वाटे मनी नको बालपण,
रोजची शाळा नि सदा गृहपाठ,
मोठ्यांचा ओरडा नि नियमांचा पाढा,
देवा ! दे लवकर मोठेपण ॥
मोठेपणात मिरवेन स्व: तोऱ्यात,
स्व: कमाईने खिसा गुलाम,
स्व: मनाने उपभोग सुखांचा,
स्वैर ईर्षा मनमौजी मनात ॥
अवघड जगणे मोठेपण आयुष्यात,
सुखे दारी पसरून पायघड्या,
वेळ धावे वारा गती,
विचार तांडव सदा मनात ॥
सरले ते स्वच्छंदी निरागस,
परकी होई आईची कूस,
घड्याळ घेई ताबा मजवर,
ताण तणावी रोग मनास ॥
नको खुशाल ऐटीत जगणे,
हवा तो मायेचा पाझर,
हुंदडत बागडत मोकळ्या रानी,
आवडेल मज पुस्तकात रमणे ॥
घे ! परत हे मोठेपण,
बालपण आवडे पुस्तकी पान,
निष्पाप मन भावे मज,
देवा ! दे मज बालपण !!

– रचना : सौ.वर्षा महेंद्र भाबल.