“माहिती”तील आठवणी…
मिळालेला प्रतिसाद पुढे देत आहोत.
🏋🏻♂️श्री विकास पाटील यांचा माहिती विभागाच्या चित्रपट शाखेचा व ताडदेवच्या आपल्या फिल्म सेंटरचा प्रदीर्घ लेख अतिशय आवडला.या लेखामुळे चित्रपट विभागाचा आणि फिल्म सेंटरचा एक उत्तम दस्ताऐवजच तयार झाला आहे.विकासजींचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांनी या लेखाला जो कौटुंबिक टच दिला तोही भावनेने ओथंबलेला.!.श्री देवेंद्रजीं हे एक कल्पक अधिकारी आहेत. त्यांनी विकासला या लेखासाठी प्रव्रुत केले आणि उचित संपादन केले त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद.
– 🏋🏻♂️🌹सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक. नाशिक
विकास पाटील हा अतिशय बुद्धिमान, संवेदनशील आणि कष्टाळू माणूस… संपादनाच्या क्षेत्रातील त्याचे आकलन आणि क्षमता अभिमानास्पद होती. अर्थात अजूनही आहे… कितीही मोठी जबाबदारी त्याच्यावर सोपवली तरी तो ती पार पाडल्याशिवाय थांबायचा नाही. रात्री उशीर झाला की अनेकदा त्याला मुंबईत थांबावे लागायचे पण त्याविषयी त्याने कधीही कुरकुर केली नाही.
विकासने अनेक अधिकाऱ्यांसोबत काम केले पण कधी कुणाचा उणेपणा दाखवला नाही की काही आगळीक केली नाही.
नेहमीचे कामकाज सांभाळून आम्ही व्यावसायिक तोडीची सुमारे पन्नास जिंगल आणि पंचवीस माहितीपट नक्कीच तयार केले असतील. त्या सार्याचे संपादन त्याने गुणवत्तापूर्ण पद्धतीने करून दाखविले… आम्ही केलेल्या माळढोक, शेकरू यांच्यावरील माहितीपटातील अनेक दृश्य बाहेरील वाहिन्यांनी अनेकदा वापरली… अनेक माहितीपट जाणकारांनी जपून ठेवले आणि पुढे त्याचा आवश्यकतेनुसार वापरही केला.
आदिवासीना हक्काने जमिनी मिळवून देणाऱ्या कायद्यावर आधारित ‘मावा नाटे मावा राज’ ही आम्ही केलेली पन्नास मिनिटाची फिल्म अजूनही मोहन हिराबाई हिरालाल त्यांच्याकडे येणार्या विद्यार्थ्यांना आणि पाहुण्यांना आवर्जुन दाखवत असतात. गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा हे गाव आणि तेथील देवाजी तोफा यांच्या कर्तृत्वावर आधारित अशी ही फिल्म आहे.
मुंबईत २००५ साली आलेल्या पुरावर आधारित ‘प्रलयांकित’ आणि रायगड जिल्ह्यातील जुई गावात आलेल्या आपत्तीवर आधारित ‘जुई’ हे माहितीपट अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. अरुण जाधव, चंद्रकांत आढाव-पाटील, विजय होकर्णे आणि आपले सगळेच कॅमेरामन, फोटोग्राफर आणि त्यांची टीम रात्रंदिवस काम करत असायची…
विकासचे वडील कवीमित्र आरेम पाटील मंत्रालयात आले की भेटून जायचे. विकासची ताई (शिक्षिका) सुद्धा रसिक मनाची कवयित्री. त्याही मंत्रालयात आल्या की भेटून जायच्या.
विकास संपादनाचे काम जितके उत्तम करायचा तितकाच त्याने आपल्या आठवणींवर आधारित हा लेखही छान लिहिला आहे. त्याचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! आणि इतके छान व्यासपीठ त्याला मिळवून दिल्याबद्दल देवेंद्र भुजबळ यांनाही धन्यवाद!
– प्रल्हाद जाधव
निवृत्त माहिती संचालक. मुंबई
Vikas Patil yanichalchitra Sarah prastut kele. Abhinandan.
– Sheshrav Chavhan. Aurangabad.
नावा प्रमाणे आवडत्या क्षेत्रात मेहनतीने ऊत्तम यश प्राप्त करुन प्रगती केलीस. मित्र म्हणून मला तूझा अभिमान आहे.
एका खेडेगावातून मुंबई सारख्या शहरात वरीष्ठांची मर्जी मिळवणे तेव्हढे सोपं नाही. तू ते चांगल्या गुणांनी साध्य केलसं. तूझे अभिनंदन…!
आठवणींचा साठा तूझ्या पाशी खूपसा आहे. तूझ्या कडून बऱ्याच वेळा बलसाड गाडीत ऐकले आहेत. लिखाणाची उत्तमच जाण आहे. अजून खूप सांगिलेल्या किस्यांची, आठवणींची नोंद घेण्यास हरकत नाही. जे आम्ही ऐकलेले आहेत.
निवृत्ती नंतर एवढी मोठी नामावली स्मरणात कशी काय ठेवली आहेस रे…?
छान कथन… असेच वरचेवर लिखाण करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा..!
– जयप्रकाश पाठक.
संगीतकार, गायक. निवृत्त अधिकारी, मुंबई विद्यापीठ.
विकासभाई, अभिनंदन आणि शुभेच्छा.
आपल्या स्वभाववैशिष्याचे अनेक पदर ऊलगडणारा हा लेख आहे.आपली स्मरणशक्तीतर दांडगी आहे.शासनसेवेत कार्यरत असतांना जे सहकारी,वरिष्ठ संपर्कात येत गेले त्यांचा आदरपूर्वक स्वभाववैशिष्ट्यांसह ऊल्लेख हा निर्मळ मनाचा आरसा आहे.जे काम ईश्वरी इच्छेने आपल्या नशिबी येते त्या कामावर निष्ठा ठेवणे आणि अत्यंत नेटके, प्रामाणिकपणे आणि आवडीने करणे आणि त्या कामात आपले कौशल्य ओतणे ज्याला जमते ती व्यक्ती निवृतीनंतर ही समाधानी राहते. मनाला टोचणी, खंत वाटत नाही. विकास भाई, आपणही असेच आहात. कार्यालयाची सय येणे आणि सहकारी, वरिष्ठांना अजूनही तुम्ही आठवणित आहात. आपल्या मनाच्या गाभाऱ्यात दडलेल्या आठवणींना ऊत्तम पद्धतीने व्यक्त करतांना समर्पक फोटो टाकले आहेत.स्व चा बडेजाव न दाखविता अनेकांचा आदरपूर्वक सहभाग नोंदवितांना कृतज्ञतेने ऊल्लेख केला आहे.लिहित रहा आम्ही आनंदे वाचित राहू. सौ.ज्योती जयप्रकाश पाठक. एम्.ए.बी.एड. निवृत्त माद्यमिक शाळा, मुख्याद्यापिका.
विकास पाटील यांनी घेतलेला फिल्म सेंटरचा आढावा वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. समर्थ साहेबांचा काळ आठवला. कुमार सेन समर्थ, उपसंचालक फिल्म होते..
🌹🙏🌹
– सुधाकर धारव. निवृत्त माहिती उपसंचालक
श्री.विकास रघुनाथ पाटील हे आमचे जवळचे नातलग. वयाच्या पाचव्या वर्षापासुन मी त्यांना ओळखतो. घरातलं पोषक वातावरण आणि छंद ह्यामुळे त्यांनी शैक्षणिक जीवनात मानाचं स्थान पटकावलं. सचिवालयात नोकरीला लागल्यावर त्यांच्या कामाला वेगळीच कलाटणी मिळाली. एक अष्टपैलू व्यक्तीमत्व आणखीनच बहरायला लागलं. त्यांनी कित्येक डॉक्युमेंटरी तयार केल्या. त्याचा लाभ गावच्या लोकांना खुपच झाला. अशा ह्या बहुरंगी कलाकाराला माझा मानाचा मुजरा🙏🙏
– अरविंद म्हात्रे, बोरीवली..
प्रिय विकासभाई,
सुंदर शब्दांकन.
तुम्ही टिपलेले काही क्षण वाचून प्रत्यक्ष त्या परिसरात वा त्या फिल्मि क्षेत्रात जाऊन आल्या सारखे भासते. खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात त्यामुळे तुम्हाला अशा मोठ्या लोकांत वावरायला मिळाले आणि त्याचा प्रत्यय तुमच्या वागण्यातून दिसतो.
तुम्ही हे गृपवर टाकून आमच्या बरोबर ह्या आठवणी वाटल्या त्या बद्दल धन्यवाद !
– मिलिंद पाटील, केळवे-बोईसर
विकास, तुझे खास अभिनंदन. अविसमरणीय आठवणींचा सुंदर साठा तुझ्या हलकंफुलकं खुसखशीत लेखनाद्वारे अजरामर केलस.
– रंजन ज. पाटील
विकास ऑफीसचे वातावरण जिवंत केलेस. खूप छान..!
– दिलीप राऊत.
स्फुरणदायी कारकीर्दीचे सुंदर शब्दांकन 🙏
– प्रविण सावे.
प्रिय विकास ,…..खुप छान तुझ्या गतस्मृती छान धांडोळा घेतला आहेस .चढ- उतार , अचानक आलेल्या सधी टिपणं, कामसूवृत्तीला सहका-यांनी दिलेली उत्तम साथ यामुळे झालेली यशस्वीतेकडे वाटचाल .आनद वाटला .शुभंभवतु..!
– राऊत गुरुजी..
👌 खुप छान आठवणी
– चिंतामण तांडेल.
खूप सुंदर लेख विकास भाई
– मधूसूदन जोशी.
विकासभाई, सुंदर ..!
तुझ्यात छान लेखक लपलेला आहे..
– विजय सावे.
👌👌👌 अनुभव लिखाण खूप छान झालं आहे.
– नितीन गावकर..
👍👍 छान आठवणी
– सौ. ऊज्वला वैद्य
छान आठवणी… विकास, अभिनंदन आणि शुभेच्छा..💐
– प्रकाश वैद्य
खुप सुंदर माहिती संकलित केली आहे 👌🏻
– संदेश चुरी.
अविकसित खेड्यातील एका नवख्या मुलाने कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा, कामाशी बांधिलकी आणि सुस्वभाव या दुर्लभ गुणांच्या आधारे शून्यातून साफल्याकडे केलेल्या यशस्वी प्रवासाची ही प्रेरणादायी व अनुकरणीय कहाणी असून आई-बाबांची पुण्याई, अर्धांगिणीची मोलाची साथ, सहकारी वर्गाचं बहुमूल्य सहकार्य या बाबी अनुकूल असल्या की आपल्या ध्येयाप्रत लीलया पोहोचणं किती सुकर असतं याचा अनुभव विकासचं आत्मकथन वाचल्यावर अधोरेखित होतं.विकासच्या या यशस्वी प्रवासातील निषादच्या निधनाच्या दुर्दैवी घटनेच्या उल्लेखाने मात्र नकळत लोचनांच्या कडा ओलावतात व प्राक्तनाने विकासवर अन्याय केल्याची भावना दृढ होत जाते ; पण शेवटी ” पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा ” असं मानून आम्ही स्तब्ध होतो !
– जमिल शेख
अध्यक्ष, पालघर तालुका मराठी साहित्य मंडळ.
चित्र सफर ( २ )
“कभी अलविदा न कहना” ही माझी स्टोरी आपण खूपच सुंदररित्या सादर केली. यापुढेही मी असेच लेख आपणापुढे सादर करेन. आपले सर्वांचे अभिप्राय ही या लेख विषयी द्यावे. आपला व आपल्या टीमचा मी आभारी आहे.
या लेखाविष्यी प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
– संदीप भुजबळ.
संदिपदादा,
खूप सुंदर लेख लिहिलास.
तुला तुझ्या भावी जीवनासाठी आणि गायनासाठी
अगदी मनापासून भरपूर शुभेच्छा.🙏
– गजानन हेलसकर. मुंबई
संदिपजी,
आम्ही सगळे आपल्या सोबतच आहोत. आजाराची कश्याला चिंता करता ? त्या पेक्षा भयानक आजारातून (अल्कहोलीझम) मधून आपणं सगळे बाहेर पडलेलो आहोत.हा सगळा साक्षात् ईश्वरी चमत्कारच आहे.
आपण फक्त मनाने कधीच हारायचे नाही. मग अशी कितीही संकटे आपल्याला पाहूनच दूर जातात . मनाच्या ताकदी साठी आपला पाठपुरावा आणि सांघीकता एकसंघ ठेऊयात .
आपल्या गायनाचे पुनश्च कौतुक करावे तेव्हडे थोडेच आहे… धन्यवाद.
– अविनाश ठाकूर. राहुरी
विनोद पंडित, जलसंपदा विभाग. अहमदनगर, श्री सचिन रोकडे, जलसंपदा विभाग. संगमनेर,
👌👌👍👍
श्री रामदास गांगुर्डे, जलसंपदा विभाग संगमनेर
👌👌👌👌👍👍👍👍श्री महेश अस्वले संगमनेर,
👌👌श्री विनय टोकेकर जलसंपदा विभाग ,संगमनेर,👌🏾राजू कोळपकर , संगमनेर, Nice👆👆🙏🙏श्री नारायण वारंग, जलसंपदा विभाग, संगमनेर,
👌👌👌श्री सतीश वाघमारे जलसंपदा विभाग अहमदनगर,
👍🏻👍🏻अमोल आंधळे उपविभागीय अभियंता जलसंपदा विभाग संगमनेर,
👍देशमुख साहेब नाशिक,🌹🙏🏻🌹👌🌹श्री सुनील उंडे, राहुरी,
👌🏻👌🏻👍🏻👍🏻💐💐श्री प्रवीण जलसंपदा विभाग, अहमदनगर
👍🙏🏻संजय पाटोळे जलसंपदा विभाग संगमनेर, निलिमा मेहता, नाशिक यांनीही संदिप भुजबळ यांचे अभिनंदन केल्याबद्दल त्यांचेही आभार
👌👌👍🏻👍🏻सविता मावळे संगमनेर,
उत्कर्ष रासने, गौरव रासने. संगमनेर.
👍💐🙏🏽Back to pavilion
– डॉ सदाशिव हेलासकर. मुंबई
👌👌👌👍🏻👍🏻👍🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻श्री कासार
से नि उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर
मित्रा खुपच छान रे. खरच मला खुप आनंद झाला हे सर्व पाहुन .
तुला मना पासुन शुभेच्छा….🙏😊💐
– सुभाष सोनवणे. जलसंपदा विभाग. अहमदनगर
दादा तुमचे स्वर असेच निरंतर चिर तरुण राहतील. आमच्या मनाला तृप्त करीत राहोत हीच प्रार्थना🙏🏻
– विजय रोहकले, मुक्तांगण मित्र. अहमदनगर
खूप सुंदर 👌
– सविता जाधव, जलसंपदा विभाग. संगमनेर
पुर्ण लेख वाचला. अतिशय छान आहे. संदीपजी, आपणास पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा 🌷
– भास्कर जाधव. मुक्तांगण मित्र. अहमदनगर
👌👌
छान लिहिलय – सौ .राखी लोखंडे. सोलापूर
👌🏻👌🏻 रेश्मा तळेगावकर. मुंबई
Thank you for your message. -VijayShree jewellers 💍😌👍
छान
– सौ स्मिता होरणे. पुणे
छान 👌👌👌
– केशव कुंभकर्ण. औरंगाबाद
Khup chhan…. Wish you very happy music tour at present and in future.🌹🌹🌹🌹🙏🏿🌹🌹🌹🌹 – हेमंत साखरे
डिफेन्स अधिकारी अहमदनगर
Sandeep… …Great…👍🏼👍🏼…proud of you my friend….☺️
– निशिकांत पाटसकर. पुणे
🏋🏻♂️लेखन अप्रतिम…
– सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक . नाशिक
संदीप ची यशकथा अतिशय प्रेरणादायी आहे. एका तुटलेल्या माणसाला प्रतिसाद दिल्याबद्दल देवेंद्रजींना हार्दिक धन्यवाद.🌹
– सुधाकर धारव
निवृत्त माहिती उपसंचालक. यवतमाळ
इच्छा तिथे मार्ग 👌🌹
– सौ सुरेखा रासने. संगमनेर
Nice👍
– पानमंद, जलसंपदा विभाग. नारायणगाव
भारी🙏👌
– पीयूश कोळपकर. राहुरी
डिजीटल माध्यमांना उज्वल भवितव्य
– देवेंद्र भुजबळ.
🌹हार्दिक अभिनंदन माननीय श्री. भुजबळ साहेब 🌹आपण मांडलेले विचार नक्कीच अमलात येतील.
शासन दरबारी पाठपुरावा मात्र जरुरी आहे.
मी माझी… 🌹खूप सुंदर रचना 🌹
भावस्पर्शी, उत्तम लेखन कवयत्री
धन्यवाद , तनुजा प्रधान मॅडम.
– अशोक साबळे.
अशी आई हवी…
Thank you so much Varsha madam, mother is mother. We should always honour her, My mother is or your mother is mother, no differ at all. difference is always there still mother is mother because of her I or we are here on earth another mother. Well express your thoughts. gr8 Varsha madam
– महेंद्र भाबल.
परदेशस्थ केरळवासी छान वर्णन केलं आपण.
एक प्रगत राज्य केरळ आहे. प्रत्येक घरातील माणूस परदेशीं नौकरी करतो.
एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. मलेशिया आणि सिंगापूर ला जास्त केरळी आहेत.
मलेशिया तर तामिळ ही ऑफिसिअल भाषा आहे.
तेथे तामिळ प्रेसिडेंट होते.
मी नेव्हीत असताना कोचीन ला सर्विस केली आहे.🌹धन्यवाद सौ. मनीषा पाटील 🌹
– अशोक साबळे.
कुठे गेला सहजपणा ?
प्रती, शिल्पा कुलकर्णी
एकदम सहमत आहे लेखाशी, बाहेर राहिल्यानंतर तर भारतातील झालेला फरक खुप जाणवतो. सर्व दुःखाचे कारण पैसा आहे. हल्ली कोणाला काही सांगण्याची सोय नाही. मस्त लेख आहे .
– शलाका कुलकर्णी
“ओठावरलं गाणं”
🌹अतिशय सुंदर शब्दात आपण वर्णन केले
🌹अभिनंदन श्री विकास भावे साहेब
– अशोक बी साबळे.
कुठे गेला सहजपणा ?
खुप छान विचार मांडला, खरचं गरजेचा आहे.
– वीणा आपटे.
“ओठावरलं गाणं”
अप्रतिम रसग्रहण. विकासजी तुमचं रसग्रहण नेहमी सुंदर असतं. 👌👌👌
– अजित महाडकर.
गौळण कविता अप्रतिम. निसर्गवर्णन आणि मानवी भावनांची सुंदर सांगड घातली आहे.
देवेंद्र भुजबळ यांनी आपल्या मुलाखतीत वृत्तपत्राचा वाढता प्रभाव असूनही या प्रवासात निर्भीड आणि निर्भय पत्रकारितेसाठी पत्रकारांच्या सुरक्षिततेची गरज प्रतिपादन केली. पत्रकारांनीही विश्वासार्हता टिकवण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. यशस्वी पत्रकारांसाठी आवश्यक बाबींचे त्यांचे विवेचन अभिनंदनीय आहे.
– डाॅ.सतीश शिरसाठ.
कुठे गेला सहजपणा ?
माणूस हा सनमाजप्रिय आहे.माणसाने माणसाला भेटले पाहिजे, बोलले पाहिजे हा विचारच नामशेष होत चालला आहे.
आमचे आम्ही ही संस्कृती वाढत चालली आहे.
शिल्पा कुळकर्णींंनी मांडलेलंंहे मत पटतं. पण आजकाल असे झाले आहे खरे !
श्री. देवेंद्र भुजबळ यांची दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर पत्रकारिता या विषयावर झालेली मुलाखत
ऐकण्यासारखीच आहे.
पत्रकारिता आणि पत्रकार, आजचे कालचे, त्यांच्या समस्या, त्यांच्या मर्यादा, सुविधा या सर्व मुद्यावरच्या प्रश्नांना त्यांनी अत्यंत समंजसपणे ऊत्तरे दिली. पत्रकार हा भयमुक्त असावा हे त्यांचे विधान पटले. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन हे पत्रकाराचे महत्व काम. त्यांत सौदेबाजी नसावी हा संदेशही त्यांनी त्यांच्या मुलाखतीतून सहजपणे दिला.
सुरेख मुलाखत. अभिनंदन आणि धन्यवादही.
– राधिका भांडारकर.
“ओठावरलं गाणं”
छान नेहमी प्रमाणे
– गौरव.
गौळण..
वाह वाह मस्त, डॉ जोशी
– विलास कुलकर्णी.
🙏🏻माननीय श्री.भुजबळ सरांनी आज चे बदलते डिजिटल युग, व डिजिटल माध्यम याबद्दल महत्त्व पूर्ण माहिती, दिल्याबद्दल मनपूर्वक सरांचे आभार💐💐
– प्रियांका देशपांडे.
मनिषा पाटील या लेखिकेने केरळच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा आढावा घेतला आहे. शिक्षण, साक्षरता, पर्यटन अशा बाबींचा उल्लेख करतानाच समाजसेवेचे कंकण हाती घेतलेल्या परिचारिकांची केरळमधील संख्या जास्त असल्याचा उल्लेख महत्त्वपूर्ण वाटतो.
डिजिटल इंडिया २०२२ च्या चर्चासत्रात देवेंद्र भुजबळ यांनी डिजिटल माध्यमांच्या उज्वल भविष्याचे सूतोवाच करताना या माध्यमांच्या विकासासाठी आवश्यक कृतींचाही आग्रह धरला.
एका ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञाने केलेले विवेचन निस्चितच स्तुत्य आहे.
– डाॅ.सतीश शिरसाठ.
कुठे गेला सहजपणा ?
प्रती, शिल्पा कुलकर्णी
एकदम सहमत आहे लेखाशी, बाहेर राहिल्यानंतर तर भारतातील झालेला फरक खुप जाणवतो. सर्व दुःखाचे कारण पैसा आहे. हल्ली कोणाला काही सांगण्याची सोय नाही. मस्त लेख आहे .
– शलाका कुलकर्णी
“ओठावरलं गाणं”
🌹अतिशय सुंदर शब्दात आपण वर्णन केले
🌹अभिनंदन श्री विकास भावे साहेब
– अशोक बी साबळे.
कुठे गेला सहजपणा ?
खुप छान विचार मांडला, खरचं गरजेचा आहे.
– वीणा आपटे.
“ओठावरलं गाणं”
अप्रतिम रसग्रहण. विकासजी तुमचं रसग्रहण नेहमी सुंदर असतं. 👌👌👌
– अजित महाडकर.
गौळण कविता अप्रतिम. निसर्गवर्णन आणि मानवी भावनांची सुंदर सांगड घातली आहे.
देवेंद्र भुजबळ यांनी आपल्या मुलाखतीत वृत्तपत्राचा वाढता प्रभाव असूनही या प्रवासात निर्भीड आणि निर्भय पत्रकारितेसाठी पत्रकारांच्या सुरक्षिततेची गरज प्रतिपादन केली. पत्रकारांनीही विश्वासार्हता टिकवण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. यशस्वी पत्रकारांसाठी आवश्यक बाबींचे त्यांचे विवेचन अभिनंदनीय आहे.
– डाॅ.सतीश शिरसाठ.
सखे…
किरण सोनार यांची कविता वाचून मन खरोखरच हेलावून गेलं.
पापणी तुझी ओलावली एकदा
तेव्हां मन माझंही झालं ओलं
तुझी येणारी आठवण आणि श्वासाला
नांव द्यायचं राहून गेलं..
क्या बात है !!..
– राधिका भांडारकर.
संध्याछाया, अप्रतिम लेखन !👌👌
कुठे गेला सहजपणा ?
खूप चांगला, विचार करायला लावणारा लेख ! 👌👌खरेच आत्मचिंतन करायची वेळ आलेली आहे👍👍
– तनुजा प्रधान.
🌹माननीय श्री. भुजबळ साहेब हार्दिक अभिनंदन🌹
– अशोक साबळे.
भुजबळसर व त्यांचे- कुटुंब सर्वांचे मनापासून अभिनंदन ! कसलाही मोह न करता जनसेवेचा विचार करणाऱ्या व्यक्ती खूप कमी असतात.
तुमच्यासारख्या पत्रकाराचा गौरव अभिमानास्पद आहे. तुमचे कार्य खूपच कौतुकास्पद व आदरणीय आहे.
खूप खूप अभिनंदन !!
– सौ.वर्षा भाबल.
माननीय भुजबळ साहेबांचे चौथा स्तंभ पुरस्काराने यथोचित गौरव झाला आहे. प्रयोगशीलता, नाविण्याचा हव्यास आणि सहजसुलभता ह्या नैसर्गिक गुणांमुळे यापुढेही त्यांच्या प्रकाशनात वैविधता मिळेल याची खात्री आहे.
भुजबळ सरांचे पुनःश्च अभिनंदन 🙏
… श्रीकांत द. चव्हाण
मा.देवेंद्रजी भुजबळ यांना मिळालेला पुरस्कार हा त्या पुरस्काराची उंची वाढवणारा आहे.
मा.भुजबळ साहेब आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन सर!!!!!*****!!!!!
– श्री. अंकुशराव तानाजी
लालबत्ती ( 27 )
दु:ख हेच एकमेव सत्य जीवनी, त्यातही हसायचा सराव पाहिजे.
– संगीता जोशी.
हृदयातला वसंत !
वाह…! वसंत ऋतूचं उत्कृष्ट वर्णन आणि
जोडीला समर्पक काव्यरचना …!
खूपच छान…!
… प्रशांत थोरात, पुणे.
स्वजीवनाचे प्रवासी..
प्रकाशाची उत्तम कविता.
चित्र सफर ( २ )
आपल्या मित्राच्या शेतावर झालेल्या एका कार्यक्रमात लेखकाने तोंडाच्या झालेल्या ऑपरेशननंतरही केवळ इच्छाशक्तीने गाणे सादर केले. ह्या जिद्दीचे वृत्तांकनही सुंदर.
– डाॅ.सतीश शिरसाठ.
स्वजीवनाचे प्रवासी..
सुजाता अप्रतिम कविता
– ज्योत्स्ना.
खूप छान लिहीले आहेस, अर्थात प्रत्यक्षात तू ते करून दाखवलस म्हणूनच लिहू शकलास, wel done, keep it up👍👍👏👏👌👌– डॉ स्वाती दगडे.
प्रेमांकुर
खूप छान कविता. सुंदर वर्णन
– स्नेहा.
“माहिती”तील आठवणी ( ५ )
आपल्या कामाशी प्रामाणिक, मेहनती वृत्ती व सकारात्मक उर्जा या त्रयीच्या आधारे माहिती व जनसंपर्क विभागात संकलकाचे काम करत आपण प्राप्त संधीचे सोने केले.
आज मागे वळून पाहताना हे अनुभव कथन मनाला प्रेरणादायक वाटेल यात शंकाच नाही.पुढील वाटचालीस सदिच्छा💐
– वंदना विविध पाटील.
व्वा विकास ! चित्रपट ते वृत्तचित्र शाखेचा एक पटच उभा केला. मोठमोठ्या आसामींचा सहवास, आशीर्वाद आपल्याला लाभला. खरोखर असे भाग्य लाभायला पूर्वपुण्याईच लागते. त्या काळातील किस्से आठवणी आपण अतिशय मनोवेधक पध्दतीने मांडल्या आहेत. आपल्या लेखणात एक शैली आहे. आपल्या आयुष्यात आलेला आघाताचा प्रसंग हृदयाला चटका देऊन गेला. आपले महासंंचालनालय म्हणजे खरोखर अशा प्रसंगात आधार देणारे महाकुटूंब आहे हे मी देखील 2018 मध्ये जे जे मध्ये दाखल करावे लागले तेव्हा अनुभवले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंंचालनालयातील असेच अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या आठवणी शेअर केल्या तर तो एक फार महत्वाचा दस्तऐवज तयार होईल. या आठवणी पुसून जाण्याआधी शब्दात लिहून ठेवल्या पाहिजेत. पुनश्च विकास हार्दिक अभिनंदन, असेच नित्य नूतन लिहित रहा !
– विलास कुडके.
बदलत्या कुटुंब व्यवस्थेत ज्येष्ठांची भूमिका…
लेख आवडला. ज्येष्ठांची वयपरत्वे केलेली वर्गवारी आणि टीसनच्या समस्या योग्य रीतीने मांडल्या आहेत आणि त्यांनी वेळ घालविण्यासाठी करावे लागणारे नियोजनही भावले.
– अनुराधा नेरुरकर.
स्वजीवनाचे प्रवासी
🌹अप्रतिम कविता 🌹
धरती माता छान वर्णन केलं आपण.
चातकासारखी वाट पाहावी लागती
मृग जल तहानती
पडीक जमीन आमुची
सरी बरीस लवकरी.
🌹अभिनंदन 🌹
सुजाता येवले मॅडम
🌹खरंच दाद द्यावी 🌹
अभिनंदन संदीप आपले 🌹
– अशोक साबळे