुग्ध झाले
शब्दाशब्दातून जाणवली
सामाजिक बांधिलकीची जाण
सलाम देवेंद्रजी तुम्हांस
खरेचं आहात महान
ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी
वेबपोर्टल आपुले आहे
खजीनाच प्रत्यकासाठी
वानीवरती विराजली जनू सरस्वती
शोभलात तुम्हीं खरेच
,,चौथास्थंभचे,,चे मानकरी
नवतरूनांना लाभते मोलाचे मार्गदर्शन
अलका, देवश्रीने केले जीवन परिपुर्ण
देवेंद्रजी तुम्हांस आमुचे
त्रिवार वंदन, त्रिवार वंदन
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
— कवयित्री आशा दळवी, फलटण 💐सातारा
“माझी जीवन नौका” या वेदवती कुलकर्णी लिखित लेखमालेवर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया. …
1
वेदवती,
आत्ताच तुझे सातव्या भागाचे वर्णन वाचले. किती सुंदर आणि तपशीलवार लिहिले आहेस. तुझा जहाजवरील आगळावेगळा संसार हा आमच्या ही कुतुहलाचा विषय आहे.सतत हलणारे प्रचंड जहाज, त्याचबरोबर सतत ऐकू येणारे आवाज. हे किती वेगळे आणि थोडे भयप्रद ही वाटले. पण तुझे uptodate घर फारच आवडले. एकूण सगळे पॉश, आधुनिक. पण थ्रिलिंग आयुष्य पण त्यातही देवासमोर उदबत्ती लावून संस्कार जपणारी आणि सुनबाई, वहिनी, मामी काकू असे टप्पे पार करत मॅडम झालेली तू. वाचताना डोळ्यासमोर उभी राहिलीस तर मॅडम आता पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
तुझीच,
रजनी
2
वेदवती
तुझा शीप वर खऱ्या अर्थाने सुरू झालेला संसार. वाचताना खूप मजा आली साधा फोडणीचा भात आणि बटाट्याची भाजी. पण, ती स्वतः केलेली त्यामुळे खूप गोड लागली असेल. तुझे तपशीलवार वर्णन त्यामुळे ते सगळे डोळ्यासमोर उभे राहिले.
तुझीच
रजनी
🌷🌷🌷🌷🌷
3
वेदवती,
तुझी लिहीण्याची शैली ओघवती आहेच. सगळं चित्र डोळ्यासमोर उभं करतेस. तू ते सगळं आत्ता जगतीयेस असं वाटतं. कमाल आहे.👍👍👍👍
— सुमित्री
4
वेदवती
आजचा तेरावा भाग खूप मोठा, खूप माहिती देणारा आहे. पण तो तू फार छान रंगवला आहेस. वाचताना मी त्याच्यात इतकी रंगले की माझं मलाच भान राहिलं नाही. तुझ्याबरोबर मी ते सगळं पाहत आहे असंच वाटलं. भाग पूर्ण वाचून झाल्यावरच थांबले. पुढच्या भागाची खूप उत्सुकता आहे.
तुझी,
— ज्योती तळपदे
5
वेदवती,
नवीन लग्न.. जहाजावरचा संसार..लुटूपुटू चा स्वयंपाक.. किती गोड आठवणी! मागे वळून बघताना तुला निश्चितच मजा येत असेल! आणि वाचताना आम्हाला!
— मीना लागू. पुणे
सौ रश्मी हेडे यांच्या ‘मैत्रीची सहल’ या लेखाला मिळालेल्या प्रतिक्रिया.
१) रश्मी तुझे लिखाण नेहमीच छान असते पण हे सहलीचे वर्णन अतिसुंदर,,,,,,असे वाटते की आपण पण सहलीला गेलेलो की काय
— राणी मांजरकर. सातारा
२) वा वा खूप छान ट्रिप चे वर्णन. आपले कास पठार हे दुसरे मिनी काश्मीरच आहे. मी जरी ट्रिप ला आले नसले तरी तुझा लेख वाचताना मी तुझ्यासोबतच आहे आणि मी पण ट्रिपचा आनंद घेत आहे असे वाटले.
