Homeसाहित्यजगा आनंदाने...

जगा आनंदाने…

काल ३५ वा जेष्ठ नागरिक होता. यानिमित्ताने आपणास सुदृढ, दिर्घ, निरोगी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छाऽऽऽ !!
– संपादक

जगण्याचे खरे वय साठ पुढील असे जी
उतारवयातही हातपाय ताठ असे
जगण्याचे खरे वय
साठ पुढील असे !! धृव !!

ना लहानपणाचा होमवर्क
ना तरुणपणाचा संघर्ष
ना चाळिशीची धावपळ असे
आता अलगद हातात जेवणाचे ताट असे
जगण्याचे खरे वय
साठ पुढील असे !! १ !!

ना शाळेची घाई
ना ऑफिसची किटकिट
ना बसला लावा रांगा
ना ट्रेनचा झमेला
आताही आपल्या कपड्यांची ईस्त्री ताठ असे
जगण्याचे खरे वय
साठ पुढील असे !! २ !!

सकाळी माॅर्निग वाॅकला जाई
दिवसा थंड कडक
उन्हा पावसात जाई
मित्रांच्या संगतीत चहा पियी
हास्य गप्पांचा माठ असे
जगण्याचे खरे वय
साठ पुढील असे !! ३ !!

ना आईवडिलांची भिती
ना ऑफिसात बाॅसचे लेक्चर
नातू- नाती सोबत खेळ मिळे मुलांचं- सूनेचे प्रेम
आदराने वाकते सर्वांची मान
ना गोळ्या सतराशे साठ असे
जगण्याचे खरे वय
साठ पुढील असे !! ४ !!

ना शाळेची शिस्त
ना ऑफिसात बोलायची बंदी
खुल्या हवेत फिरे नी बिंदास हसे
कोणालाही मार्गदर्शन करण्यासाठी जात असे
जगण्याचे खरे साठ पुढील असे !! ५ !!

ना अपेक्षा ना उपेक्षा
घेतले श्रम खातोय पेंशनचे फळ
घेऊया देऊया हि आनंदाची लाट असे
पण हि अनुभवाची वाट असे
अजूनही अभिमानाने आपली मान ताठ असे
जगण्याचे खरे वय
साठ पुढील असे !! ६ !!

सर्वांशी ऑनलाईन रहा
सात्त्विक विचारांना लाईक करा
आपले दुःख शेअर करा
एकमेकांना मदतीचा सबक्राईब करा
सर्वांना आनंदाच्या कमेंट करा
आपणांस शुभेच्छाच्या पॅक असे
जेष्ठ नागरिकांचे खरे वय
साठ पुढील असे !! ७ !

विलास देवळेकर

— रचना : विलास देवळेकर. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 98694 84800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments