Homeसाहित्य"शब्दांच्या वाटेवर" : प्रेक्षकांचा प्रतिसाद !

“शब्दांच्या वाटेवर” : प्रेक्षकांचा प्रतिसाद !

नमस्कार मंडळी.
दूरदर्शनवर 17 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 8.30 वाजता आणि पुन्हा  दुसर्‍या दिवशी दुपारी 2.30 वाजता प्रसारित झालेल्या “शब्दांच्या वाटेवर” या कार्यक्रमात लेखक तथा आपल्या पोर्टल चे संपादक, श्री देवेंद्र भुजबळ यांची मुलाखत प्रसारीत झाली. दूरदर्शन ने या कार्यक्रमाची यू ट्यूब लिंक उपलब्ध करून दिल्यामुळे ती आपल्या पोर्टल वर तसेच काही जणांना थेट देखील पाठविण्यात आली.

हा कार्यक्रम पाहून भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांच्या प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे. या सर्वांचे आणि अर्थातच दूरदर्शन चे देखील मनापासून आभार.
आपली स्नेहांकित
टीम – एन एस टी.

1)
नमस्कार देवेंद्र जी,
तुमची *दुरदर्शन सह्याद्री* वर *शब्दांच्या वाटेवर* या सत्रात झालेली मुलाखत खूप छान  झाली.
पूनम चांदोरकरांनी चांगले प्रश्न विचारले, त्यावर तुमची उत्तरे खूप अप्रतिम प्रेरणादयी होती.बिकट परस्थितीत इच्छा असेल व त्याला प्रयत्नाची जोड दिली तर यशस्वी झालेली काही उदाहरणे सुंदर होती.
मानसिक संतुलन बिघडल्यामुळे जगभर अनेक तरूणांच्या होत असलेल्या आत्महत्यासारखे ज्वलंत प्रश्न उदाहरणासह सांगीतले ह्यातून अनेकांना बरेच शिकता येईल.
वाचणाची आवड असली की शब्दांच्या वाटेवर चालणे सहज होते हे तुमच्या स्वतः:च्या अनुभवातून सुंदरतेने सुरूवातीलाच सांगून मुलाखती विषयी कुतुहल निर्माण केले व उत्कृष्ट लेखक, पत्रकार कसे  झाला यातून खूप प्रेरणा मिळते.
सर्वांनी ही मुलाखत जरूर पहावी.
धन्यवाद,
— माधव गोगावले. शिकागो, अमेरिका
2)
देवेंद्रजी भुजबळ यांची मुलाखत पाहून त्यांच्या अष्टपैलू विचारसरणीची एक आगळी वेगळी ओळखच झाली. त्यांची गेल्या ४०-४५ वर्षात विविध माध्यमातून केलेल्या कामाची एक छोटीसी झलक या मुलाखतीमधून पाहताना त्यांचे सूक्ष्म निरीक्षण आणि व्यक्तिस्तोमापासून दूर सर्व सामान्य माणसातील झाकली माणिक हेरण्याची कला अतुलनीय आहे हे प्रत्कर्षाने जाणवते. हि भेट घडवून आणल्याबद्धल सह्याद्री वाहिनीचे मन:पूर्वक आभार.
— सुनील शाह. अमेरिका
3)
नमस्कार.
तुमची मुलाखत खूप छान झाली. जपानच्या बुलेट ट्रेन मध्ये प्रकाशन ही कल्पना आवडली. शेवटचा संदेश ही छान. तुमचे व्यक्तिमत्व खूप प्रेरणादायी आहे.
— चित्रा मेहेंदळे. अमेरिका.
4)
भुजबळ सरांची ही प्रेरणादायक जीवनकथा आहे. समाजातील सर्वांसाठी ती अनुकरणीय आहे.
— प्रा डॉ  सतीश  शिरसाठ. इंग्लंड
5)
Wow, Proud to see my book on TV.
Loved your confidence. ✨️
So good you are !
Well done 👏👏
Thank you for mentioning  about Mi Shilpa book.
— Shilpa T G. Cayman Islands.
6)
आदरणीय श्री. देवेंद्र भुजबळ साहेब अभिनंदन.
दूरदर्शनवरील ‘शब्दांच्या वाटेवर’ या कार्यक्रमात काल रात्री ८.३० वाजता प्रसारित झालेली आपली मुलाखत पाहण्याचा योग आला. सुप्रसिद्ध मुलाखतकार सौ. पूनम चांदोरकर यांनी घेतलेली ही मुलाखत अत्यंत सुंदर, प्रगल्भ आणि प्रेरणादायी झाली.

मुलाखत सुरू असतानाच आपल्या विचारांची व्यापकता, अनुभवाची समृद्धता आणि समाजासाठी सकारात्मक कार्य करण्याची आपली तळमळ प्रकर्षाने जाणवली. कार्यक्रम संपल्यानंतरही या प्रेरणादायी संवादाची सकारात्मक ऊर्जा मनात कायम राहिली.

संचालक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतरही आपण थांबले नाहीत, हे विशेष कौतुकास्पद आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सोशल मीडिया या विविध माध्यमांतून आपण आजही उत्साहाने, सकारात्मकतेने आणि समाजोपयोगी दृष्टिकोनातून कार्यरत आहात. आपल्या अनुभवाचा आणि लेखणीचा हा प्रवास निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

आपल्या या उल्लेखनीय कार्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्या पुढील वाटचालीस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिकाधिक यश लाभो, ही मनःपूर्वक शुभेच्छा.
पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा !
आपला स्नेहांकित,
विजय होकर्णे. छायाचित्रकार, नांदेड.
7)
आपण दिलखुलास मुलाखत दिली. आपली मुलाखत आपल्या प्रसन्न आणि भारदस्त व्यक्तिमत्वाची साक्ष वाटली. अभिनंदन.
पार्श्वभूमीचे नितांत सुंदर फलक लावण्यात आले त्या बद्दल ‘सह्याद्री’ चे निश्चितच कौतुक वाटले. आपणास हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.
— सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नाशिक
8)
मुलाखत प्रेरणादायी झाली आहे.अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 👍
— प्रल्हाद जाधव. निवृत्त माहिती संचालक, मुंबई.
9)
जेष्ठ पत्रकार संपादक भुजबळ सर, आपण आपले पद सत्कारणी लावले आहे ! त्या बद्दल आपले मनःपुर्वक अभिनंदनऽऽऽ !! 👌👍🤝
— कवी विलास देवळेकर. मुंबई.
10)
सन्मा श्री भुजबळ साहेब,
नमस्कार.
सह्याद्री मराठी वाहिनीवर आपली “शब्दाच्या वाटेवर” संदर्भात पुनम चांदोरकर यांनी घेतलेली मुलाखत आवर्जून पाहिली. आपण विविधांगी विषयावर, साहित्यावर, भरभरून बोलतांनाच अनेक क्षेत्रात काम केले, शेवटी दूरदर्शन मार्गे शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील विविध पदांवर काम करत संचालक पदापर्यंत पोहोचलो, अशी यशस्वी कामगिरी करून सेवानिवृत्तीनंतर आजही अनेक विषयांवरील पुस्तक प्रकाशन आणि न्युज स्टोरी पोर्टलची कार्य सुरू आहे.
आपले मनापासून अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!
— राजाराम जाधव. निवृत्त सहसचिव, नवी मुंबई.
11)
शब्दांच्या वाटेवर
बोलल्या पूनम चांदुरकर
छान होते मुलाखततील बोल
त्यावर बोलले देवेंद्र भुजबळ.
समजले, परिस्थितीपेक्षा मनस्थिती महत्त्वाची.
लेखक, पत्रकार, संपादक या भूमिकेतून आपली भूमिका ठोक
एन एस टूडे ने दिवस जातो चांगला
पुढे छानच कार्यक्रम 🌹
— एम पी देवळे. नवी मुंबई.
12)
नमस्कार, सर.
कार्यक्रम दोन्ही दिवस बघितला. कार्यक्रम खूप छान झाला.आपलं मनोगत खूप छान व्यक्त झालं.मला वाटतं अजून थोडा वेळ मिळाला असता तर बरं झालं असतं..!
आपल्या दिलखुलास गप्पा खूप छान वाटल्या. माहेरी आल्याचा आनंद, समाधान देऊन  गेल्या.🙏🎥🌹
— नरसिंग पोतकंठी. निवृत्त  दूरदर्शन कॅमेरामन. मुंबई.
13)
दूरदर्शनच्या ,” शब्दांच्या वाटेवर ” या कार्यक्रमात  न्यूज स्टोरी टुडेचे संपादक श्री. देवेंद्र भुजबळ साहेब यांची  १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसारित झालेली मुलाखत खूपच छान झाली. श्री भुजबळ साहेबांनी उत्तमरीत्या आपले विचार मांडले. शब्दरुपी व पुस्तकाद्वारे ते समाज्यापर्यंत पोहचले आहेत. त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट आहे सामाजिक
बांधिलकी ठेवा व समाज्यास आपण देणे लागतो ते देत राहा. ❤️👍🏻
मी सध्या अमेरिकेत आहे आल्यावर प्रत्यक्ष भेटून आपले अभिनंदन करेन.💐
— विश्वनाथ सावंत. नवी मुंबई
14)
“शब्दांच्या वाटेवर” कार्यक्रमातील देवेंद्र भुजबळ यांची प्रेरणादायी मुलाखत…

सह्याद्री दूरदर्शनच्या “शब्दांच्या वाटेवर”  या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त माहिती संचालक आणि न्यूज स्टोरी टुडेचे संपादक श्री. देवेंद्र भुजबळ साहेब यांची पुनम चांदोरकर यांनी घेतलेली मुलाखत पाहिली. या मुलाखतीमध्ये आपणास लहानपणी वाचनाची कशी आवड निर्माण झाली. पत्रकारिता, संपादक,  निर्माता अशा अनेक भूमिका आपण यशस्वीपणे केल्या, त्याचं उत्तम सादरीकरण आपण मुलाखतीत केले आहे. आपण अनेक पुस्तके प्रकाशित केली असून,  न्यूज स्टोरी टुडे चॅनेलच्या माध्यमातून आपण अनेक साहित्यकांना व मित्रांना जोडण्याचे काम केले आहे.  आपली सर्वच प्रकाशित झालेली पुस्तके समाजाला प्रेरणादायी आहेत.

वस्तूस्थितीवर आधारित आपली पुस्तके आहेत. आपली अनेक पुस्तके वाचण्यात आली. त्यामध्ये  निश्चितच वास्तविकता जाणवते. आपल्या मुलाखतीमधून आपण केसरी मध्ये उपसंपादक म्हणून काम केले, दूरदर्शनवर सहा वर्ष निर्माता म्हणून काम केले आहे. तर महाचर्चा सदरात दोनशे भाग प्रसारित केले आहेत. त्याचबरोबर आपण महाराष्ट्र शासनाच्या माहिती विभागात संचालक पदापर्यंत काम केलं. आपल्याकडे खरोखरच अनुभवाची  खूप मोठी शिदोरी आहे. हे आपल्या मुलाखतीतून जाणवलं. सेवानिवृत्तीनंतरही आपण खूप कार्यशील आहात. समाजाला प्रबोधन कसं होईल अशी प्रेरणादायी पुस्तकाची निर्मिती करून आपण खऱ्या अर्थाने समाजाला फार मोठे योगदान दिलं आहे. मुलाखती मधून आपण दारूभट्टी चालवणाऱ्या महिलेचा मुलगा डॉक्टर होऊन आय ए एस होतो आणि त्याच नंदुरबारमध्ये जिल्हाधिकारी अधिकारी होतो. अशी अनेक उदाहरणे आपण दिलेली आहेत. आपल्या मुलाखतीमधील अनेक उदाहरणे मनाला स्पर्श करून जातात. मुलाखत देताना आपण आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग सांगून साहित्य निर्मिती बद्दल अतिशय सविस्तरपणे चर्चा केली. त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. यापुढेही आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक पुस्तकांची निर्मिती होवो. ही सदिच्छा.
आपला
मारुती विश्वासराव
अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, सानपाडा
कार्यकारी संपादक, पोर्ट ट्रस्ट कामगार
15)
सर आपली मुलाखत अप्रतिम झाली मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. आपली शब्दसंपदा अफाट आहे.🙏
— आशा कुलकर्णी. अध्यक्ष, हुंडा प्रतिबंधक संस्था, मुंबई.
16)
नमस्कार साहेब, आपला कार्यक्रम अतिशय छान झाला. अभिनंदन.
पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा. 🙏🌹
— देवदत्त नागपुरे. निवृत्त उप महाप्रबंधक, नवी मुंबई
17)
सर नमस्कार🙏
खूपच छान अगदी नेटकी, दर्जेदार मुलाखत झाली सर. दोन्ही वेळा ऐकली.
पूनम चांदोरकरांनीही प्रश्नही तसेच विचारले आणि अगदी सहज, ओघवल्या भाषेत तुम्ही दिलेल्या उत्तरांतून तुमच्या साहित्यिक प्रवासाचा लेखाजोखा समोर आला.
शासकिय अधिकारी, साहित्यिक, समाजसेवक म्हणून खूप विस्तृत कार्य आहे आणि … शेवटी तुम्ही दिलेला संदेश खूप सकारात्मक आणि मोलाचाच ! खुर्चीवरून बाहेर पडल्यावर एक क्लार्क सुध्दा बँकेत गरजूंना स्लीप भरण्यास मदत करू शकतो. त्यामुळे “काय करू ?” या सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पद, शिक्षण, सामाजिकस्तर बाजूला ठेवून एक ‘माणूस’ कसा असावा याचे उत्तर आणि उत्तम उदाहरण म्हणजे आजची तुमची मुलाखत !
तुमचे आणि पूनमजींचे मनापासून अभिनंदन

सर,
तुमच्या धडपडीला, कार्याला, साहित्यिकाला …. . . Salute ! सलाम ! वंदन !
पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा !
🙏🙏💐💐
— स्नेहलता झरकर – अंदुरे.
लेखिका, कवयित्री, अनुवादक, गझलकारा, धाराशिव
18)
🕉️🙏🌹👍🚩🎉🚩👍🌹🙏🕉️
सुप्रभातम्. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मा.श्री देवेन्द्रजी भुजबळ, निर्माता, न्यूज स्टोरी टुडे (माजी सनदी अधिकारी, संचालक माहिती व प्रसिद्धी संचालनालय, मंत्रालय, महाराष्ट्र शासन) यांची मुलाखत, पुनम चांदोरकर यांनी घेतली आहे.
या मुलाखतीत मा. देवेन्द्रजी यांनी आपल्या समग्र जीवनाचा यथार्थ असा मागोवा घेतला आहे. यात त्यांनी आपल्याला बालपणापासूनच साहित्याची गोडी होती. महाराष्ट्रातील विविध नियतकालिकेत नानाविध पदावर कार्यरत होते.

मुंबईत दूरदर्शन वर त्यांनी निर्माता म्हणून कार्यरत असताना विविध समाजोपयोगी उपक्रमाबद्दल जनजागृती केली.
दूरदर्शन केंद्र हे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने त्यांची बदली महाराष्ट्राबाहेर होणार हे ते जाणून होते.

त्याच वेळी महाराष्ट्र शासनाच्या सनदी परिक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांची निवड झाली. राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी माहिती अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या सक्षम कर्तृत्वाचा खास असा ठसा उमटवला. या क्षेत्रातील अनुभव घेतला.

निवृत्तीच्या शेवटच्या काही वर्षांत ते महाराष्ट्र राज्य शासन प्रणालीच्या ‘लोकराज्य’ या नियतकालिकाचे संपादकपद भूषविले.राज्य शासनाच्या सेवेतून सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी आपल्या अधिपत्याखाली ‘न्यूज स्टोरी टुडे’ या पोर्टल सुरू केले. पाहता पाहता या पोर्टलची लोकप्रियता सातासमुद्रापार गेली आहे.
या पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे यात लेखन करणाऱ्या अनेक दिग्गज मान्यवरांचे विविधांगी लेख प्रसिद्ध होत असतात नव्हे आहेत. तसेच नवोदित लेखकांचेही प्रकाशित केले जात आहेत.
या नवोदित लेखकांच्या लेखांचे संकलन करून ते पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहेत.विविधांगी विषयांवरील पुस्तकं छापून ती प्रकाशक म्हणून प्रकाशित केली आहेत.निवृत्तीनंतर ते जरी रिटायर्ड (Retired) झाले असले तरी ते टायर्ड (Tired) झाले नाहीत हे विशेष म्हणावे लागेल.

याला कारण म्हणजे म्हणजे मुळात साहित्याची आवड आहे. आवड असली की सवड मिळते. अशा या शतपैलू व्यक्तीमत्व ल्यायलेल्या मा.श्री. देवेन्द्रजी भुजबळ यांच्या सुविद्य पत्नी सौ. अलका यांची सक्षम साथ लाभली हे मा.देवेन्दजी कृतज्ञतेने व्यक्त करतात. त्यांच्या संसारवेलीवर विवाहित लेक देवश्री ही सुद्धा मुंबईच्या एका इंग्रजी वृत्तपत्रात पत्रकार आहे.
यानिमित्ताने मा.श्री देवेन्द्रजी भुजबळ यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छासह त्यांच्या समस्त परिवारास (पोर्टलसह) निरोगी निरामय आयुष्य लाभो हीच साहित्य शारदादेवी जवळ मनापासून प्रार्थना शुभ दिवस.
— नंदकुमार रोपळेकर. मुंबई.
19)
नमस्कार सर .🙏
दुपारीच तुमची मुलाखत ऐकली, खूप सुंदर बोलत होतात सर आपण.
खरोखरच तुम्ही शब्दांचे जादुगार आहात.
अश्या ग्रेट माणसाशी आपला परिचय आहे याचा अभिमान वाटला. तुमच्या प्रत्येक शब्दात सामाजीक भान जाणवले, समाजाच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर बोललात.
खरोखरच परिस्थिती नव्हे तर मनस्थिती चांगली पाहिजे, तर आत्महत्या होणार नाहीत.
खूप छान मुलाखत, तुमच्या सगळ्या साहित्याचाही धावता आढावा घेतलात. ऐकून खूप छान वाटलं.
तुमच्या सारखी मोठी माणसे खरोखरच मोठी असतात कारण कितीही उंच भरारी घेतली तरी, समाजाशी नाळ कायम आहे.
मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
— आशा दळवी, दुधेबावी, फलटण, सातारा
20)
नमस्कार सर,
सह्याद्री दूरदर्शनच्या सौजन्यामुळे आपली ‘शब्दांच्या वाटेवर’ ही मुलाखत पाहिली आणि फारच आवडली. आपण सहा वर्षापर्यंत बोलत नव्हता, तरीसुद्धा नंतर केवळ जिथे बोलावेच लागते अशा विविध क्षेत्रांत उत्तम काम केले. ही देवाची कृपाच! आपण म्हणता त्याप्रमाणे परिस्थितीपेक्षा मनस्थिती उत्तम असावी लागते हे शतप्रतिशत सत्य आहे. लहानपणी शब्द बोलणे कठीण होते त्याच शब्दांची वाट आपण मळलीत आणि शब्द साहित्यात प्राविण्य मिळवून११ पुस्तकांचे लेखक झालात. त्या ११ पुस्तकांपैकी नऊ पुस्तके प्रेरणादायी सत्यकथा आहेत. समतोल जीवनाचा भाग आपल्या पुस्तकांतून प्रतीत होतो. सर, विविध क्षेत्रांत मुसाफिरी करणाऱ्या आपणाला त्रिवार प्रणाम !! मुलाखतकार पूजा चांदोरकर यांनी उत्तम प्रश्न काढून आपणास छान बोलते केले त्यासाठी त्यांचेही खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली.
21)
वारंवार ऐकावी व पाहावी अशी वाटणारी अद्वितीय मुलाखत…. आम्हा सर्व नवसाहित्यिकांना मायेचा पाठीवर हात ठेवून गुरू द्रोणाचार्य यांच्या प्रमाणे शिक्षण देणारी मुलाखत !!!!! तुमचा एकलव्य… 🙏🙏🙏💐💐💐
— प्रा मनोहर यादव. सातारा
22)
सर,
कंपन्या सोडून पत्रकार ते दूरदर्शन यात दूरदर्शनचा काळ छानच असणार कारण त्यावेळी दूरदर्शनला लोकप्रियता, प्रसिद्धी होती. दोन वाक्य खुप शिकवून गेली.इच्छाशक्तीला वय आडवं येत नाही. कठीण परिस्थितीतही जर आंतून प्रेरणाशक्ती असेल तरच काहीही करू शकतो.
वयाच्या कोणत्याही क्षणी संधी दार ठोठावत असते.
तुमचा संदेश छान होता. म्हणुनच तुम्ही इतक्या ऊंचीवर पोचलात.
नेहमीप्रमाणेच साधेपणा खुप भावला.ग्रेट आहात.
मेहनत असशीच  यशस्वी होऊ दे. 👍👍👍
— अनुराधा जोशी, मुंबई.
23)
काल मी तुमची मुलाखत पाहिली. ती अत्यंत माहितीपूर्ण आणि डोळ्यात अंजन घालणारी ठरली. तुमच्या शब्दांमधील मोत्यांसारखे अनमोल विचार आणि संभाषणातील भावुकता मनाला भिडली. देवेंद्र सर आपले मनःपूर्वक अभिनंदन !
— विजयकुमार कट्टी. ठाणे.
24)
*शब्दांच्या वाटेवर*
जी व्यक्ती रोज शब्दांशी बोलती, लिहिती, जीची शब्दांची घट्ट मैत्री आहे. शब्दांच्या जादूने सर्वांना जोडून ठेवण्याची कला ते सामर्थ्य ज्यांना लाभले, शब्द जणू नसा नसात भरलेले आहे आयुष्याची संपूर्ण पुंजी, ज्यांची खरी श्रीमंती अथवा ओळख शब्दाने होते असे सर्वांचे आदर्श अथवा न्यूज स्टोरी टुडे या परिवाराचे कुटुंबप्रमुख म्हणजे मा. देवेंद्रजी भुजबळ सर.

