Friday, December 5, 2025
Homeसाहित्यराजश्री शाहू महाराज

राजश्री शाहू महाराज

आज, राजश्री शाहू महाराज यांची जयंती आहे. या निमित्ताने त्यांना अर्पण केलेली ही शब्दांजली.
शाहू महाराजांना विनम्र अभिवादन.
— संपादक

कागल गावात, बाळ जन्मा आले।
स्वप्न साकारले, घाटग्यांचे ॥१॥

आनंदीबाईनी, दत्तक घेतले।
यशवंत झाले, आता शाहू ॥२॥

बहुजन दु:ख, जाणले शाहूने।
दिले प्रोत्साहन, शिक्षणास ॥३॥

दिला न्याय, जातीभेद दूर।
उघडले दार, बहुजन ॥४॥

दीन दुबळ्यांचे, होते कैवारी।
दूर केली, शिक्षणाची दरी ॥५॥

भटक्या, दीन दलितांना।
दिला गरजूंना, कामधंदा ॥६॥

शूरवीर योध्दा, विकासासाठी।
दिले जनहिता, आरक्षण ॥७॥

झिजवली काया।
लावली माया, रयतेला ॥८॥

भीम घडले, दिली शिष्यवृत्ती।
झाली कीर्ती, समाजात ॥९॥

साधला विकास, दिली चित्रकला।
लोककला, राजाश्रय ॥१०॥

रूढी परंपरा, तोडून बंधन।
दिला सन्मान, महिलांना ॥११॥

दाखविले सत्य, कर्मठपणास।
अंधश्रद्धेस, तिलांजली ॥१२॥

त्यांचे नाव, शाहू महाराज।
बहुजना ताज, शाहू राजे ॥१३॥

प्रा.अनिसा शेख

— रचना : अनिसा सिकंदर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37
सौ.मृदुला राजे on चित्र सफर : 58
गोविंद पाटील सर on बहिणाबाईं…
सौ.मृदुला राजे on धुक्याची चादर
सौ.मृदुला राजे on बहिणाबाईं…
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on प्रतिभावान प्रतिभा
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on सानपाडा : अनुकरणीय आनंद मेळावा
चंद्रकांत Chandrakant बर्वे Barve on चित्र सफर : 58
Vilas kulkarni on खळी पडू दे !