मराठी साहित्य सृष्टीला नवी दिशा देणार्या “ग्रंथाली” ने गेल्या पन्नास वर्षांत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून, उपक्रम हाती घेऊन देश विदेशात आपला ठसा उमटविला आहे.
ग्रंथालीचा एक दृकश्राव्य उपक्रम म्हणजे “साहित्य क्षेत्रातील महिलांचे योगदान” या वर सुरू करण्यात आलेली “प्रतिभांगण” प्रस्तुत “साहित्यव्रती” ही मालिका होय. अश्विनी भोईर यांची संकल्पना लाभलेल्या या कार्यक्रमात संवादकाची भूमिका देखील त्याच पार पाडीत असतात.

लेखिका, मुलाखतकार आणि ‘न्यूज स्टोरी टुडे’ वेब पोर्टलच्या निर्मात्या, प्रकाशक अलका भुजबळ यांची मुलाखत नुकतीच या मालिकेत प्रसारीत करण्यात आली आहे. या मुलाखतीत अलका भुजबळ यांनी आपला जीवन प्रवास उलगडून सांगितला आहे.

पारंपारिक कुटुंब पद्धतीत गेलेले बालपण, नोकरी करीत शिक्षणासाठी केलेली धडपड, विविध मराठी मालिकांमध्ये साकारलेल्या भूमिका, कॅन्सरवर मात केल्यानंतर लिहिलेले “कॉमा” पुस्तक, त्याच नावाने तयार केलेला आणि राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेला माहिती पट, ‘न्यूज स्टोरी टुडे’ वेब पोर्टल चे कामकाज, त्यातून सुरू केलेला प्रकाशन व्यवसाय अशी विविधांगी, प्रेरणादायी माहिती त्यांनी या मुलाखतीद्वारे दिली आहे.
ही मुलाखत आपण पुढील 👇 लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
आपल्या ✍️ प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत. ही मुलाखत आयोजित केल्याबद्दल ग्रंथाली परिवाराचे 🤝 मनःपूर्वक आभार.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