— विशाखा खुटाळे.
३) मैत्रीची सहल
रश्मी खूप छान सहलीचे वर्णन केलेले आहेस वाचताना एवढे रममान झाले की जणू मी त्या सहलीमध्ये सहभागी आहे असे वाटत होते.
हे वाचताना प्रत्येकाला असेच वाटत असणार. खूप छान ❤️ 👌🥳
— उर्मिला पालकर.
४) रश्मी, तु मैत्रीच्या सहलीचे वर्णन खुपच छान केलेस. जेवण छान झाले होते. म्हणून असे वाटले बहुदा वजन जास्त झाल्याने गाडी जात नसावी.👌👌लेखनात वाक्य रचना खुपच छान सहलीचे वर्णन सुंदर लिहिलस तुला खुप खूप शुभेच्छा…💐🍫🙌🌹
— पुष्पा वहिनी.
५) खूप सुंदर पद्धतीने सहली बदल माहिती दिली वाचून असे वाटू लागले की आपण प्रत्यक्षत सगळं अनुभवत आहोत.
— ममता कुंदप.
६) 👍👆 रश्मी मॅडम एकंदर आपल्या सहली विषयी छानच वर्णन सहलीचा एक वेगळा अनुभव आनंद सर्वांच्या ध्यानात मनात आणून ठेवला खरोखर आपले मी मनापासून आभार मानतो. खूप छान
— प्रकाश सर.
७) कास आणि बामणोली ला आम्ही सुद्धा फिरण्याचा अनुभव घेतला मैत्रीणीची आठवण झाली खुप सुंदर शब्दांकन मैत्रीची सहल असेच सुंदर लिखाण करा रश्मी वहिनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐
— स्वाती कासार. नाशिक
८) रश्मी तुझी मैत्रीची सहल वाचली खरंच खूप छान लिहिलेस आणि प्रत्यक्ष आनंद अनुभवलास वर्णन खूप छान मलाही वाचून तुझ्या सोबत आहे असे वाटले.
— अलका जगदाने. नाशिक
९) सुंदर सहलीचं वर्णन सुंदर शब्दात केले आहे. सदर वर्णन वाचताना वाचकास देखील रममाण होऊन सहलीचा प्रत्यक्ष अनुभव आल्यासारखे होते. सर्वजण आपला जिव्हाळा प्रेम आपुलकी जपत सहलीचा आस्वाद घेत होता. शेवटी काय सुंदर माणसाची सुंदर सहल. 🌹🙏🌹
— दिपक जवकर. मुंबई
१०) सुंदर लेख 🌹💐
रश्मीताई, दोन चार दिवस विश्रांती घेऊन आपण लेखणीच्या कानात जादुई शब्दांची फुंकर मारून लेखणीला अक्षरे रेखाटण्यासाठी मोठे बळ दिलेत. त्यातून अप्रतिम अशी साहित्यकृती निर्माण झाली. मैत्रीच्या सहलीच्या सुरवातीपासून ते परत येईपर्यंतच्या सर्व घटनांचे अद्भुत असे वर्णन केले आहे. सहलीला न येणाऱ्या मंडळींनी हे वर्णन वाचून जणू आपण खरोखरीच सहलीला जाऊन आल्यासारखे वाटेल अशी छान रचना आपण केलेली आहे. लेखामध्ये अधेमधे रंगीबेरंगी फोटोंची उधळण करून तुम्ही त्यास जिवंतपणा आणलात. अधेमधे केलेली फोटोंची योजना ही खरेतर अफलातून अशी कल्पना आहे. अवघ्या योगा वर्गाला आपण सुंदर अशी साहित्यिक भेट दिलीत. सगळ्यांना या लेखामुळे आनंद झाल्याचे आलेले कौतुकाचे शेरे ही तुमच्या खात्यात जमा झालेली समाधानाची संपत्ती आहे. मनापासून कौतुक आणि अभिनंदन ! 💐
— अनंत कांबळे.
११) खूप छान लेख रश्मी ताई 🥰 आपली Trip खूप छान वर्णन केली इतर तर छान लिहिलंच आहे… मला भावलेलं खास करून रंगी बेरंगी छत्री ते विलोभनीय दृश्य हा भाग ☘️🌹 निसर्गच काय सुंदर वर्णन केलं आहे 😁😍👍🏼🙏
— सरिता
१२) मी डॉक्टर कडे पुण्याला गेल्यामुळे मला या ट्रिपचा आनंद घेता आला नाही, मात्र रश्मीने “मैत्रीची सहल” या उत्कृष्ठ लिखाणाने मी हीं प्रत्यक्ष सहलीत सहभागी झाले होते की काय ?!!!!! असे वाटायला लागले आहे, रश्मी हीं एक उत्कृष्ट लेखिका असून तिच्या अशा प्रकारच्या अप्रतिम लिखाणामुळे तिला जिल्हा स्तरावरीलच काय पण राज्य स्तरावरीलही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. रश्मी तुला तुझ्या साहित्यिक कार्याला भर घोस यश मिळो हीच महाकालिका देवी चरणी प्रार्थना 🙏🙏❤️❤️
— आशा कुंदप.
१३) आपल्या क्लास मध्ये एक एक हिरे आहेत त्यापैकी एक लेखिका रश्मी ताई हेडे 💐मैत्रीची सहल हया लेखात रश्मी ताई नी खरोखर खूपच सुंदर त्यानी आपल्या शब्दात ट्रीपचे वर्णन केलेले आहे 💐त्यानी हा लेख लिहून आम्हाला एक सरप्राईज गिफ्ट दिल्यासारखेच आहे खूप खूप धन्यवाद रश्मी ताई 🙏
— राजू ओसवाल.
१४) 🙏 रश्मीताई खूप छान लेख एवढं कसं लक्षात ठेवलं सगळं एकदम छान🙏💐
— माया कांबळे.
१५) पुन्हा एकदा ट्रीपला जाऊन आल्यासारखे वाटले.
— प्रमिला सोनवणे
१६) रश्मीताई अगदी बोलका लेख वाचताना जणू प्रत्यक्ष अनुभवत आहे. ✨💫🎊💃
राजेश्री भोसले.
१७) 🌹🌹🌹🌹🌹🌹
रश्मीताई अतिशय सुंदर असे तुमच्या सहलीचे वर्णन केले खरंच वाचून खूप छान वाटले. तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला. असे वाटले की आम्ही तुमच्याबरोबरच आहोत.
खरोखरच तुमचा योगा ग्रुप अतिशय छान आहे अशीच तुमची सगळ्यांची मैत्री कायम राहून जीवनाचा आनंद लुटत रहा व त्यासाठी खूप खूप शुभेच्छा🙏
— ज्योती यंदे. पुणे
१८) मैत्रिची सहल खूपच मनाला भावली थोड्या वेळासाठी असे वाटले की आम्हीं पण तुमच्या बरोबर या पावसाळी सहलीचा आनंद घेतला खूपच छान👌👌👍❤️🥰
— मनीषा हेडे.
१९) खूप छान रश्मी असं वाटत होतं मी पण तुझ्याबरोबर तिथे एन्जॉय करत आहे एक नंबर 🫶🫶👌
ज
— ज्यती कासार
२०) 🙏 रश्मीताई खूप छान लेख एवढं कसं लक्षात ठेवलं सगळं एकदम छान🙏💐
— अजिनाथ पवार
२१) 👏👏👏👏👏👏💐💐💐 अप्रतिम लेख रश्मी ताई खुपच सुंदर क्षण तुम्ही लिखाणातून जपून ठेवले खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन 👌👌🌹🌹
— शोभा भिसे.
