करायला हवा आहे नवा प्रयोग,
घ्यायला हवा आहे नवा शोध,
आयुष्य सुखी करण्याच्या नादात,
आत उध्वस्त का होतोय याचा बोध,
बाहेरचे जग केवळ सुंदर करताना,
का होते आहे मूल्यांशी तडजोड ?
केवळ इमारती, वस्तू, खाणे, पिणे,
कचकडी जगण्याने, निघून जाते ओढ ?
मनाचा मनाशी संवाद संपतोय का ?
हृदय रक्त शुद्ध करण्याचे यंत्र आहे का ?
आहेत का भावना ? ऋजुता अन् प्रेम ?
कुठे चाललेय सारं, याला काही नेम ?
म्हणून शोध घ्यायचाय, उबदार मनांचा,
जिवंत आहेत ह्रदये, अशा मानवांचा,
हवी आहे शांती, समाधान, जाण,
म्हणून ध्यानाचा हा प्रयोग नवीन…!!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
नवा प्रयोग कविता अर्थपूर्ण आणि वाचनीय आहे.