हिंदूंना आपलं अस्तित्व टिकवून ठेवायची असेल तर येणाऱ्या काळात हिंदूंना संघटित होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सध्याचा काळ झपाट्याने हिंदू विरोधी होत आहे. सर्वत्र हिंदू विरोधी घटना सातत्याने घडत असताना आपण रोज बघत आहोत परंतु याचा म्हणावा तसा विरोध होताना दिसत नाही ह्याचं कारण म्हणजे हिंदू समाज संघटित नाही. लव जिहादसह आता लँड जिहाद सुद्धा सुरू झाल्याचे लक्षात येते, असे परखड विचार एडवोकेट श्री राजेश मुधोळकर यांनी मांडले.
समग्र हिंदू संमेलन सानपाडा समितीच्या वतीने नुकतेच झाशी राणी खेळाच्या मैदानावर एक अतिशय सुंदर असे हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनामध्ये प्रमुख वक्ता म्हणून बोलताना एडवोकेट श्री राजेश मुधोळकर पुढे म्हणाले की, मशिदी किंवा चर्चेस प्रमाणे हिंदू देवालये ही हिंदूंची बलस्थानं व्हायला हवीत. याकरता सर्व हिंदूंनी नियमितपणे किंवा किमान आठवड्यातील एक दिवस देवालयात जाऊन सामूहिक प्रार्थना करायला हवी. यातूनच संघटन संभव आहे.

दुसरे प्रमुख वक्ते श्री अभय जगताप यांनी आक्रमक शैलीत भाषण करताना असे विचार मांडले की सर्व हिंदूंनी आता आपसातील सर्व प्रकारचे भेद विसरून “मैं केवल हिंदू हूं” हीच धारणा अधिक बळकट करण्याची गरज आहे.

आसपास घडलेल्या काही अनुचित घटनांचा संदर्भ देत शिव जगताप यांनी जागरूक पालक आणि सुसंस्कारित कुटुंबाची आवश्यकता अधोरेखित केली.

या संमेलनाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर आदि गुरू शंकराचार्य यांच्या गुरुपादुका स्तोत्र ने झाली. त्यानंतर सुभद्रा चौहान यांनी रचलेल्या खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी आणि सरपे हिमालय का छात्र है, चरणों में नदियां एकत्र है, हाथों में वेदों के पात्र है, देश नहीं ऐसा अन्यत्र है। जय भारती वंदे भारती। ही दोन नृत्य गीत मोकाशी आणि मानकर भगिनींनी आकर्षक पद्धतीने सादर केलीत.

संमेलनाला येणाऱ्या सर्व भगिनींचं हळदी कुंकू, चाफ्याचं फुल आणि गळ्यात भगवे उपरणं देऊन स्वागत करण्यात आले. तर कपाळावर गंध टिळा, मनगटावर भगवा कलावा आणि गळ्यामध्ये भगवे उपरणं देऊन पुरुषांचं स्वागत करण्यात आलं.


प्रवेशद्वारासमोर नयन मनोहर रांगोळी चितारण्यात आली होती. याशिवाय सर्वांच्या आकर्षणाचा बिंदू म्हणजे सेल्फी पॉइंट. हिंदू धर्मातील सर्व पवित्र चिन्हांचा उपयोग करून हा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता. यह शिवाय “हां मुझे गर्व है कि मैं हिंदू हूं” हे वाक्य अंकित करण्यात आले होते.

प्रवेश करताना प्रत्येकाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पंचपरिवर्तन या संकल्पनेची माहिती देणारी पत्रक तसेच वंदे मातरम आणि पाच संकल्प छापलेले पत्रक व वितरित करण्यात आले होते. याशिवाय सर्वांसाठी हिंदू धर्मासंबंधी पाच प्रश्नांची एक प्रश्नपत्रिकाही देण्यात आली होती. बरोबर उत्तर देणाऱ्या पाच हिंदूंचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

हिंदू धर्माची महानता सांगणारे एक सुंदर प्रदर्शन या आयोजित करण्यात आलं होतं. आपले ऋषी हे केवळ पूजा पाठ करणारे नव्हते तर अतिशय महत्त्वाचे शोध लावणारे ते वैज्ञानिक सुद्धा होते. या माध्यमातून त्यांच्या कार्यासंबंधीची माहिती या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न करण्यात आला .

संमेलन परिसरात हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचा पुस्तकांचा तर सनातन धर्म सभेचा पूजा साहित्य आणि पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या मध्यंतरात, श्री ओटावणेकर यांनी अतिशय जोशपूर्ण असे “हम हिंदू सत्य सनातन है, हम शाश्वत सत्य सनातन है।” हे गीत सादर केले. तसेच प्रसिद्ध कवयित्री अनघा तांबोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेली एक रचना सादर केली. “हटा देंगे हम उसको जो नजर उठा कर देखेगा, वंदे मातरम का नारा अब बच्चा-बच्चा गाएगा” टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या सादरीकरणाला लोकांनी सहमती दर्शवली.

संमेलनाच्या दरम्यान सादर करण्यात आलेले “मी भारतीय” हे लघु नाटक लोकांचे हृदय हेलावून गेले. नव्या पिढीला स्वातंत्र्याचा इतिहास माहीत नसल्याची खंत मनात ठेवून एक पिढी आजही जगत आहे. त्यांच्या मनामध्ये हा एकच ध्यास आहे की स्वातंत्र्य हे आपल्याला गिफ्ट म्हणून मिळालेलं नसून त्याकरिता अगणित क्रांतिकारकांनी आपले जीवन समर्पित केले होते आणि त्यांच्या संघर्षातून आपण ते प्राप्त करून घेतले आहे हे सत्य या पिढीपर्यंत पोचहोवलेच पाहिजे हा ध्यास मनात घेऊन श्री रवींद्र देवधर यांनी हे नाटक सादर केले.
सानपाडा येथील सेक्टर ९, १०, ११ आणि ६ या वस्तीत राहणाऱ्या हिंदू बांधवांसाठी हे आयोजन करण्यात आले होते. ह्याकरता समितीच्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ साडेतीन हजार घरांशी संपर्क केला होता. संमेलनाची सांगता संपूर्ण माध्यमातून या गीताने झाली. त्यानंतर सर्वांना सानपाडा येथील गुरुद्वाराच्या वतीने महाप्रसाद वितरित करण्यात आला.


अतिशय शिस्तबद्ध रीतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलन आयोजन समितीचे अध्यक्ष श्री दीपक शर्मा आणि सचिव श्री हिमालय जोशी यांनी सर्वांचे आभार मानले. नगरसेवक श्री सुनील कुरकुटे आणि श्री भाऊ भापकर ह्यांचे या कामासाठी बहुमोल योगदान लाभले याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. हजाराच्या संख्येने उपस्थित सर्व हिंदू बांधवांनी या संमेलनानंतर संघटित राहण्याचा आणि आठवड्यातून एक दिवस महाआरतीच्या निमित्याने मंदिरामध्ये भेटण्याचा संकल्प व्यक्त केला.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