२२) सहलीचे वर्णन वाचुन काही क्षणासाठी असे वाटले की आपणही या सहलीत सामील आहोत की काय ? छान शब्दांकन 👍👍👍
सुहास इंदूरकर. अमरावती
२३) 👍खरच खूप मस्त वर्णन केले आहेस मला फार आवडले मैत्रिची सहल लेख सुंदर वर्णन केले आहेस तुझे मनापासुन अभिनंदन
— माणिक तंटक. पुणे
२४) रश्मी तु केलेल्या वर्णनावरून सहल खूपच छान झालेली कळतंय! ओसवाल दांपत्याने ते आजी आजोबा झाल्याचा आनंद तुमच्या सोबत साजरा केला खुप छान कल्पना…! 👌🏻👌🏻👍🏻
— सविता हेडे.
२५) अप्रतिम लेख खूप छान👌👌😍
— कांचन
२६) 1नं हं रश्मी. खुप सुंदर सहलीचे वर्णन केले.👌👌
— हेमा खुटाळे.
२७) मैत्रीची सहल खूप छान लेख संपूर्ण ट्रीपचे वर्णन प्रत्येक क्षण डोळ्यापुढे उभे केल्याबद्दल धन्यवाद 🙏
— प्रमोद राजे
२८) खूप छान लिहिलेस…ट्रिप ला जाऊन आल्या सारखं वाटलं… सुंदर ❤️ — ज्योती मुरुडकर.
२९) वाह मस्त धमाल
अनिल नागपूरकर. नागपूर
३०) रश्मी सहलीचे वर्णन खूपच सुंदर लिहिले आहेस
— सुनंदा नवले.
३१) अप्रतिम लेख खूप सुंदर
— अरुणा गोसावी.
३२) रश्मीताई अप्रतिम लेख आहे
— शिल्पा चौकवले.
३३) 👍🏻अप्रतिम लेख रश्मी ताई तुमचे लेखन फार सुंदर असते 🥰🙏🏻
— आशा नवथरे
३४) खूप छान रश्मी तुझे लेख खूप छान असतात.
— संगीता पालकर. पुणे
३५) खूप छान 👍🏻 मी पण वाचून पिकनिक एन्जॉय केली ☺️
— साधना इंदूरकर. अमरावती
३६) छान लिहिलेस… एक दिवस…. निसर्गमध्ये…. मैत्रीच्या ओलाव्यात आणि मनाच्या शांततेत 👌👌
— नेहा वडके.
३७) अविस्मरणीय सहल… अतिशय सुंदर व सुबक वर्णन रश्मी… पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा 💐💐💐💐
— दिपक गोरे. मुंबई
३८) खूप सुंदर सहलीचे वर्णन जणूकाही आपणच आहोत एन्जॉय करतोय…👍
— सुरेखा गाडेकर. पुणे
३९) खूप छान लिहिले आहे आम्हाला ही वर्णन वाचून सहलीचा आनंद मिळाला 🙏🏻
— शीतल झुटिंग.
४०) रश्मी खूपच छान लिहिले मैत्रिणींची सहल एक निसर्ग रम्य ठिकाण आणि अविस्मरणीय क्षण👌🏻👍
— नंदा झुटिंग.
४१) सुंदर लिहिले आहे….शब्दरचना सुरेख आहे
— वैशाली नाफड.
४२) अविस्मरणीय आणि धमाल सहल मैत्रिणींनी सोबत. बेस्ट 👌👌👍
— जाधव
४३) मस्त, मस्त ! छान. रशमीजी मला तुमचे लिखाण आवडते. शुभेच्छा 👍🙏
— ज्ञानदेव कासार. पुणे
४४) खुप छान योगा ग्रृप मधिल मैत्री ची सहल 🥳👌👍
— संगीता सासवडे. पुणे
४५) खूप सुंदर लेख लिहिला आहे लेख वाचताना आपण पण योगा ट्रिपला जॉईंट व्हावं असं वाटलं खूप सुंदर 👌🏻👌🏻👏🏻
— प्रियांका झुटिंग.
४६) खूपच छान वर्णन सहलीचे वाह….
— नंदकुमार कोळपकर. नाशिक
४७) सुंदर लेख
–स्नेहा देवी.
४८) खूपच छान रश्मी ताई मस्तच 👌👍😍💐💐
— आरती कलबुर्गी.
४९) छान प्रवास वर्णन👌👌👍
–महेश कोकीळ.
५०) लेख वाचून पुन्हा एकदा सहलीला गेले चे समाधान मिळाले खूप खूप छान लेख लिहिला आहे रश्मी.
— जाधव काकू.
५१) खूपच छान.
–जया पालकर.
देवेंद्र भुजबळ यांच्या “दिसते तसे नसते”….या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया..
1
कृत्रिम बुध्दीमत्तेच्या साहाय्याने समाजात खोट्या बातम्या बेमालूमपणे त्यावर करून सामाजिक वातावरण गढूळ केले जाते यावर प्रबोधन करून पत्रकार ही भूमिका जगणाऱ्या भुजबळ सरांचा वाचनीय आणि मार्गदर्शनपर लेख.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. लंडन.
2
नमस्कार सर,
कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) खरोखरच दिसते तशी नसते. आता कितीतरी व्हिडिओ या कृत्रिम बुद्धीमत्तेनेच तयार केलेले असतात. ते खरे नाहीत हे कळायला सुद्धा वेळ लागतो. सायबर क्राईम सुद्धा असेच होत आहेत. उदा. मुलीच्या/मुलाच्या आवाजाचा वापर करून वडिलांना फोन करून पैसे पाठविण्यास सांगितले जाते. तर कधी रुग्णालयात दाखल केले आहे असे सांगून पैशांची मागणी केली जाते. राज्यशासनाची कित्येक पत्रे व्हाट्स ॲपवर प्रसारित केली जातात. नंतर कळते की, ती कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून पाठविली होती. आपण लिहिल्याप्रमाणे याबाबत जसजशी अधिकाधिक माहिती मिळत जाईल तसतसे गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच जाणार आहे. लवकरच शासनाला याबाबत काही नियम तयार करून याच्या वापरात शिस्त आणावीच लागेल. सावधान करणारा छान लेख.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली.
3
हो, खरं आहे. कितीतरी ग्रुप्सवर असे काही मेसेजेस किंवा व्हिडिओ येतात की त्यांच्या सत्यतेबद्दल शंका वाटावी आणि गुगलमध्ये सर्च केल्यावर बहुतांशी fake असतात परंतु पुष्कळजण त्यावर विश्वास ठेवून ते पुढे फॉरवर्ड करीत असतात. कधी कधी गंभीर कॉमेंट्स लिहितात आणि हे प्रकार फक्त भारतातच चालले आहेत असे नाही तर जगभर चाललेले आहेत. काहीजण अशा बातम्यांवर विश्वास ठेवून व्हिडिओ बनवून ते युट्युबवर टाकतात. हल्ली अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे शेतातल्या तणांप्रमाणे उगवली आहेत. ज्यांचे नांवही कधी ऐकले नाही की त्यांना फारशी प्रसिद्धीही नाही असे तथाकथित मिडियावाले युट्युबवर अशा बातम्यांचे आरडून ओरडून पुष्टीकरण करीत असतात आणि त्यांना viewers ही मिळतात आणि हा हा म्हणता अशा फेक न्यूज सत्य समजून त्यावर लोक माते प्रदर्शित करीत असतात. कधी कधी यात लोकांचा दोष नसतो, कारण इतक्या बेमालूनपणे या बातम्या बनविल्या असतात की सर्वसामान्य लोकांचा त्यावर सहज विश्वास बसेल किंवा एकमेकांचा द्वेष करणारे तथाकथित पुढारी या बातम्यांचा फायदा घेऊन त्यावर विधाने करीत सुटतात. आपण एका मोठ्या, समाजात फूट पडेल अशा षडयंत्रसाठी वाचा फोडली आहे. खरोखर ही विषवल्ली वेळीच उपटून टाकायला हवी नाहीतर जगभर फार मोठे अनर्थ घडतील.
