Homeसाहित्यज्ञानेंद्रिये : कोण श्रेष्ठ

ज्ञानेंद्रिये : कोण श्रेष्ठ

हात म्हणतो मीच करतो सारे काम
हात जोडून जगाला करतो राम राम

हात आहे म्हणून सत्ताधारी वाटतो
मिळाले कुठेतरी फुकामधी चाटतो

अरे हट! बोटाने लक्ष्मीला मीच गोळा करतो
अंगठा दाखवून लुबाडतच सुटतो

करंगळीची धार मोठी कागाळीखोर
मधले बोट बया एक नंबरचे चोर

देवधर्म पुजनाला आंगठा वारेमाप
भाळी टिळा लावून त्याची पडते भारी छाप

सगळ्यांना अंकुश लावते भाऊ ओंजळ
भगवंताचे तिर्थ घेता मन करते निर्मळ

डोळा साऱ्या गंमती पाहून खूप थकला
डोळ्यापायी हिसाब किताब मारताच चुकला

डोळा दाखवता येते मौज मस्ती भारी
डोळा खुणावतो आणि जमवतोया यारी

कान म्हणतं साऱ्या जगाचे ऐकून सहन करतो
कशापायी डोळ्या तू माझ्यावर झुरतो

र र राजाला गाढवाचे जुळती कान
खऱ्या च खोट ऐकून चहाडीने पेटवतोया रान

नाक म्हणत खुपसायला तुलाच भारी जमतं
चांगले वाईट ओळखून फुकाच गुदमरत

जीभ म्हणते रसाळ माझी ऐकती गोड वाणी
सारे काही मला विचारती रसनेला कहाणी

दात सदा वेडंवाकडं चाखत दिसतं भारी
हलाया लागता दात ओठ चावाया उधारी

करपट ढेकर येऊन दात समद पडतं
म्हातार झाल म्हणून समद फुकात चिडवत

अरे पाया बिगर वैभव नाही नर नारीला
मजबूत पाय पैंजण जोड घालून धावत वारीला

पाया मंदी खुळखुळ वाजत जेव्हा पैंजण
भले भले मागं मोर फिरकती घालून अंजन

समद्यांचा वाद पाहून उठला धावला श्वास
मीच जातो पळून अन् लावा गळ्याला फास

सगळेच ठरले वेडे हरडे आणि कंगण
श्वासान घेतल जिंकून मिटलं एकदाच भांडणं

शोभा कोठावदे

— रचना : सौ. शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on खरा डॉक्टर