Homeबातम्या'देवी तपस्विनी' : अभिनव स्पर्धा

‘देवी तपस्विनी’ : अभिनव स्पर्धा

‘कलाश्रम’ ही संस्था स्वातंत्र्य सैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्र, मुंबई अंतर्गत कार्य करते. या संस्थेने आदर्श गृहिणी सावित्री रामा सुर्वे आणि विजया किशोर मालाडकर यांच्या स्मृतिदिनाचे निमित्ताने ‘देवी तपस्विनी’ ही ७४ वी विनामूल्य स्पर्धा आयोजित केलेली आहे.

राजमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर, पहिल्या महिला डॉक्टर आनंदिबाई जोशी, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या स्वयंसिद्धा नऊ तपस्विनींची नावे दिलेली आहेत. यातील एका तेजस्विनीची निवड करून त्याविषयीची कर्तृत्व सिद्ध करणारी, मोहून टाकणारी त्यांची यशोगाथा निवेदन कौशल्याने व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची आहे.

अटी :-
व्हिडिओ दोन मिनिटांचा असावा. त्यापेक्षा अधिक मोठा असल्यास स्वीकारला जाणार नाही.

व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुमचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता सांगणे आवश्यक आहे.

एका व्यक्तीला एकच व्हिडिओ पाठवता येईल.

ही स्पर्धा सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी विनामूल्य आहे.

आपले व्हिडिओ ९८६९००८८०५ / ९९६७८८४४१८ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावेत.

शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ ही या स्पर्धेची अंतिम तारीख आहे. या दिवशी सायंकाळी ६ वाजायच्या आत आलेले व्हिडिओ स्वीकारले जातील.

बक्षीस समारंभ मुंबईत अभियान सन्मानचे ८२ वे पुष्प होणार आहे त्यावेळी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ स्पर्धकाला भेटवस्तू, प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येईल.सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रशस्तीपत्र व्हाट्सअपवर पाठवले जाईल.

हा कार्यक्रम शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ सायंकाळी ४ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, चौथा मजला, मल्टीपर्पज दालन, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५ येथे होणार आहे, असे स्पर्धा समन्वयक चारुशीला म्हात्रे यांनी कळवले आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments