हा लेख आत्तापर्यंत कुठेही प्रसिद्ध झालेला नाही कारण तो आत्ताच मी लिहीत आहे. तामिळनाडूत काका काकी काकू पेक्षा मामा मामी हा उल्लेख असतो. मामा म्हणजेच नवाथे मामा व नवाथे मामी. या दोघांचे वय 87 – 88 असले तरी त्यांच्या मनाचा समतोल अत्यंत वाखाणण्यासारखा आहे. जेसंगीता मामी या शास्त्रीय संगीतात विशारद झालेल्या आहेत आणि त्यापूर्वी संस्थेत भजन वर्ग घेत असत आता दोघेजण जमेल तेव्हा सुखनिवास मध्ये जेव्हा भोजन असते किंवा काही कार्यक्रम असतो तेथे काठीच्या आधाराने शांतपणे येतात कार्यक्रमाचा आस्वाद घेतात. त्यांचा अजूनही हार्मोनियम वर संगीत वाजवणे हे चालू आहे.
महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेच्या आवारात आनंदनिवास जुनी इमारत व सुखनिवास नवीन इमारत आणि कल्पतरू पती – पत्नी यांना एकत्र राहण्याची सोय, असे तीन वृद्धाश्रम आहेत. तर कल्पतरू या वृद्धाश्रमात अनेक वर्ष राहणाऱ्या जागीरदार विजया या कीर्तन करणाऱ्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापक सेवानिवृत्त यांचा परिचय मी पूर्वीच एका लेखात करून दिलेला आहे. त्यांचे यजमान यांचे खूपच पूर्वी निधन झाले होते. ते तबला वाजवायचे. तरी विजया जाहागिरtदार बाई त्यांच्या हयातीपर्यंत या वृद्धाश्रमात त्यांच्या इच्छेप्रमाणे राहू शकतात. वृद्धाश्रमात याच डॉक्टर मोडक व त्यांच्या पत्नी राहत असत. डॉक्टर मोडक हे व्यवसायाने डॉक्टर होते व त्यांनी माझा रक्तदाब तपासणे, इंजेक्शन देणे हे सर्व पूर्वीच केलेले आहे. डॉक्टर मोडक व त्यांच्या पत्नी आता हयात नाहीत. पण त्यांनी खूप पूर्वी त्यांच्या आवारात बागकाम केलेले आठवत आहे. या कल्पतरू वृद्धाश्रमात श्री अरुण नावाचे मामा व संगीता मामी नवाथे अनेक वर्ष राहतात संगीता ताई यापूर्वी भजनाचे वर्ग घेत असत. नावाथे मामा एम एस ई बी मधून निवृत्त झालेले आहेत. यांनाही शास्त्रीय संगीताची आवड आहे.

त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे आहे आणि त्यांची सून परिचारीका असली तरी त्यांना तिला डिस्टर्ब करायचे नाही. या दृष्टीने हे दोघं वृद्धाश्रमात राहत आहेत. संगीता कल्पतरू इमारतीच्या च्या गच्चीवर किंवा शेजारीच मैदानावर असलेल्या वडाच्या झाडापर्यंत जमेल त्यावेळेला फेरी मारत असतात. खरोखरीच नवाथे मामा व नावाथे मामी यांच्याकडून किती तरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. काही वर्षांपूर्वी मी नवाचे मामी बरोबर रस्ता पेठ येथील श्री दत्तगुरुच्या देवळात गेले होते. आणि नंतर डोळ्यांच्या डॉक्टराकडे पण एकदा गेले होते. आता मैदान हे माझ्या एकटीने चालण्यासाठी अवघड असल्याकारणाने मी त्यांच्याकडे जाणे हे अपवादात्मकच होते. हो आणि ते पण इथेच घरी येणे पण अवघड झालेले आहे. कधीतरी केव्हातरी भेट होते. परंतु देवाने दिलेले आयुष्य सकारात्मकतेने कसे व्यतीत करावे, आपल्या वयाचा सारखा विचार न करता हे या दोघांपासून निश्चितपणे शिकण्यासारखे आहे. इथे उल्लेख करायला वाईट वाटते परंतु काही वर्षांपूर्वी त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलीचा वियोग पण पचवावा लागला. ती मुलगी फक्त 37 – 38 वयाची होती. पण आम्ही सगळे त्यांना भेटायला गेलो होतो. परंतु आपण त्या मुलीचा उल्लेख करणे हे अप्रशसनस्त वाटल्याने आम्ही शांत राहिलो. संगीता मामीला जरा कानाला कमी ऐकू येते म्हणून ते लिहून ठेवतात. आणि आपला दिवस परमेश्वराच्या चिंतनात व्यतीत करतात.
काही वर्षांपूर्वी मला स्वतःला नवीन हार्मोनियम विकत घ्यायची होती तर नावाथे मामा यांना सकाळी फक्त एक दोन तास आधी सांगितले. तेवढ्यावरच ते बरोबर साडेदहाला आले. मी त्यांच्याकडे मैदानावर गेले. ही दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही दोघं नावडीकर म्युझिक मधून हार्मोनियम घेऊन आलो आणि अजून सुद्धा कधी पेटीमध्ये काही बिघाड असेल किंवा पेटीमध्ये काही शंका वाटत असेल तर त्यांना सांगितलं तर ते विना विलंब घरी येतात आणि नंतर मग पेटीचे काम करतात आणि अजूनही मला आठवतंय पेटी नवाथे मामाने माझ्या आनंदनिवास मध्ये दारातून माझ्या पलंगापर्यंत स्वतः मोठ्या आनंदाने उतरून आणली होती. खरोखरच त्यांना याबाबत थँक्यू म्हणणं हे सुद्धा अत्यंत कमी वाटते. मला तर या दोघांचा मला परिचय करून देण्यात खूप आनंद वाटत आहे.
— लेखन : जयश्री शंकरन. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