— नीला बर्वे. सिंगापूर
प्रकाश फासाटे यांचा ‘प्रवास अनंताकडे’ हा अत्यंत सुंदर लेख वाचला. व्हाॅयेंजर-१ या अवकाश यानाची माहिती,त्याचा अजुनही चालू असणारा प्रवास… प्रवासादरम्यान पाठविलेली माहिती… छायाचित्रे… त्यांचा शास्त्रज्ञांनी लावलेला अर्थ… सारेच अद्भुत, रोचक, गूढ.. अगदी थक्क करून सोडणारे ! इतकी अप्रतिम माहिती मिळाल्याबद्दल आदरणीय प्रकाश फासाटे यांचे खूप खूऽऽऽऽऽऽऽप मनःपूर्वक धन्यवाद.
प्रा. जावेद शेख यांचा “सिन्नरच्या वेशी” हा माहितीप्रद लेख वाचून सहा वेशींची माहीत नसलेली माहिती मिळाली. छायाचित्रेही छान. खरोखरच या वेशी, शिलालेख, देवालये इ.चा समावेश असलेले ‘सिन्नर हेरिटेज सर्किट’ विकसित व्हावे ही सदिच्छा.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली.
परम भयवाल चे खूप कौतुक करावेसे वाटते.. अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, विज्ञानदिन साजरा करणे यासाठी मराठी विज्ञान परिषद आणि आर्यन एज्युकेशनचे आभार
जंगल मंगल विद्यापीठ…. च्या लेखात चांगलेच कोरडे ओढले आहेत डॉ पांढरी पांडे यांनी ..छान
उमा भेंडे यांना आमचीही भावपूर्ण श्रद्धांजली
आजची पिढी ..कविता अत्युत्तम आहे आवडली..खरेच आजच्या पिढीला काही काळजीच नाही, बेदरकार आहेत, असे वाटते खरे.
— स्वाती वर्तक. मुंबई.
वित्तीय व्यवस्थापनावर उपयुक्त साहित्य. मराठीतही या स्वरूपाच्या ग्रंथाची गरज आहे.news story channel च्या माध्यमातून लेखमाला प्रसिद्ध केली तर ते उपयुक्त ठरेल..
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. लंडन.
सौ रश्मी हेडे यांच्या ‘अनोखा प्रवास’ या कथेला मिळालेल्या प्रतिक्रिया.
१) अतिशय सुंदर आणि डोळे उघडणारा लेख! आजच्या धावपळीच्या युगात माणूस पैशाच्या मागे इतका आंधळा झाला आहे की तो स्वतःच्या कुटुंबाला आणि मुलांना विसरला आहे. पैसा नक्कीच महत्त्वाचा आहे पण मुलांचे बालपण आणि त्यांचा पालकांसोबतचा वेळ पुन्हा विकत घेता येत नाही. फक्त कामाला महत्त्व देणं आणि बँकेतील शिल्लक वाढवणे याला आयुष्य म्हणत नाही. प्रत्येकाने हा लेख वाचून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे..👌👌🙏🙏
— विशाखा खुटाळे.
२) खूप छान लिहिले आहे. हे लिहण्यामागचा हेतू वाचन करणाऱ्या वाचकाच्या लक्षात येणे आवश्यक आहे.
— महेश मधुकर खुटाळे. (सर) राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक.
३) फारच सुंदर लेख! या लेखणीतून एवढंच लक्षात येते की नुसतं काम करून धन, संपत्ती, बँक बेलेंस वाढवण्या पेक्षा आपल्या मित्रांना आपल्या परिवाराला वेळ देणारी व्यक्ती हया जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
— राजू ओसवाल. (योगा परिवार) सातारा.
४) खूप सुंदर लिहिलंय रश्मीताई. आजच्या या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच जणांची अवस्था रोहित सारखीच होत आहे. या आपल्या कथेतून नक्कीच समाजात एक चांगला मॅसेज जाईल. शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.🙏
— भरत वनकुद्रे. कोल्हापूर.
५) मॅडम मस्त……
“अनोखा प्रवास” हा लेख सर्वांनी वाचणे गरजेचे आहे. कारण जगामध्ये अशी भरपुर संख्या आहे की ती केवळ पैशांमध्ये गुंतून एवढे जातात की त्यांना इतर कुठल्याच गोष्टींचे भान राहत नाही आणि जेंव्हा भानावर येतात तेंव्हा वेळ निघुन गेलेली असते. हे ह्या लेखामुळे तुंम्ही दाखवून दिलेत. त्याबद्दल खरोखर तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
🙏👆👍💐💐 आपणांत धन्यवाद.
— प्रकाश सर. योग गुरू
६) खूप छान रश्मी, आजच्या पिढीला आशा कथांची, सल्याची खूप गरज आहे.
उशीरा आलेले शहाणपण आणि कर्मा रिटर्न ह्या दोन्ही गोष्टी खूप छान लिहील्या आहे.
तुझे लेख छानच असतात. तुझी लेखणी अशीच अखंड चालू राहू दे हीच कालीका माते चरणी प्रार्थना.🙏
— संगीता पालकर. पुणे
७) आजच्या काळात भौतिक सुखाच्या मागे लागून माणूस छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेण्यास विसरतो, किंबहुना त्याचे त्याला महत्व लक्षात येतं नाही. पण…. एखादा प्रसंग असा येतो…. तेव्हा मात्र त्याला जगण्यातला खरा आनंद गमावल्याची जाणीव होते.
छान लिहिलेस रश्मी 👌as always 👍
— नेहा वडके.
८) खूप छान लिहिले आहे. आयुष्य जगताना समतोल साधला जावा पैसा सुख देतो पण समाधान आपल्या माणसात च मिळते. आनंद साजरा करायला माणसच लागतात. आयुष्यात पैशाला एक मर्यादेपर्यंतच महत्व असायला हवे सण उत्सव सहल सोहळे हे माणसांशिवाय साजरे करता येत नाही.
— शीतल झुटिंग.
९) खूप छान लिहिलं आहे रश्मी ताई काल खूप Busy होते so आज निवांत वाचला. शेवट आवडला देर आये दुरुस्त आये…. लक्षात आल्यावर तरी माणसाने चुका सुधाराव्या असे काही वचन समोर आले की आमच्या कडून अश्या चुका नाही होणार 😀so तुमच्या कडून असच नवनवीन छान छान वाचन आम्हाला मिळत राहो .
— सरिता खरात.
१०) वाह खूप छान लिहिला आहे रश्मी. अगदी बरोबर
— ज्योतो कासार.
११) खूप सुंदर
आयुष्य जगायचं कसं 👌🏻
— प्रियांका झुटिंग.
१२) बोध कथा खूप छान 👍
— साधना इंदूरकर.
१३) कथा अनोखा प्रवास छान लीहीली कथा रश्मी
— माणिक तंटक.
१४) खुप छान माणूसकिचा अनोखा प्रवास👌👍🙏
— संगीता सासवडे.
१५) जीवनाची योग्य दिशा आणि योग्य निर्णय 👏👍
— अर्चना जाधव.
१६) वाचता. उत्तम विचार आनंदी जीवनासाठी. 👍🙏
— ज्ञानदेव कासार. पुणे
१७) मस्त लिहिला आहे दिदी ग्रेट !
— कृतिका देसाई.
१८) सुंदर आणि सत्य लेखन, सध्या अशी कहाणी खूप जणांच्या घरी आहे.
