Sunday, July 20, 2025
Homeसाहित्यहे जीवन…

हे जीवन…

हे जीवन देवाची देणगी आहे
भल्याबुऱ्या कर्माची नोंद आहे
जिवंत असणे हीच
खरी पर्वणी आहे

अद्भुत सोनेरी संधी आहे
जगण्याची कोठे बंदी आहे
आनंदाचा खजिना आहे
सुख दुःखाचा जिना आहे

आपल्या माणसांची साथ आहे
बिकट परिस्थितीवर मात आहे
नागमोडी रस्ता आहे,
सोबत अनेक खस्ता आहे

बोचरी, काटेरी वाट आहे
पार केल्यास सुंदर बाग आहे
विजयाची आस आहे
प्रत्येक श्वास खास आहे

ऊन, पाऊस, गारा आहे
मनास सुखावणारा वारा आहे
वृक्षाची शीतल छाया आहे
अजब निसर्गाची किमया आहे

अथक प्रयत्नांची कास आहे
यश देखील हमखास आहे
हे जीवन खूप सुंदर आहे
आनंदाला उधाण आहे

भविष्याची चिंता व्यर्थ आहे
भूतकाळ निरर्थक आहे
वर्तमान जगण्यात अर्थ आहे
सुखी जीवनाचे हे गमक आहे.

रश्मी हेडे

रचना : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ.
निर्माती:सौ अलका भुजबळ 9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?