आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त नवी मुंबईच्या नंदादीप ज्येष्ठ नागरिक संघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या शुभहस्ते मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचे अध्यक्ष श्री. सुभाष कुळकर्णी यांना “समर्पित ज्येष्ठ” जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या समारंभात श्रीमती प्रभावळकर आणि एडवोकेट प्रमोद ढोकले यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठांच्या ओळखपत्राचे फायदे, ओळखपत्र कसे बनवावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजना व कार्यक्रम, माता-पिता आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७, इच्छापत्र कसे करावे, वैद्यकीय इच्छापत्र, ज्येष्ठ नागरिक आणि तंत्रज्ञान, सायबर फ्रॉड पासून बचाव, आरोग्य आणि सौख्य, इत्यादी विषयावर अतिशय सोप्या भाषेत विवेचन केले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
