Homeसाहित्यऑपरेशन सिंदूर ..

ऑपरेशन सिंदूर ..

ऑपरेशन सिंदूर वर्षपूर्ती निमित्ताने ही भावांजली
— संपादक

दहशत होई निरूत्तर
करे ऑपरेशन सिंदूर
घडवले असे धमाके
हादरे पाकडे मगरूर

हा तर प्रारंभशिक्षेचा
भेदरला बेहालअसूर
वेळ ना पश्चात्तापाला
जाणे का करी कसूर

धन्यवाद देत असती
पुण्यात्मे सारे बेकसूर
पहलगाम हल्लाउत्तर
छाताड्या मारला सूर

आतंकाने जिंकू सारे
हो मनसुबे चक्काचूर
दणका मोडी मणका
शरमेने होशी चूर चूर

दहशतवादी तळकैक
क्षणार्धात होई कर्चुर
जाणीव देई पाकड्यां
काळ असे महा निष्ठूर

जगत हे भारतासोबत
दहशतवाद नसे मंजूर
जशासतसे दिले उत्तर
चाले न कुणाची उजूर

दिल्ली असे अजूनदूर
व्याधीउपाळेल नासूर
वाट चाला जहन्नुमची
हो चेहरा मोहरा बेसूर

हेमंत मुसरीफ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments