Homeबातम्याअत्यंत प्रेरणादायी "पंख जिद्दीचे" प्रकाशित

अत्यंत प्रेरणादायी “पंख जिद्दीचे” प्रकाशित

स्टेट बँकेत सफाई कामगार ते असिस्टंट जनरल मॅनेजरपदापर्यंत मजल मारणाऱ्या प्रतिक्षा तोंडवळकर यांचे “पंख जिद्दीचे” हे आत्मकथन नुकतेच अतिशय उत्साही वातावरणात स्टेट बँकेच्या निवृत्त अधिकारी नैना पानसे, चित्रकार शेखर साने, श्री संभाजी कोंडे महाराज, स्टेट बँकेचे निवृत्त जनरल मॅनेजर चंद्रशेखर पोवार आदींच्या हस्ते पुण्यात प्रकाशित झाले. या आत्मकथनाचे शब्दांकन चारुशीला बिवरे यांनी तर संपादनश्री देवेंद्र भुजबळ यांनी केले असून न्यूज स्टोरी टुडेने प्रकाशन केले आहे.

चारुशीला बिवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.त्यानंतर प्रतिक्षाताईंच्या बँकेतील सहकार्‍यांनी त्यांच्याविषयी अनेक आठवणी व प्रसंग सांगितले.तर पुस्तकातील काही भागांचे प्रभावी अभिवाचन चारुशीला बिवरे व अर्चना अंबासकर यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन श्री विनायक तोंडवळकर यांनी अतिशय समर्थपणे केले.

या हृद कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेल्या प्रतिक्षाताईंच्या आईवडिलांचे आनंदाश्रू व त्यांना मुलीबद्धल वाटत असलेला अभिमान क्षणोक्षणी दिसून येत होता. घरातील सर्व सदस्यही यावेळी उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम अत्यन्त सुंदर, भावपूर्ण व प्रेरणादायी झाला.

टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments