Monday, February 16, 2026
Homeलेखआयुर्वेद उवाच : १०

आयुर्वेद उवाच : १०

पित्त दोष
मागील लेखात आपण वाताचे गुण पाहिले. ते कशाने वाढतात, कशाने कमी होतात ह्याची माहिती मिळवली.

आज आपण आयुर्वेदातील द्वितीय पित्त दोषाची माहिती घेऊया.
पित्ताचे गुण
पित्त हे स्वभावतः अल्प स्नेह युक्त, उष्ण, तीक्ष्ण गुणांचे, आंबट, तिखट रसाचे असते, त्याच्या द्रव गुणामुळे ते चटकन पसरते.

प्राकृत पित्ताची शरीरातील कार्ये
* शरीर स्थित उष्णता म्हणजेच पित्त होय, पित्त हे कार्य पाच उप प्रकारांच्या साहाय्याने करते. पाचक पित्त, रंजक पित्त, अलोचक पित्त, भ्राजक पित्त, साधक पित्त असे ह्या पित्ताचे प्रकार आहेत.
* आपल्याला भूक लागते, अन्न पचते हे कार्य पाचक पित्ताचे आहे. ज्यास आयुर्वेदात जाठराग्नी म्हणतात.
* त्वचेचा प्राकृत रंग, शरीराचे तापमान, डोळ्यांनी दिसणे तसेच हृदयातील भावना निर्माण करणे धैर्य, शौर्य निर्माण होणे, रक्ताचा रंग प्राकृत ठेवणे म्हणजेच रक्ताचे घटक नीट ठेवणे हि प्राकृत पित्ताची शरीरातील कार्य आहेत.

पित्त प्रकोपची करणे
सतत आंबट, तिखट, खारट पदार्थ खाणे, सतत हिरव्या मिरच्या, चाट, आंबवलेले पदार्थ, अति व्यायाम, रात्री जागरण, अति चिंतन ह्यामुळे शरीरातील पित्त वाढते किंवा पित्ताची दुष्टी होते आणि ह्यामुळे आपल्याला विविध पित्त विकारांना सामोरे जावे लागते.

पित्ताचे शमन
मधुर, तुरट आणि कडु ह्या तीन रसांच्या सेवनाने पित्ताचे शमन होते. (कमी होते)

आयुर्वेदानुसार तारुण्याचा काळ हा पित्ताचा असतो. त्यात अशा कारणांची भर पडली तर पित्त अधिक प्रकुपित होते. म्हणूनच ह्या काळात चेहऱ्यावर पिंपल्स येणे, आम्लपित्त असे त्रास अधिक होतात.

पित्त दोषाचा ऋतु नुसार काळ हा शरद ऋतु म्हणजेच ऑक्टोबर हिट आहे. त्यामुळे स्वस्थ व्यक्तीनी देखील ह्या काळात विरेचन हे पंचकर्म वैद्याच्या सल्ल्याने अवश्य करून घ्यावे. पित्ताच्या साथीने रक्त दुष्टी हि बहुधा होते, म्हणूनच ह्या काळात रक्त मोक्षण हे कर्म केले जाते. आणि ते हि वैद्याच्या सल्ल्यानेच.

पित्त दोष हा शरीराचा अग्नि आहे आणि त्याची रक्षा करणे देखील गरजेचे आहे.
भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।

डॉ शार्दुल चव्हाण

– लेखन : प्रा वैद्य शार्दुल चव्हाण. एम.डी. आयुर्वेद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11