Homeसाहित्यगणपती आरती

गणपती आरती

1 ) आरती

वंदुनिया माथा, हाती पंचारती

देवा श्रीगणेशा, करितो आरती ||धृ||

  1. चौसष्ट कलांचा,तुचि अधिपती
  2. प्रेमानंदे भक्त, जपासी स्मरती
  3. आराध्याचा मान, हृदयी करती
  4. देवा श्रीगणेशा, करितो आरती ||१||

गौरी शिव सूता, कार्तिकीच्या भ्राता
शिव पिंडी पुष्प, तू स्वयंभू त्राता
सुपारी तांबूली, रुप निरखती
देवा श्रीगणेशा, करितो आरती ||२||

लेखणी सुंदर, व्यासचि नमती
रिद्धी सिद्धी भार्या, धना वृद्धिंगती
शुभ लाभ देती, संस्कार संपत्ती
देवा श्रीगणेशा, करितो आरती ||३||

अष्टविनायक, गरजले स्थान
दर्शनासी येती, भक्तचि नेमान
भाद्रपद मासी, भक्त आनंदती
देवा श्रीगणेशा, करितो आरती ||४||

शोभा कोठावदे

– रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई.

2 ) गणाधिशा …

शुभारंभी नाम तव
तू देवाधिदेव आद्य
संकट करे परिहार
इप्सित होई साध्य

व्यासाचे महाभारत
लेखणी तुझ्या पद्य
मोहरले जीणे असे
असूनि रटाळ गद्य

संगीत प्रिय तुजला
आवडी वीणा वाद्य
सद्गुणांचे आगर तू
कलेत प्रवीण सिध्द

गुळ खोबरे लाह्या
प्रियतम तुझे खाद्य
प्रसाद मिळे सुग्रास
दावा मोदक नैवैद्य

बुध्दीमत्ता तव कृपे
नाठाळ होई सुविद्य
विद्यारंभे विवाहा चं
वंदनीय सदैव पाद्य

संकटे स्पर्शूनि पळे
गणेशकवच अभेद्य
निराकारे निरंकारी
व्याधीभले असाध्य

उत्सवतव घडो ईशा
अंतर्मन अतिव शुध्द
यथाशक्ती करे विधि
वंदे तुले आबालवृद्ध

हेमंत मुसरीफ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments