Homeसाहित्यवाचक लिहितात….

वाचक लिहितात….

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात सदरात आपले स्वागत आहे. आपल्याला एक आनंदाची बातमी देत आहे, ती म्हणजे आपल्या पोर्टलवर प्रसार माध्यमांतील व्यक्तींवर मी लिहिलेल्या जीवन कथा “संवादभूषण” या पुस्तक रुपाने प्रकाशित झाल्या आहेत. ती बातमी आपण काल वाचली असेलच. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आता पाहू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया. जाता जाता. ..दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. त्यामुळे योग्य खबरदारी घेतल्याशिवाय दिवसा घराबाहेर पडू नका.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ. (संपादक)
1
श्री भावेश भाटिया यांची माहिती सुरेख, प्रेरणादायी आहे.
— जयंत ओक. नवी मुंबई.
2
श्री. भावेश भाटिया ह्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या जन्मजात दिव्यांगत्वावर मात केली आणि अंधारात चाचपडणा-या जीवनाने सनराईझ कॅन्डल्सच्या माध्यमातून जगाला प्रकाशाचा मार्ग दाखवला. भावेश भाटिया सर, तुमच्या कर्तृत्वाला सलाम आणि प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन. 🙏💐
सन्माननीय मेहबूब कासार सर ह्यांनी हा लेख लिहून वाचकांना उर्जेचा दीपस्तंभ दाखवून दिला आहे. सर, तुमचे शब्दांकन अतिशय सुंदर आहे. तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद 🙏💐
— मृदुला राजे. जमशेदपुर.
3
He is very nice person. Thank you for sharing…..
— Vinod Ganatra. Filmmaker, Mumbai.
4
सन राईज केन्डल्स ची कथा खरेच खूप प्रेरणादायी आहे ..
सुधीर थोरवे यांनी सांगितलेले उपाय कठोरपणे अमलात आणण्याची वेळ आली आहे ..खरेच हवामानाचा बदल चिंतेचा विषय आहे.

अनुराधाताईंचे ललित म्हणजे …. एका वेगळ्याच तरल भावविश्वात नेणारे. चांदण चुरा पिऊन तृप्त झालेला चकोर. सुरेख
स्वाती ताईंची कविता.. सुट्टीच्या गमती छान आहे.
— स्वाती वर्तक. मुंबई.
5
पुस्तकांची नदी….खूपच छान….!!!!🙏💐
पद्मविभूषण डॉक्टर चिंतामणराव देशमुख…हा लेख खूपच स्फूर्तीदाई वाटला !!!! लेखांकन खूपच छान !!!🙏🙏🙏💐💐
☝️ राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचे विचार आचरणात आणणे आवश्यक…हे गद्य लेखन आणि राष्ट्र संत तुकडोजी महाराज हे पद्य लेखन तसेच यांचे शब्दांकन हे प्रसंग अनुरूप सादरीकरण विचार मुग्ध करते…..
मनपूर्वक आभार!……🙏
— प्रा मनोहर यादव. सातारा.
6
माजी केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख ह्यांच्या प्रगाढ ज्ञानाचा आणि विकसित व्यक्तिमत्त्वाचा सखोल आढावा घेणारा हा लेख म्हणजे “घागर में सागर !” … खूप सुंदर शब्दांकन आणि उत्तम माहितीपूर्ण लेखन केल्याबद्दल शशिकांत गद्रे सरांचे हार्दिक अभिनंदन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया व आयुर्विमा महामंडळ (लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया) ची स्थापना करणाऱ्या द्रष्ट्या अर्थतज्ञ चिंतामणराव देशमुख ह्यांना शतशत वंदन 🙏💐
— मृदुला राजे.
7
होकर्णे यांनी लिहिलेली परिस्थिती किती विदारक आहे..वाचून खरेच शरमेने मन खाली घालावीशी वाटते.. सधन दुपारी बारा ते चार एसी ला असे चिकटून बसतात की आपल्यासाठी कोणीतरी श्रम करतंय याची पुसटशी दखल सुद्धा घेत नाहीत. दुःख होते.
शांता ..ची गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नसते खरे आहे ..माझ्याकडे तिच्यावर एक कविता आहे …सतीश सरांनी मास्तरांच्या रूपाने छान सांगितली आहे कथा.
निर्मोहीजींची प्रस्तावना वाचून … तितली…बद्दल आकर्षण वाटते आहे ..बघू या वाचून
कवीची व्यथा ..चांगली मांडली आहे , कवी सुभाष यांनी.
— स्वाती वर्तक. मुंबई.
8
भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा देणारे मूलभूत कार्य करणारे सीडी देशमुख ह्यांनी वैयक्तिक विद्वतेबरोबर देशातील अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटवला होता. त्या दृष्टीकोनातून हा माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेख.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार महाराष्ट्र दिनानिमित्त वाचायला मिळाले आनंद झाला.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. लंडन.
9
CD Deshmukh was a stalwart.
— Hemant Wagh.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments