Homeसाहित्यविरक्ती

विरक्ती

ती काढतेय चित्र
एकामागून एक रेखाटतेय
एकच झाड..
बदलताहेत ऋतू
तिच्या चित्रांचे ही रंग खुलताहेत त्याप्रमाणे
झाड एकच आम्रतरु…
इवलसं रोप, हिरवं शार
अपाराकडे कुतूहलाने पाहणारं
मग
भरलेलं गच्च, हिरव्या हिरव्या पानांनी नटलेलं
पूर्ण पर्णसंभार
तारुण्याने सळसळणारं
वाटलं तिचं तिलाच

मग मोठा पर्णहीन वृक्ष
त्या रुक्षपणाच्या
निष्पर्ण किती अवस्था
पण संत वाटतो तिजला,
पुनः चैतन्याची वाट निस्तब्ध पणे बघणारा
स्थिर षड्ज लावून तंबोऱ्याच्या स्वरात मग्न
झालेला योगी
दीर्घ उन्हाळा सोसत
मेघांची वाट पहात शांत ऋषी
नाव दिले तिने

खालच्या जमिनीशी असलेला
कर्माचा ऋणानुबंध..आला पर्जन्य
पाऊस येताच ..तिच्या झाडावरून
ओघळत राहिलेल्या पन्हाळी
पुनः पुनः काढत राहिली ती
नव पालवीची नव्हाळी
आतातर मोहोर अंगभर बहरलेला

आसमंत गंधाळलेला
भारलेली गर्भार
हे वर्ष वेगळे होते
प्रत्येक डहाळी
आंब्यांनी लगडलेली
नवी वेदना
नवे सृजन, नवा जिव्हाळा
काय नाव देऊ..
ओलेती तेजस्विनी

अंतर्मनाला गवसलेले विलोभनीय रूप
निखळ निर्मिती
सर्व आंबे वाटून टाकले तिने
कसे झाले ते आता
ओकेबोके, रिते रिते
खरेच ते रिते झाले का
की उलट सधन..
स्वतः चे सगळे दुसऱ्याला देऊन मिळणारी
कैवल्यवस्था..
काय असेल याचे नाव …

देऊन टाकणं म्हणजे संपणं नाही
हेच हुंकार उमटलेत
तिच्या अंतःस्थ काळजातून

स्वाती वर्तक

— रचना : सौ. स्वाती वर्तक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments