जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे भारतीय निरपराध नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैन्याने “ऑपरेशन सिंदूर”च्या माध्यमातून दहशतवादी अड्डे उध्वस्त करून बदला घेतला. देशाच्या सीमेवर सुरू असलेल्या युद्धात आपले सैनिक दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून भारताचे व आपले रक्षण करीत आहेत. त्यांचा आत्मविश्वास व मनोधैर्य वाढविण्यासाठी, त्यांनी युद्धात मिळविलेल्या विजयाचे कौतुक करण्याकरिता तसेच या युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या शहिदांना मानवंदना देण्याकरिता नवी मुंबईतील सानपाड्यात काल सर्वपक्षीय तिरंगा रॅली काढण्यात आली.

ही तिरंगा रॅली सानपाडा सेक्टर ३, बधाई स्वीट कॉर्नर चौक येथून निघून घोषणा देत एमपीसिटी हॉस्पिटल, न्यू मिलेनियम हॉस्पिटल, मिलेनियम टॉवर्स या मार्गाने काढण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना सानपाडा रहिवाशांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800