सणात सण म्हणजे दिवाळीचा सण. कोणे एकेकाळी भारतातच साजरा करण्यात येणारा हा सण आता जगभर साजरा होऊ लागला आहे, ही खूप आनंदाची बाब आहे. जाणून घेऊ या दिवाळीची तयारी कशी करावी ते !
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
दिवाळी या वर्षी 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2026 अशी छान आठवडा भर आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा दिवाळीची तयारी अधिक चांगली व्हायला हवी, नाही का ?
दिवाळीच्या स्वागतासाठी घर घासून पुसून स्वच्छ ठेवावे लागते. तसं ते काम खूप वेळ खाऊ असतं. भरपूर वेळ लागतो. पण दसऱ्यानंतर लगेच, दिवाळीची काम असल्यामुळे, फराळाचं काम असल्यामुळे, वेळ मिळत नाही. तरीपण ऐनवेळी घर आवरण्याचे, त्रासामुळे दमणूक होते. त्यामुळे वेळीच कामाला लागावे.

या कामांचे नियोजन पुढील प्रमाणे करावे.
1) मोजकेच कपडे रोज धुवावे, म्हणजे सुकवायचा पसारा होणार नाही. ओले कपडे ताबडतोब दोरीवर सुकत घालावे व ईस्त्रीला द्यावे
2) घेतलेली वस्तू पुन्हा तिच्या तिच्या, त्याच जागी ठेवावी.
3) कचऱ्याचे न लागणारे कागद, प्लास्टिक पिशव्या रॅपर्स, खोकी, घरात अथवा फ्रिजवर अथवा कोपऱ्यात भरून ठेवू नये. कांद्याची सालं बोळे फेकून द्यावेत.
4) ओल्या काळ्या फडक्याने फर्निचर पुसू नये, झटकावे अन्यथा माती चिकटून बसते.
5) खरकटे, अन्न, खिडकीतून खाली फेकू नये. कावळ्याला द्यायचा घास पेपर प्लेटमध्ये ठेवावा.
6) स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असते.
7) झाडांना पाणी ओघळून वाहिल ईतके टाकू नये. कपडे धुण्यासाठी वापरलेले पाणी संडासात अथवा सिंक मध्ये टाका.
8) चहा पिऊन होताच, नळाखाली कपबशी धुवावी. ती पटकन स्वच्छ होते. डाग पडत नाहीत
9) वर्तमानपत्र घडी करुन ठेवल्यास कागद काम खूप आवरले जाते.
10) बाहेर जाताना कापडी पिशवी न्यावी. म्हणजे पुन्हा पुन्हा कागदी पिशव्या किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांचा पसारा होत नाही.
11) आवश्यक तेवढीच खरेदी करावी म्हणजे घर आवरणे सोप्पच जाते. झेपत नसेल तर रेडिमेड फराळ आणायला हरकत नाही.
12) तेल, कांदे बटाटे शिंकाळ्यात ठेवावे.
13) जेवणाच्या टेबलवर छोट्या रॅकमध्ये लोणची मिठ, साखर चमचे ठेवावे. म्हणजे गृहीणीलाच जेवताना वारंवार उठावे लागत नाही.
14) पारदर्शक प्लास्टिकच्या बरणीत लाडू भरावे. दुसऱ्या बरणीत चिवडा, चकल्या ठेवाव्यात.
15 ) फराळाच्या बरण्या जेवणाच्या टेबलवर ठेवाव्या म्हणजे हवे ते घेता येते, खाता येते.
16) फळे टोपलीत ठेवावी.
17) महिन्यातून एकदा रद्दीवाल्याला रद्दी देऊन घर स्वच्छ करावे.
18) सध्या पाणी टंचाई आहे. त्यामुळे ते जपुन वापरावे. घर स्वच्छ करताना, पाणी कमी लागावे म्हणून, धुण्याऐवजी कपड्याने पुसावे.
19) न लागणाऱ्या वस्तू व कपडे दान करावे.
20) सणाची तयारी आणि स्वच्छतेत सगळ्यांनी हातभार लावावा. आनंदात आरोग्य सांभाळत म्हणावे….
आली माझ्या घरी दिवाळी…..

— लेखन : शुभांगी पासेबंद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