नुकतीच दूरदर्शनवर त्यांची मुलाखत झाली व त्यांच्या या शब्दांचा प्रवासाची माहिती मिळाली. माहिती अधिकारी असताना ज्यांना क्षणभराची देखील उसंत नव्हती सतत कामाच्या व्यापात असलेले भुजबळ सर रिटायर झाल्यावर देखील शांत बसले नाही.

सतत काहीतरी चांगले करण्याचा ध्यास, आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून समाजात परिवर्तन करण्याचा त्यांचा मानस स्वस्थ बसून देत नव्हता. त्यातून अतिशय हुशार असलेली त्यांची कन्या देवश्रीच्या मदतीने निर्मिती झाली न्युज स्टोरी टुडे पोर्टलची.
प्रचंड मेहनत, चिकाटी, सातत्य व विविधता यांनी नटलेले हे पोर्टल थोड्याच कालावधीत उंच भरारी घेऊन देश विदेशात पोहचले.

अनेक लोकांच्या गळ्याचे ताईत जणू झाले.
बर त्यांना या वेळात मस्त देश विदेशात भटकंती करता आली असती केवळ स्वतःची अनेक पुस्तक प्रकाशित करता आली असती. निवांतपणे आयुष्य जगता आले असते. पण…. असे न करता त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.

अनेक नवोदित लेखकांना प्रेरणा दिली एक आशेची ज्योत निर्माण केली. तुम्ही लिहू शकता हे आवर्जून सांगितले व उत्तम मार्गदर्शन केले.
नियमितपणे पोर्टलच्या माध्यमातून अनेकांच्या लेखणीला न्याय मिळत गेला जेणे करून लेखकांचा आत्मविश्वास वाढत गेला जगण्याला एक दिशा मिळाली. एक आशेची ज्योत निर्माण झाली. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.

येथेच न थांबता पुढे पाऊल टाकत अनेक लेखकांचे पुस्तक प्रकाशित करून त्यांना एक अविस्मरणीय भेट दिली. संपादनाची धूरा उत्तम सांभाळली. लेखकांना मोठा आधार होता तो भुजबळ सरांचा. वाचकांच्या मनात राज्य करण्याची जणू ही अदृश्य संधी होती ज्याचे अनेकांनी सोने केले.
कामाचे व्याप वाढू लागले आता सोबतीला भक्कम आधार होता तो अलका ताईंचा ज्यांनी हा भार त्यांच्या सोबतीने पेलून पोर्टल अजून आकर्षित केले. अलका ताई देखील पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक नवीन विषयाची माहिती देत आहे.

पोर्टलच्या माध्यमातून अतिशय  प्रेरणादायी लेख, कविता, जीवन प्रवास, यशोगाथा, बोध कथा आयुष्यातील अनेकांचे अनुभव एक सकारात्मक ऊर्जा देऊन जातात.
अतिशय खडतर प्रवास करत ज्यांची शब्दांची सोबत सोडली नाही हार मानली नाही असे हे भुजबळ सर. जिद्दीने ज्यांनी स्वतःचे विश्व निर्माण केले अनेक पारितोषिकांचे मानकरी पण तितकेच साधे व सर्वांना सोबत करणारे. अतिशय कडक, शिस्तबद्ध व प्रामाणिकपणे काम करणारे पण तितकेच नम्र स्वभावाचे असे दोन्ही पैलू जपणारे व्यक्तिमत्व दुर्मिळच.
एक उत्तम लेखक, संपादक, वक्ता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक उत्तम माणूस ज्यांनी आजन्म माणुसकीचा वसा जपला  त्यांना मनापासून धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. 💐💐
शब्दाच्या माध्यमातून एक छोटीशी भेट शब्दांच्या गुरुंसाठी.
— सौ रश्मी हेडे. सातारा.
25)
“शब्दांच्या वाटेवर” मुलाखत ऐकण्याची मनापासून इच्छा होती. पण प्रयत्न करूनसुद्धा पहायला मिळाली नव्हती. आपण  खास हा भाग रिकार्डिंग  पाठवल्यामुळे मला पाहण्याची संधी प्राप्त झाली. मनःपूर्वक धन्यवाद.
पाहण्याची उत्सुकता होती, जशी अपेक्षित होती, त्यापेक्षाही प्रत्यक्ष ऐकताना, पाहताना तुमच्यातील खूप नवीन पैलू दिसले. इतके मोठे कार्य केलेले असून सुद्धा खूपच साधे,सरळ स्वभावाचे, प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. आदर दुणावला यामुळे ! प्रत्येक पुस्तक काहीतरी प्रेरणा, संदेश देणारच आहे आपले.
कोवळे ऊन, गगन भरारी तर अप्रतिमच ! शब्दही कमी पडतील शब्दांच्या वाटेवर बद्दल सांगण्यासाठी, इतकी सुंदर मुलाखत झाली. शेवटपर्यंत अजून काय नवीन सांगणार पुढे, हा प्रश्न मनात येत होता. मुलाखत कित्ती झटकन संपली असे वाटले.
पूनम चांदोरकर यांनी तर छान मुलाखत घेतलीच, अगदी वेचक प्रश्न विचारून, पण आपणसुद्धा त्यावर अगदी दिलखुलासपणे, ओघवत्या शब्दशैलीत अचूक उत्तरे दिलीत. सर्वांत शेवटी दिलेला सर्वांसाठीचा संदेश तर लाखमोलाचा आहे. पूर्वी म्हणायचेच ना, ‘दुसऱ्यासाठी मेला तो खरा जगला, स्वतःसाठी  जगला तो मेला !’ खरे आहे हे. पण हल्ली असे विचार खूप कमी व्यक्तींचे असतात. आपण ते फक्त सांगितलेच नाहीत,तर आधी केले,मग सांगितले ! असे आहे.आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा 💐🙏
— स्नेहा मुसरिफ. पुणे.

— टीम एन एस टी. ☎️ +91 98694 84800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments