न्युज स्टोरी टुडे पोर्टल च्या विविध उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे स्नेहमिलन हा होय.
ठाणे येथील स्नेहमिलन हे एकपात्री कलाकार, लेखिका मेघना साने आणि गायक कलाकार हेमंत साने यांच्या घरी संपन्न झाले.
या स्नेहमिलनाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे अमेरिकास्थित कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुलोचना गवांदे यांची कर्करोग विषयावर सर्वांच्या उपस्थितीत मेघना साने यांनी घेतलेली मुलाखत आणि श्रोत्यांची प्रश्नोत्तरे.
इ-प्रसारण इंटरनेट रेडिओ अँड टेलिव्हिजन (E – Prasaran Internet Radio & Television) या इंटरनेट चॅनेलवर प्रसारित झालेल्या या मुलाखतीला ५५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
कर्करोगविषयी थोडक्यात पण सांगोपांग माहिती देणारी, आपल्या अनेक शंकांचे,भीतीचे निराकरण करणारी ही मुलाखत आपण पुढील लिंक ला क्लिक करून अवश्य पाहावी.
https://youtu.be/X2GgLpOt4D0
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800