मूक रूदन
येणारा कधीतरी
जाणारच आहे ,
हे सर्वांनाच माहित आहे,
पण त्याने असे जावे ?
हे मंजूर नाही…..
न त्याची चूक होती
न त्याची अरेरावी होती..
कोणी पण यावे ,
आणि टपलीत मारावे ?
हे मंजूर नाही ….
जगा आणि जगू द्या
नियम असतो सृष्टीचा
सर्व नियम मोडायचे
मनांत आले, मारायचे ?
हे मंजूर नाही…
माणुसकी जपायची
शिकवण पूर्वापार आमची
हिसकावणे,अत्याचार
बळजबरी सोसायचे ?
हे मंजूर नाही…
भूतदया, शांती ,
मैत्रीभाव , शेजारधर्म
रक्तातच असतो आमच्या
अबलता त्याला समजायचे?
हे मंजूर नाही…
अरे ला कारे म्हणावे
शिकवलय आम्हाला सुध्दा
लढाई झगड्यात
निरपराध बळी जावेत?
हे मंजूर नाही….
काळ सोकावतोय
१०० अपराध होऊन गेलेत,
तुफान तर येणारच आहे,
आताही मूग गिळून गप्प बसायचे ?
हे मंजूर नाही…
— रचना : चित्रा मेहेंदळे. मुंबई. ह. मु. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
यथार्थ वर्णन आहे ,पण घटनाच एवढी विचित्र आहे की शब्दाशब्दातून ह्रदय पिळवटून निघतय 😢😌
खूप सुंदर व्यक्त झाला आहात..अगदी मनापासून लिहिली आहे कविता 🙏
योग्य वेळी योग्य शब्द 🙏
दहशतीला दणदणीत चपराक ची कविता
गोविंद पाटील सर जळगाव.
बरोबर, खूप छान रचना व्यक्त केली तुम्ही या अश्या निर्दयी घटनेवर 🙏🙏🙏
अगदी योग्य, उत्तमपणे भाव व्यक्त कलेत.