माझे नाव प्रा.सौ. सुरेखा श्रीकृष्ण तायडे.छत्रपती संभाजीनगर येथील, भगवान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. वाय. एस. खेडकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे मी गेल्या तेरा वर्षांपासून अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहे.
शिक्षक म्हणून कार्यरत असणे ही केवळ एक व्यावसायिक जबाबदारी नसून, विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे एक पवित्र दायित्व आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे एवढेच शिक्षकाचे कार्य नसून, त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये, संस्कार, आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्नशील असतो. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कार्य करताना मिळणारे प्रेम, आदर आणि सन्मान हेच शिक्षकाच्या कार्याचे खरे समाधान असते.
याच कार्यप्रवासात माझ्या आयुष्यातील एक अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी अनुभवण्याचे भाग्य मला लाभले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहणाचा बहुमान मला प्रदान करण्यात आला. आपल्या स्वातंत्र्याच्या आणि मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाशी जोडलेल्या अशा गौरवशाली प्रसंगी राष्ट्रध्वज फडकावण्याचा सन्मान मिळणे, ही माझ्यासाठी केवळ एक गौरवाची बाब नसून, माझ्या संपूर्ण कार्याचा सन्मान आणि माझ्यासाठी आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय भावस्पर्शी क्षण आहे.

हा बहुमान मला प्रदान करून माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला, त्याबद्दल आदरणीय डॉ. राजीव खेडकर सर, सचिव, भगवान शिक्षण प्रसारक मंडळ, यांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि विश्वासामुळे हा क्षण माझ्या आयुष्यात अधिकच अर्थपूर्ण आणि संस्मरणीय ठरला आहे.
तसेच या ऐतिहासिक आणि राष्ट्राभिमानाने भारलेल्या प्रसंगी मला हा बहुमान मिळावा यासाठी सदैव प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे आदरणीय प्राचार्य विलास आरसुळ सर, आदरणीय प्रकाश मस्के सर, आदरणीय मयुरी खेडकर मॅडम, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांचेही मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते.
माझ्या आयुष्यातील या आनंददायी आणि अभिमानास्पद सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी माझे वडील श्री. शिवराम शेगोकार, आई सौ. पंचफुला शेगोकार, माझे पती श्री. श्रीकृष्ण तायडे आणि माझा मुलगा आदित्य तायडे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या आनंदाला एक वेगळीच भावनिक उंची लाभली. माझ्या प्रत्येक यशामागे माझ्या कुटुंबाचे प्रेम, विश्वास, त्याग आणि सदैव मिळणारे पाठबळ आहे; त्याबद्दल मी त्यांचीही मनापासून ऋणी आहे.

राष्ट्रध्वजाला सलाम करताना अनुभवलेली ती भावना शब्दांत व्यक्त करणे खरोखरच कठीण आहे. त्या क्षणी मनात अभिमान, कृतज्ञता, जबाबदारी आणि राष्ट्रप्रेम या सर्व भावना एकवटल्या होत्या. हा सन्मान माझ्यासाठी केवळ एका व्यक्तीला मिळालेला बहुमान नसून, प्रामाणिकपणे केलेल्या शैक्षणिक कार्याला मिळालेली प्रेरणादायी पावती आहे.
हा गौरव माझ्या पुढील वाटचालीसाठी निश्चितच नवी ऊर्जा, नवी प्रेरणा आणि अधिक जबाबदारीची जाणीव देणारा आहे. भविष्यातही माझ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी अधिक निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने कार्य करण्याचा मी मनोमन संकल्प करते.
या अविस्मरणीय सन्मानासाठी भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे, संस्थेतील सर्व मान्यवरांचे, माझ्या सहकाऱ्यांचे आणि माझ्या कुटुंबीयांचे मी मनःपूर्वक आभार मानते.
आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद, विश्वास आणि मार्गदर्शन असेच सदैव माझ्या पाठीशी राहो, हीच मनापासून अपेक्षा.
जय हिंद ! 🇮🇳
जय महाराष्ट्र ! 🚩
— लेखन : प्रा सौ सुरेखा तायडे. छ. संभाजी नगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 98694 84800

So Happy and Proud of you dear Surekha.
Beautifully penned Emotions behind such a proud moment.
Keep up the good work
Congratulations 🎉
Proud of my dear sister
Congratulations to Surekha and Thank you Devendra Bhujbal Sir for publishing the most memorable event of my wife.
Thank you so much for publishing my most memorable event in my life.