— नाफड मॅडम
१९) खूप छान
जीवनात खूप मोठा मोलाचा सल्ला आहे 🙏🏻🙏🏻
— अश्विनी पालकर. कराड.
२०) खूपच छान 👌👏
— नाझिया शेख.
२१) जीवनाचा अर्थ सांगणारा लेख 👌
— तृप्ती खुटाळे.
२२) फारच छान 👌
— आरती
२३) अगदी बरोबर रश्मी मॅडम
— संभाजी दादा.
२४) खुपच सुंदर लेख 🌹
— शोभा भिसे.
२५) खूप खूप छान 🙏🏻
— मनीषा वराडकर.👍👌
२६) खूप सुंदर लिखाण.
— प्राजक्ता सासवडे.
२७) खूपच सुंदर लिहिले आहे रश्मी
— नंदा ताई झुटिंग.
आकाशवाणी ही कधीच टाकावू ठरणार नाही. आजही आणि शहरातही अनेकजण एकवेळ पडद्यावरची चित्रं पहात नाहीत. पण आठवणीनं रेडिओ ऐकतात. इथं इंग्लंडमध्येही आम्ही आकाशवाणीचे भोक्ते आहोत.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ.. लंडन.
प्रा. डॉ.विजय पांढरीपांडे यांचा,”इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे राजीनामे : काही विचार” हा लेख खूपच वास्तव उघडणारा आणि राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने भावस्पर्शी वाटला. खरे तर अतिरिक्त लोकसंख्या, दारिद्य्र, बेरोजगारी, आर्थिक विषमता हे भारतातील अर्थव्यवस्थेच्या प्रगतीतील अडथळे आहेत.परंतु वाढता भ्रष्टाचार हे या अडथळ्यांचे मूळ कारण आहे असेच म्हणावे लागेल! जोपर्यंत राष्ट्रभावना, आदर्श नागरिकता, dnyan अधिष्ठाता, प्रामाणिक मानवत्व ह्या गुणांची जोपासना होत नाही तो पर्यंत अशी राष्ट्र द्रोही प्रजा राष्ट्राला कमकुवत करण्यात व आपल्या भावी पिढ्या सर्वच बाबतीत भक्कम करण्यात धन्यता मानणार. याला मूल्य शिक्षण आणि कठोर शासन हेच उपाय आहेत, असेच म्हणावे लागेल…..🙏
— प्रा मनोहर यादव. सातारा.
डॉ पांढरीपांडे यांचा लेख विचारप्रवण आहे. राजीनामे का देत असतील .. खाजगी कंपन्या अधिक आकर्षक पगार देतात, त्यांच्या करिअर मध्ये ते प्रगती करू शकतात, संशोधनातील स्वातंत्र्य येथे मर्यादित वाटतं, सरकारी नोकरशाही, निर्णय घेण्यातील विलंब, अशी अनेक कारणे असतात.. हे डॉ नी व्यवस्थित मुद्देसूद मांडले आहे.
बाहेरच्या देशात ही कागदोपत्री चालणारी प्रक्रिया, कामाचा ताण आणि संशोधनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावून ही दुसऱ्याने लोणी खाणे असले प्रकार नगण्य असल्याने तरुण तिकडे आकर्षित होतात. हे मी अगदी जवळून बघितले आहे. राजीनामा देऊ नका असे सांगून काहीच उपयोग नसतो असंतोष वाढीस लागतो, डॉ म्हणतात त्याप्रमाणे ..विशेष वेतन वगैरे सुरू करूनही फारसा फरक पडलेला दिसत नाही, त्यांच्या विद्यार्थ्याचे उदाहरण पायाखालची वाळू सरकण्यास पुरेसे आहे.. ही आपल्या देशाची शोकांतिका आहे.. नेहमीच अळणी जेवण, मुळमुळीत बोल गरजेचे नसून असे झणझणीत अंजन घालणं गरजेचेच आहे.. धन्यवाद.
— स्वाती वर्तक. मुंबई
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
