Homeबातम्याकामगार चळवळ आणि साहित्य आज कुठे आहे ? - देवेंद्र भुजबळ

कामगार चळवळ आणि साहित्य आज कुठे आहे ? – देवेंद्र भुजबळ

जगभरातच वाढत चाललेल्या भांडवलदारशाहीमुळे कामगार चळवळ आणि कामगार साहित्य आज कुठे आहे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी केले. ते मराठी साहित्य परिषदेच्या कल्याण शाखेच्या वतीने, कल्याण येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात “कामगार चळवळीत साहित्याचे योगदान” या विषयावर बोलत होते.

साहित्य हे जगातील आणि आपल्या जगण्यातील सर्व बाबींना स्पर्श करीत असते. साहित्याचे जे काही विविध प्रकार आहेत, त्यातील एक मुख्य प्रकार म्हणजे कामगार साहित्य हा आहे. इथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, भारतात शतकानुशतके साहित्य निर्माण होत आलेले आहे. पण मुळात, ज्या अनेक बाबी पाश्चात्य देशांकडून भारतात आल्या, त्यापैकी औद्योगिक उत्पादन आणि ते करणारा कामगार घटक ही एक महत्वाची बाब आहे आणि त्यातूनच कामगार साहित्याची निर्मिती होत आली आहे, असे सांगून श्री भुजबळ यांनी औद्योगिक क्रांती नंतर झालेल्या बदलांचा आढावा घेतला.

भारतात ‘कामगार चळवळीचा आणि साहित्याचा’ उदय मुंबईच्या गिरणगावातून १८८४ मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी केल्याचे सांगून त्यांनी सुरू केलेल्या ‘दीनबंधू’ वृत्तपत्राचे योगदान विषद केले.

या परिसंवादात सर्वश्री प्रवीण देशमुख, मेघन गुप्ते, सौ स्वाती नातू यांनीही सहभाग घेतला. परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ योगेश जोशी यांनी केले.

या संमेलनाचे उद्घाटन ख्यातनाम गझलकार श्री प्रतिप निफाडकर यांनी केले. तर संमेलनाचे अध्यक्ष कामगार साहित्यिक श्री किरण भावसार, तर स्वागताध्यक्ष कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री मिलिंद कुलकर्णी हे होते.

संमेलनात निमंत्रितांचे कविसंमेलन, नारायण सुर्वे कवी कट्टा, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान असे भरगच्च कार्यक्रम झाले. या संमेलनास साहित्य प्रेमींची मोठी उपस्थिती लाभली होती.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments