पुण्यातील संजय घोडावत विद्यापीठात ५ आणि ६ सप्टेंबर २०२६ रोजी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील पहिलीच शिखर परिषद ‘Élan Summit 2026’ (इलान समिट) आयोजित करण्यात आली आहे. नेतृत्व, उद्योजकता, वाणिज्य, सर्जनशीलता, संवाद कौशल्य आणि आव्हानात्मक परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता या सहा महत्त्वाच्या पैलूंना एकत्र आणणारे हे अभिनव व्यासपीठ असून, देशभरातील विद्यार्थ्यांना स्वतःची गुणवत्ता व कौशल्य सिद्ध करण्याची संधी या समिट मधून मिळणार आहे.
या समिटचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘Crisis Command’ आणि ‘Cent$ible’ हे दोन अनोखे उपक्रम. यापूर्वी सर्वत्र होत असलेल्या “मॉडेल युनायटेड नेशन्स (MUN) पेक्षा वेगळ्या स्वरूपातील ‘Crisis Command’ मध्ये पूर्वनियोजित चर्चांऐवजी प्रत्यक्ष बदलणाऱ्या राष्ट्रीय संकटांवर तात्काळ निर्णय घेण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर असेल. तर ‘Cent$ible’ मध्ये उद्योजकतेच्या कल्पना मांडणे, त्यांचे विपणन, आर्थिक नियोजन आणि प्रभावी सादरीकरण करून त्या सिद्ध करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

याशिवाय Open Stage, Cultural Night आणि Carnival या आकर्षक उपक्रमांमुळे समिटला सांस्कृतिक आणि सर्जनशीलतेचीही जोड मिळणार आहे. शिक्षण, नेतृत्व, नवोन्मेष आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा संगम घडविणारी Élan Summit 2026 ही विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रेरणादायी आणि संस्मरणीय पर्व ठरणार असल्याचा विश्वास या समिटचे संचालक अक्षित परमार, विभाग प्रमुख धनराज पाटील व आयोजकांनी व्यक्त केला आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
