Homeसंस्कृतीश्री गणेश वंदना

श्री गणेश वंदना

आरंभही तू ,तूच अनंता
विघ्नविनाशक,धर्ता कर्ता
आळविते तुज नाम गुणेशा
गजवंदन श्री देव गणेशा!

प्रसन्न रूप तव, हेआधिदेवा
विराजमान तू ,सुखया व्हावा
ये ये देवा, आज मजगृही
वास असू दे, सदैव ईशा

आळविते तुज नाम गुणेशा
गजवंदन श्री देव गणेशा! १

द्यावे सुख शुभ मोद भरावा
शुभंकराचा श्रीगणेशा
आसन स्थापून आवाहन हे
तुजला बाप्पा कृपामनीषा

आळविते तुज नाम गुणेशा
गजवंदन श्री देव गणेशा! २

ओंकाराच्या नादामध्ये
गं गणपतये मंत्र जागतो
विद्या सुख ऐश्वर्य प्रदाता
उदंड भरू दे कृपामंजूषा

आळविते तुज नाम गुणेशा
गजवंदन श्री देव गणेशा!३

रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी

दि.२२/०८/२०२०
सकाळी ०८.४१ वा.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६