Wednesday, June 18, 2025
Homeकलाआठवणीतील रामनाथ

आठवणीतील रामनाथ

ज्येष्ठ साहित्यिक, समाजकार्यकर्ते आणि चित्रकार कै. रामनाथ चव्हाण यांचा ५ मार्च १९५२ हा जन्मदिवस.
या निमित्ताने त्यांच्या आठवणी जागवणारा, त्यांचे वेगळेपण सांगणारा हा लेख लिहिला आहे, प्रा डॉ सतीश शिरसाठ यांनी.

कै. रामनाथ चव्हाण यांना आपल्या पोर्टल तर्फे विनम्र अभिवादन.
– संपादक

पुणे विद्यापीठातल्या प्रौढ, निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागात मी रूजू झालो त्यावेळी विद्यापीठ कक्षेतल्या पाच जिल्ह्यांतल्या शेकडो महाविद्यालयांमधून प्रौढ शिक्षण कार्यक्रम धडाक्यात चालू होता. कार्यकर्त्यांची शिबीरं, प्रशिक्षण कार्यक्रम, मेळावे इथपासून राष्ट्रीय, विभागीय चर्चासत्रं, कृतिसत्रं सतत होत. विविध स्तरावरच्या कार्यकर्त्यांची उठबस इथं नेहमीच असायची. विविध पुस्तकं, नियतकालिकं,
वर्तमानपत्रं यांचा इथं खच पडलेला असायचा. भितींवर अनेक तक्ते, पोस्टर्स आणि चित्रं असायची.

या सर्व चित्रात एक चित्र उठून दिसायचं. एक माणूस या विभागाची दिशा दाखवत असलेले हे चित्र होते. एअर इंडियाच्या महाराजाच्या वेषात हा माणूस आदबीनं उभा होता. पण या माणसाला चेहरा नव्हता. त्या ठिकाणी प्रौढ शिक्षणाचं चिन्ह होतं-गोलात इंग्रजी वाय आकार. वायमध्ये एक भरीव ठिपका. या चित्राचे मला नेहमी कौतुक आणि कुतूहलही वाटत असे. आयडिया भन्नाट होती. कुणाकडून तरी कळलं की, आपल्या विभागात एक चित्रकार होते, रामनाथ चव्हाण नावाचे. त्यांनी अशी बरीच चित्रं काढली होती.

केवळ रेखाटलेल्या चित्राला व्होकॅब्युलरी पिक्चर म्हणतात. त्यापेक्षा आशयघन कन्सेप्ट पिक्चर्सना प्रौढ शिक्षणात महत्वाचे मानले जाते. चव्हाणांची चित्रं कन्सेप्ट पिक्चर्स होती. चव्हाणांविषयी मी खूप ऐकून होतो. सर्वसामान्य नव्हे तर गरिब घरातून जिद्दीनं पुढं आलेल्या या युवकाला त्याच्या विचारांच्या माणसांची साथ इथं मिळाली. आणि त्याची कला बहरून आली. त्यांच्या अजोड चित्रांनी ते माझ्या कायमचे स्मरणात राहिले.

सतीश शिरसाट

– लेखन : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments