Homeसाहित्यअशी ही माणुसकी !

अशी ही माणुसकी !

रिक्षात विसरली पेटी,
हापूसाची मधाळ,
पोस्ट टाकताच मॅडमने,
बातमी झाली धमाल

सकाळी हरवली एकटी,
संध्याकाळी आल्या थव्याने,
दारात लागली जत्रा,
आंब्याच्या पेट्यांनेच

एक नाही, दोन नाही,
एकशे छत्तीस जणांनी,
“मॅडम हीच का तुमची पेटी ?”
विचारले सगळ्यांनी

देवगड, रत्नागिरी, आंबे
आले घराघरातून,
“आमच्या बागेतलाच घ्या”
आग्रह सगळ्यांच्या मुखातून

मॅडम म्हणाल्या
“अहो माझी एकच होती पेटी,
इथे तर मांडलाय बाजार,
आता मी करू काय गोष्टी ?”

शेजारच्या काकू हसल्या,
अगं, वाट सगळ्यांना मायेने,
ज्यांनी आणली जीव लावून,
त्यांना दे तू प्रेमाने

पोरं म्हणाली
आई, आता रोज मॅंगो शेक,
बाबा म्हणाले “पार्टी करू,
बोलवू अख्खी गल्ली एक”

साताऱ्याची माती भारी,
माणसं त्याहून लयभारी,
एकाच्या डोळ्यांत आसू,
तर धावून येते नगरी सारी

पेटी हरवून सापडल्या,
इथल्या माणसांच्या जाती,
136 पेट्यांतून दिसली,
साताऱ्याची खरी नाती !

गजाभाऊ लोखंडे.

— रचना : गजाभाऊ लोखंडे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments