मला माहिती ना मी खरा कोण आहे
कधी एकलव्य अन् कधी द्रोण आहे
किती येऊन सांगती तुमचा विद्यार्थी आहे
मला वाटते अजून मीच विद्यार्थी आहे
बरेच काही आहे जे मला माहिती ना
नवी बुद्धिमत्ता किती कोन आहे ?
किती रक्त हे सांडते युद्धभूमी
कुणाला हवे नेमके काय आहे ?
गर्दीत या ओळखीचे कुणी ना
स्वामी कुणी तर कुणी खान आहे !
पाने फुले रान हिरवे दिसेना
कुठे श्वास घ्यावा कुठे प्राण आहे ?

— रचना : विजय पांढरीपांडे. हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
