‘न्युज स्टोरी टुडे’ या वेबपोर्टलची मुळ संकल्पना देवश्री भुजबळ हिची. अभिमानास्पद गोष्ट म्हणजे आज हे पोर्टल ८६ देशात पोहोचले असून वाचक वर्ग देखील लाखोंच्या संख्येत आहे.
कोरोनाच्या बिकट परिस्थितीत सुरू झालेले हे वेबपोर्टल लोकप्रिय झाले याचे कारण यातील नाविन्यता व विविधता. संस्कारांना आधुनिकतेची जोड असलेले हे पोर्टल अनेक कवी व लेखकांचे हक्काचे व्यासपीठ झाले आहे. अनेकांना या माध्यमातून स्व ची ओळख निर्माण झाली व समाजात आज मानसन्मान मिळत आहे.
वेबपोर्टलच्या विविध उपक्रमांपैकी एक लोकप्रिय उपक्रम म्हणजे अनौपचारिक स्नेहमिलन.
आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या युगात लोक एकमेकांपासून दुरावत आहेत. संवाद दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. यालाच प्रगती म्हणावी का ? असा प्रश्न सहज मनात निर्माण होतो. फक्त पैसा, प्रसिद्धी म्हणजेच जीवन नव्हे तर समाधान व आनंदाची जोड महत्वाची आहे, अशी या स्नेहमिलनाची अपेक्षा असते.
या स्नेह मिलनात कुणी अध्यक्ष नसतो, प्रमुख पाहुणे नसतात, सूत्र संचालक नसतात. मनमोकळ्या गप्पागोष्टी, कविता, अनुभव कथन, स्वतःचे विचार मांडण्याची प्रत्येकाला मिळणारी संधी या मुळे हे स्नेहमिलन अविस्मरणीय ठरते.
संगमनेर, नाशिक, पुणे, विरार, नवी मुंबई नंतर नुकतेच सातारा येथील स्नेहमिलन लेखिका, सौ रश्मी हेडे यांच्या घरी नुकतेच आनंदात पार पडले. पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. या नंतर नवोदित चित्रकार कुमारी प्रांजल उल्हास हेडे हिने हसत मुखाने सुंदर गुलाब पुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले. तर सौ तृप्ती खुटाळे व सौ मनीषा हेडे यांनी सुमधुर मराठी भावगीते सादर करून वातावरण संगीतमय केले.
या स्नेह मिलनाच्या विशेष केंद्रबिंदू ठरल्या त्या महाराष्ट्र शासनाच्या वैध मापन विभागाच्या सातारा उप नियंत्रक
सौ ज्योती पाटील मॅडम. उपस्थितांना ग्राहक विषयक कायद्यांची, नियमांची, त्यांच्या हक्कांची, जबाबदारीची त्यांनी छान माहिती दिली. अनेक शंकांचे निरसन केले.
प्राचार्य आर बी जाधव सर यांनी शिक्षण आणि साहित्य विषयक विचार प्रकट केले. तर कर सल्लागार श्री हेमंत कासार, उद्योजक श्री शिरीष खुटाळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शामकाका सासवडे, दै सकाळचे फलटण येथील राज्य पुरस्कार विजेते पत्रकार श्री किरण बोळे, कार्यकारी अभियंता श्री संजय तवले, सोलर उद्योजक श्री रवींद्र सासवडे, बांधकाम व्यावसायिक श्री महेश खुटाळे, सौ आशाताई कुंदप, अवघ्या ८६ वर्षांच्या निवृत्त शिक्षिका श्रीमती इंदुमती रानभरे यांनी छान अनुभव कथन केले, तर लेखिका सौ रश्मी हेडे यांनी त्यांचा लेखन प्रवास रंजकपणे उलगडून दाखवला.
या स्नेह मिलनाचे सरप्राइज ठरले ते सौ रश्मी हेडे यांनी लिहिलेल्या आणि पोर्टल वर प्रसिध्द झालेल्या यश कथांच्या, ‘समाजभूषण २’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे
अनावरण. मराठी साहित्य जगतात, बहुधा पहिल्यांदाच असे मुखपृष्ठाचे अनावरण झाले असावे. या पुस्तकाला सर्व उपस्थितांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
यानंतर कुमारी प्रांजल च्या आर्ट गॅलरी ला सर्वांनी भेट देऊन तिची चित्रे पाहून कौतुक केले. तर काका
पेढेवाले – नवं उद्योजक प्रणित कुंदप यांनी त्यांच्या आगामी भव्य शो रूम मध्ये चित्रे काढण्याची ऑर्डरच प्रांजल ला देऊन टाकली. त्यांची ही ऑर्डर म्हणजे अनपेक्षित व आनंदाचा धक्का होता, जो अवघ्या नववीत असलेल्या प्रांजलच्या भविष्यासाठी प्रेरणा देईल.
शेवटी प्रणित यांनी त्यांचे काका पेढे वाटून सर्वांचे तोंड गोड केले.
असे हे ‘न्युज स्टोरी टुडे’ चे सातारा स्नेहमिलन गुलाब फुलाच्या स्वागतापासून सुर झाले आणि काका पेढेवाले यांच्या पेढ्यानी गोड सांगता झाली.
या स्नेह मिलना विषयीच्या काही प्रतिक्रिया पुढे देत आहे :-
१. Thanks for inviting. I enjoyed a lot. Now today’s life is very fast . Everything we gets except good friends and company.
yesterdays meeting minimize this feeling. everyone who wanted the platform to talk or express themselves, got the chance. thanks for arrenging such novel programme.
I appreciate all this and expects very soon we will meet soon.
I have one suggestion, if everyone know the subject of getogether then better to prepare and one more thing, everybody take initiative and arrange programme at different places with atleast one picnic in a month to make our relations concreate. Regards.
– Jyoti Patil.
Dy.Contoller, Waights and Measures Dept. Satara.
२. स्नेहमिलन या भुजबळ साहेबांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला. ज्यांना वैचारिक पार्श्वभूमी व साहित्य लिखाणाची मनापासून आवड आहे अशा विचारवंतांनी मनापासून वैचारिक देवाणघेवाण केली. सौ.रश्मी हेडे यांनी उत्कृष्ट नियोजन केले. सर्वांनी मनापासून कार्यक्रमाचा आनंद घेतला. असे कार्यक्रम वारंवार व्हावेत हीच अपेक्षा.
विशेष म्हणजे आम्ही, मी स्वतः, माझी पत्नी सौ.आशा, मा.भुजबळसाहेब या स्नेह मिलन कार्यक्रमाच्या आदल्याच दिवशी दिनांक २८ जानेवारी रोजी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यक्रमास पाटण येथे उपस्थित राहीलो असता आमची मा.ज्योती पाटील, उपनियंंत्रक वैद्यमापन, सातारा जिल्हा यांची नव्यानेचे ओळख झाली असता, त्यांनाही मा.भुजबळ साहेब यांनी स्नेहमिलन कार्यक्रमास येण्याची विनंती केली. त्यानुसार त्याही आल्या.
मा.हेमंतजी कासार साहेब, कर सल्लागार.; मा.शिरीष भाऊ खुटाळे, उद्योजक निवृत्त प्राचार्य आर.बी.जाधव,
उद्योजक रविन्द्र कुंदप, शामराव सासवडे, बांधकाम व्यावसायिकमहेश कोकीळ, कार्यकारी अभियंता
संजय तवले या सर्व मंडळी बरोबर खेळीमेळीत चर्चा करुन त्यांच्या अडचणी बाबत व उपस्थित केलेल्या शंकाबाबत मार्गदर्शन केले. जेंव्हा असा स्नेहमिलन सारखा सोहळा घडवून आणला जातो त्या वेळी कधी ही चर्चा सत्रात सहभागी न होणारी मंडळी आपोआप बहूतांश जण व्यक्त होत जातात हेच तर अशा स्नेहमिलन समारंभाचे वैशिष्ट्य आहे.
खरे तर एखाद्या शासकीय महिला अधिकारी यांनी अशा घरगुती समारंभात उपस्थित राहून चर्चेत सहभागी होणं ही कौतुकास्पद गोष्ट आहे. एक अफलातून व्यक्तीमत्व असणारे मा.देवेन्द्रजी भुजबळ साहेब यांच्या कुशल संघटन कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
हेमंतजी कासार यांचे नेतृत्व आम्हाला लाभले म्हणून तर असे समारंभ घडवून आणले जातात. त्यांचेही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आमच्या समाजातील ज्येष्ठ व श्रेष्ठ मंडळी ना विनंती आहे की असे कार्यक्रम वेळोवेळी घडवून आणावेत.
हेडे कुटुंबातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली म्हणूनच हा समारंभ यशस्वी झाला.🙏🏼
– अशोक कुंदप.
निवृत्त उप मुख्य दक्षता अधिकारी
दुग्ध व्यवसाय विकास विभाग. महाराष्ट्र शासन
३. आपल्या कार्यक्रमाची संकल्पना छान आहे. त्यामुळे नविन माहिती मिळाली. पोर्टल वरील साध्यासोप्या भाषेतील लिखाण मनाला भावते. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
– सौ तृप्ती संदीप खुटाळे. सातारा.
४. वेबपोर्टलचा कार्यक्रम खूप चांगला झाला. माझ्या दुकानदारीमुळे फार वेळ थांबता आलं नाही त्याबद्दल सॉरी. मला स्टेज डेरिंग नसल्यामुळे बोलता येत नाही. अन्यथा मला सुद्धा खूप बोलायचं होतं, सांगायचं होतं. माझी छोटीशी कथा कासार साहेबांनी लिहिलेली आहे. तुम्ही कदाचित वाचली पण असेल. ती मी तुम्हाला वैयक्तिक शेअर करतोय.
– भानुदास मोहिरे
५. स्नेह मिलन हा कार्यक्रम खुप छान झाला. त्यातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित असल्यामुळे त्यांचे मनोगत ऐकायला मिळाले. पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा…👏🏻👏🏻👏🏻💐💐
– सौ पौर्णिमा कुंदप
– टीम एनएसटी. 9869484800.
स्नेहमिलनाचा कार्यक्रमाचा इति वृतांन्त उत्कृष्ठ रेखाटला आहे ,आईने वृतान्त दिलाच होता,आज प्रत्यक्षात अनुभवल्याचा फील आला ,संपादक महाराजांच्या लिखानामुळे 😊,प्रांजलची चित्रे खरच उत्कृष्ठ आहेत ,पुढील वाटचालीस शुभेच्छा बेटा ,देवश्री तुझ्या कल्पनेच्या रोपाचा वटवृक्ष फोफावत आहे ,तूलाही शुभेच्छा 😊🙏
खूप छान ,देवेद्रजी भूजबळ शतशः धन्यवाद तूमच्या प्रतिभावान व्यक्तीमत्वाला त्रिवार वंदन ,जनसंपर्क वाढविण्याची ही कला निश्चितच शिकण्यासारखी आहे ,पुस्तकाचे मुखपृष्ठ उत्कृष्ठ झाले आहे 👌👏👏🎉🎉🎉