Wednesday, June 18, 2025
Homeसाहित्यमी नेहमी आनंदी का असतो...?

मी नेहमी आनंदी का असतो…?

आज आंतरराष्ट्रीय आनंद दिवस आहे. या निमित्ताने कवी सुरेश डोळसे यांची कविता आज पुन्हा प्रकाशित करीत आहोत.

कवितेचे शीर्षक वाचून तुम्ही, आम्ही सर्वांनी स्वतःला तिथं असल्याचे समजून वाचावं म्हणजे आपण काय करतोय व काय करायला हवं याचा विचार करता येईल. आपल्या आनंदी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

हो कवितेच्या शिर्षकामध्येच प्रश्न दडलेला आहे…
की…  मी नेहमी आनंदी का असतो…?

मी भुतकाळ चघळत नाही…
भविष्याची चिंता करत नाही…
मी फक्त वर्तमानात जगतो…
म्हणून…
मी नेहमी आनंदी असतो..!!

मी कुणाकडुन काडीची अपेक्षा करत नाही…
कुणाचा राग मनात धरत नाही…
मी सगळ्यांसाठी मन नेहमीच साफ ठेवतो…
म्हणून…
मी नेहमी आनंदी असतो..!!

मी कसलाच हव्यास आणि लोभ करत नाही…
मी हायफाय राहण्यासाठी धडपडत करीत नाही… कोणासाठी कधीच दुःखाने तडफडत नाही…
साधं राहुन आपल्या माणसांत सुखानं रमतो…
म्हणून…
मी नेहमी आनंदी असतो..!!

कोण काय बोलतं ह्याचा…
मी कधीच विचार करत नाही…
कोणी काहीही बोललं तरी…
पुन्हा मी ते स्मरत नाही…
माझं जीवन स्वछंदी आहे…
ते मी मजेत जगतो…
म्हणून…
मी नेहमी आनंदी असतो..!!

जगायला काहीच भौतिक…
सुख लागत नाही…
म्हणून
मी गर्वाने कधीच वागत नाही…
सगळ्यांशी मी…
प्रेमाने, आदराने, आपुलकीने बोलतो, वागतो…
म्हणून…
मी नेहमी आनंदी असतो..!!

जसा जन्म शाश्वत आहे…
तसा मृत्यू देखील शाश्वत आहे…
ह्याची जाणीव मला माझ्या परमेश्वराने करून दिली आहे…
माझ्यातही दोष आहेत…
आणि
काही उणीवाही आहेत…
त्या मी वेळोवेळी
सुधारण्याचा प्रयत्न करतो…
म्हणून…
मी नेहमी आनंदी असतो..!!

मला सर्व गोष्टी जमतातच असं नाही…
पण
त्या करण्याचा व आनंदी राहाण्याचा…
मी सातत्याने प्रयत्न करतो…
ते करताना…
मी सदैव माझ्या परमेश्वराने सांगितलेल्या…
आचार विचाराची आठवण ठेवून…
“मी नित्य आचरण करण्यासाठी…
प्रयत्न करत असतो”…
म्हणून…
मी नेहमी आनंदी असतो..!!

माझी कैवल्याची वाटचाल करण्यासाठी मार्ग मिळणार आहे
ही माझ्या सर्वज्ञानी केलेली ब्रम्हवाणी त्रिकालाबाधित सत्य आहे…
म्हणून
मी नेहमी आनंदी असतो !!

सुरेश डोळसे

– रचना : सुरेश डोळसे, नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?